Thursday, April 4, 2013

दहशत पसरवण्यासाठी 'ते' तयार


दीप्तीमान तिवारी । नवी दिल्ली ( महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन वृत्त )

भारतात सक्रिय असणा-या दहशतवादी संघटनांना दहशतवादी कृत्यांसाठी तरुण मुले शोधण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नसल्याचे दिसत आहे. सध्या धर्मांध तरुणांचे गट स्वत:हून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. मुसलमानांवर अत्याचार होत असल्याची भावना या तरुणांच्या मनात रुजत असल्याने ते स्वत:च या कडव्या संघटनांकडे जात आहेत. भारतात सक्रिय असणा-या दहशतवादी संघटनांपैकी इंडियन मुजाहिदीन (आयएम) आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांची हैदराबाद बॉम्बस्फोटासंबंधी चौकशी केल्यानंतर हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. जास्त कष्ट न करता तरुण स्वत:हूनच दहशतवादी संघटनामध्ये काम करण्यास तयार होत असल्याचा हा नवीन ट्रेण्ड चिंतेचा विषय असल्याचे मत गुप्तचर संघटनांनी व्यक्त केले आहे. दहशतवादी संघटनांमध्ये स्वेच्छेने येणा-या तरुणांना आपल्याच देशाच्या विरोधात वागण्याचा पश्चाताप होत नसल्याची माहिती सैय्यद मकबूल, इमरान खान आणि ओबैद उर रहमान यांनी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एनआयए) अधिका-यांना दिली.
आयएम दहशतवादी संघटनेसाठी बॉम्बस्फोटाची आखणी करणारे मकबूल आणि इमरान यांना मागील वर्षी १ ऑगस्ट २०१२ रोजी पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याच्या माहितीवरुन अटक करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारी रोजी हौद्राबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी रेकी केल्याचा संशय या दोघांवर आहे. मागील वर्षी बंगळूरु पोलिसांनी ज्या दहशतवादी मोडस ऑपरेंडीचा खातमा केला त्या दहशतवाद्यांच्या गटातील रहमान या एकमेव दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. मकबूल आणि इमरानला दिलसुख नगरमध्ये बॉम्ब ठेवण्याच्या जागेच्या रेकीसाठी रहमानने त्यांना मदत केल्याचा संक्षय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. हैदराबाद बॉम्बस्फोटामध्ये १६ लोकांचा आपला जीव गमवावा लागला आहे.

दहशतवादी हल्ल्यातील चौकशी करणा-या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनी नुसार पुणे बॉम्बस्फोट आणि लष्करची मोडस ऑपरेंडी या दोन्ही घटनांमध्ये काही दहशतवादी सोडल्यास इतरांना ही देशविरोधातील कामे करण्यासाठी भडकवण्यात आले नव्हते ते स्वत:हून या दहशतवादी कृत्यात सहभागी झाले होते. दहशतवादी संघटनांनी यांना शोधण्याएवजी यांनीच दहशतवादी संघटनांशी संपर्क साधून त्यांच्यासाठी काम करण्यास सुरवात केली. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दहशतवाद्यांची कार्यपद्धती, मोडस ऑपरेंडी आणि त्याना कशाप्रकारे थांबवता येईल याचा शोध घेण्यातच गुप्तचर यंत्रणांची ताकद कमी पडत आहेत त्यात हा नवीन ट्रेण्ड भविष्यात देशासाठी घात ठरण्याची शक्यता आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19322735.cms

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी