Monday, June 24, 2013

मोदी यांनी आपलं वेगळेपण पुन्हा सिद्ध केलं

 ...अन् मोदींनी गुजराथींना वाचवलं!

मटा ऑनलाइन वृत्त । डेहरादून

'ते' उत्तराखंडला गेले... व्हीआयपी ट्रिटमेंट नको म्हणाले... सरकारी यंत्रणेवर त्यांनी कुठलाही दबाव टाकला नाही... फक्त आपल्या काही विश्वासू अधिका-यांना ते सोबत घेऊन गेले होते आणि सर्व परिस्थितीचं योग्य नियोजन करून त्यांनी तब्बल १५ हजार गुजराथी यात्रेकरूंसह अनेकांना सुखरूप घरी पोहोचवलं...

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपलं वेगळेपण पुन्हा सिद्ध केलंय. केदारनाथ, बद्रिनाथ, उत्तरकाशीत अडकलेल्या आपापल्या राज्यांतील भाविकांची माहिती देण्यात आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात इतर राज्यांचे मुख्यमंत्री समाधान मानत असताना, नरेंद्र मोदींनी थेट 'फिल्ड'वर जाऊन आपल्या राज्यवासियांना मोठ्या संकटातून सोडवलंय. या कामगिरीमुळे त्यांनी आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिलंय.

उत्तराखंडमधील नैसर्गिक प्रकोपानंतर, शुक्रवारी उशिरा नरेंद्र मोदी आपल्या ताफ्यासह तिथे पोहोचले. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. मोदींच्या या दौ-यामुळे मदत कार्यात अडचणी येतील, सरकारी यंत्रणेवर ताण पडेल, असे बोल विरोधकांनी सुनावले. पण, कुठल्याही प्रकारची व्हीआयपी ट्रिटमेंट न घेता, नरेंद्र मोदींनी आपल्यासोबतच्या आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिका-यांसोबत चर्चा केली. जवानांना मदत कार्यात येणा-या अडचणींवर कशी मात करता येईल, यासाठी काही उपाययोजना त्यांनी सुचवल्या.

निसर्गाच्या प्रकोपातून बचावलेले भाविक वेगवेगळ्या कॅम्पमध्ये होते. त्यांना तिथून सुस्थळी हलवण्याचं काम मोठं जिकीरीचं आहे. त्यातही मोदींनी पुढाकार घेतला. त्यांच्या आदेशानुसार, ८० इनोव्हा गाड्यांमधून शेकडो यात्रेकरूंना डेहराडून विमानतळापर्यंत सुखरूप आणण्यात आलं. त्यानंतर, सुमारे १५ हजार यात्रेकरूंना बोइंग विमानांमधून गुजरातला नेण्यात आलं, तर २५ लक्झरी बस इतर भाविकांना घेऊन दिल्लीला रवाना झाल्या. गुजरात सरकारच्या दोन आयएएस अधिका-यांनी या संपूर्ण ऑपरेशनचं नेतृत्त्व केलं.

दरम्यान, उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारला मंदिर पुनर्वसनाची ऑफरही नरेंद्र मोदींनी दिल्याचं समजतं. पुन्हा कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास, त्यात मंदिराचा दगडही हलणार नाही, अशी हमी त्यांनी दिली होती. पण उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींची ही ऑफर धुडकावून लावल्याचं समजतं. मोदींच्या टीमनं उत्तराखंड सोडताना तेथे अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्प उभारले आहेत. हरिद्वारमधील मेडिकल कॅम्पमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीनं औषधांचा पुरवठाही करण्यात येतोय. अन्नाच्या पाकिटांची गरज कोठे आहे, कोणत्या ठिकाणी कोणती औषधं कमी पडत आहेत, निवा-याची काय व्यवस्था करता येईल, यासारखे प्रश्न दोन ते तीन फोनकॉलवर सुटत आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Narendra-Modi-lands-in-Uttarakhand/articleshow/20725819.cms

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी