Wednesday, July 17, 2013

मार्केट व्हॅल्यू - नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांचे


तिकीटावरून कळते मोदींची 'मार्केट व्हॅल्यू'- तिवारी

नवी दिल्ली - हैदराबाद येथे पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला पाच रुपये तिकीट ठेवल्याने, यावरून त्यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे हे कळते, अशी खोचक टीका केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे.


आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे प्रचारप्रमुख असलेले नरेंद्र मोदी यांची 11 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी पाच रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. त्यामुळे भाजपवर काँग्रेस नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.

तिवारी म्हणाले, ''एखाद्या बाबाचे प्रवचन ऐकण्यासाठीही आता १०० ते हजार रुपयांपर्यंत तिकीट खरेदी करावे लागते. एखादा चित्रपट पाहण्यासाठीही २०० ते ५०० रुपयांपर्यंतचे तिकीट काढावे लागते. मात्र, एका फ्लॉप वक्त्याचे भाषण ऐकण्यासाठी फक्त पाच रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. यावरून मोदींचे मार्केट व्हॅल्यू किती आहे, हे कळून येते.''
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5391167208652840627&SectionId=28&SectionName=ताज्या+बातम्या&NewsDate=20130716&Provider=-+वृत्तसंस्था&NewsTitle=तिकीटावरून+कळते+मोदींची+%27मार्केट+व्हॅल्यू%27-+तिवारी
==============================================

नाशिकमध्ये भाडोत्री महिलांना पैशाऐवजी मार

7 ऑक्टोबर नाशिकमध्ये झालेल्या सोनियांच्या सभेसाठी भाड्याने आणलेल्या महिलांना पैशाऐवजी मार खावा लागला. भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. युथ काँग्रेसचं कार्ड दाखवायचं आणि शंभर रुपये घेवून जायचे अशी 'सीस्टीम' काँग्रेसने नाशिकमध्ये झालेल्या सोनियांच्या सभेसाठी आखली होती. त्याशिवाय महिलांनाही दोनशे रुपये रोजाच्या बोलीवर सभेसाठी आणण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र, सभेनंतर मजुरी मागायला गेलेल्या महिलांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे.भाडोत्री कार्यकर्त्यांचा धंदा जोरात निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या सभांना गर्दी जमवण्यासाठी भाडोत्री कार्यकर्ते आणले जात आहेत. गाड्या भरुन भरुन नेत्यांच्या सभांना लोक आणले जाता. त्यासाठी त्यांना पैसे आणि जेवणखाण दिलं जातं. नाशिकमध्ये याचा अप्रत्यक्ष परिणाम कंस्ट्रक्शन धंद्यावर झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिकमधल्या कंस्ट्रक्शन कॉन्ट्रॉक्टर्सच्या तोंडचं पाणी पळालं आहे. सध्या प्रचारसभांपासून प्रचार फेर्‍यांपर्यंत राजकीय पक्षांसाठी प्रचार करणार्‍या भाडोत्री कार्यकर्त्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. नाशिकमध्ये दोनाचे चार मतदारसंघ झाले. शिवाय प्रत्येक मतदारसंघात अधिकृत-बंडखोर, हौशा-नवशा उमेदवारांच्या संख्येनं तर रेकॉर्ड ब्रेक केला. परिणामी भाडोत्री कार्यकर्त्यांचे भाव वधारले. सध्या हा भाडोत्री कार्यकर्त्यांचा धंदा जोरात आहे. गाड्या भरून माणसं आणायची, याद्या करायच्या आणि मग हिशोब होते. प्रचार सभेत जायचं असेल तर 100 ते 200 रुपये रोज + प्रवास खर्च मिळतो. प्रचार फेरीत जायचं असेल तर 150 ते 200 रुपये + जेवण मिळतं. दिवसभर रोजंदारीवर प्रचारासाठी 200 रुपये + खाणंपिणं असं पॅकेज असतं.

http://www.ibnlokmat.tv/?p=16332

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी