Friday, September 16, 2011

जीवनात कुठे होत आहे चूक ?

आजच्या जगावर एक नजर टाकल्यास काय दिसते ? अपूर्ण इच्छा आकांक्षा यामुळे निर्माण झालेला कलह मानवावर स्वार झाला आहे. यामुळे निराशा आणि अपयश यात पिचलेला मनुष्य स्वत:ला दु:खी समजू लागला आहे.

चाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...

प्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या व्यक्तिचा जन्म मोठ्या कुटुंबात, संपन्न परिवारात झाले असेल तर त्या व्यक्तिला या सा-या गोष्टी विनाप्रयास मिळून जातात.  समाजात ख्याती कशी प्राप्त करावी ? महान कसे बनावे ? आपल्याला मान सन्मान कसा मिळेल याविषयी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-management-tips-of-acharya-chanakya-2435428.html



Thursday, September 15, 2011

जम्मू-काश्मीर आणि कपटी राजकारण

देव वारंवार आपल्यापुढे संकटं आणि अडचणी उभ्या करीत असेल, तर आपण देवाचे आभारच व्यक्त करायला हवेत. कारण, अशाच संकटांच्या वेळी शत्रू आणि मित्राची खरी ओळख पटते. संकटग्रस्त व्यक्ती आणि समाजाच्या धमण्यांमध्ये वाहणारे रक्त लाल आहे की पांढरे, याचा खुलासासुद्धा अशाच वेळी होतो आणि ते त्यांच्या कटिबद्धतेशी किती प्रामाणिक आहे, हेदेखील कळून चुकते. उपदेश करणारे आणि देवदूतांचे खरे रूप आम्ही पाहिले आणि अनुभवलेसुद्धा आहे. पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला हे असेच दोन देवदूत होते. या दोघांमुळे काश्मीरमध्ये केवळ फुटीर विचारांचे पोषण झाले नाही, तर १९४७ मध्ये तुष्टीकरणाच्या धोरणामुळे जे विषवृक्ष येथे लावले गेले त्यांची विषारी फळे अजूनही आपल्याला चाखावी लागत आहेत.

Wednesday, September 14, 2011

राहुल आणि मोदी यांच्यात महासंग्राम

वॉशिंग्टन. आगामी लोकसभा निवडणुका 2014 साली होणार असल्या तरी पंतप्रधानपदाचे दावेदार कोण यावरून देशात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या संसदीय समितीच्या ताज्या अहवालाने ही चर्चा जोर पकडत असल्याचे दिसत आहे.

अमेरिका म्हणते, मोदींकडून शिका !

वॉशिंग्टन. सरकार कसे चाललावे हे नरेंद्र मोदींकडून शिकायला हवे, असा अहवाल अमेरिकेच्या संसदीय समितीने दिला आहे. गुजरात दंगल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा गौरव करणारी ही बातमी आली आहे. एके काळी अमेरिकेत येण्यास मज्जाव करणा-या अमेरिकेने नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

Tuesday, September 13, 2011

सर्व कार्येषु सर्वदा..


दैनिक लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला एक अग्रलेख खूप आवडला, तो येथे देत आहे.... तुम्हालाही आवडेल असे वाटते...



समाजासाठी पैसा देण्याची वृत्ती श्रीमंतांमध्ये कमी का दिसते?  हातातील चतकोर भाकर गरीब जितक्या सहजतेने पुढे करतो तसे श्रीमंत का करीत नाहीत? या प्रश्नांचा मानसशास्त्रातून शोध घेण्यास सुरुवात झाली ती एका श्रीमंताच्या साध्या सूचनेमुळे आणि या सूचनेवर होणाऱ्या टीकेमुळे. 'श्रीमंतांचे कौतुक करणे थांबवा. आमच्यावर अधिक कर बसवा. समाजाच्या आर्थिक समृद्धीसाठी हे आवश्यक आहे', अशी मागणी सरकारकडे केली ती श्रीमंतीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वॉरेन बफे यांनी.

'कसं जीवन जगायचं'?


हिंदू धर्मग्रंथ महाभारतात जीवनाकडे कसे पहावे याविषयी अतिशय महत्त्वाचे सूत्र सांगण्यात आले आहे. या सूत्रानुसार जीवनात 5 प्रकारचे लोक भेटत असतात, हे ध्यानात घेऊन माणसाने परिस्थिती हाताळत जीवन जगावे. महाभारतात म्हटले आहे... पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ... हे 5 प्रकारचे लोक आपल्याला शिकवतात 'कसं जीवन जगायचं'?

Monday, September 12, 2011

बहुसंख्यांकांना आधीच गुन्हेगार ठरवणारा कायदा

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीने या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. हे विधेयक लिहिले आहे तीस्ता सेटलवाड, नजमी वझिरी यांनी. सल्लागार समितीचे सदस्य आहेत फराह नकवी, कमल फारुकी, जॉन दयाल, मौलाना नियाज फारुकी. या व्यतिरिक्त हर्ष मंदेर, गोपाल सुब्रह्मण्यम असे लोक लिखाण समितीमध्ये, तर सल्लागार समितीमध्ये माजी न्यायमूर्ती सुरेश होस्पेट, अबुसालेह शरीफ, असगर अली इंजिनिअर, जॉन दयाल, राम पुनियानी, शबनम हाशमी, सिस्टर मारिया स्कारिया, सय्यद शहाबुद्दीन, रूपरेखा वर्मा, गगन सेठी आदी आहेत. (यातील तीस्ता सेटलवाडसारखी मंडळी दंगल प्रकरणी खोटे साक्षी पुरावे सादर केल्याप्रकरणी न्यायालयात दोषी ठरले आहेत हे विशेष.)
देशातील ९० जिल्हे आणि शेकडो गावे अशी आहेत की, जिथे हिंदू अल्पसंख्यांक आहेत; पण लोकसंख्या  मापनाचे जे एकक आहे ते राज्यस्तराचे आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात हिंदू बहुसंख्यांकच ठरतात. हे कलम हिंदूंना आधीच गुन्हेगार ठरवून मोकळे होते.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-bill-against-communal-and-targeted-violence-2424265.html?HT5=

दंगली वाढविणारे विधेयक ?

शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या बैठकित 'धार्मिक व लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक विधेयक 2011'च्या प्रस्तावित मसुद्यावर चर्चा झाली. हे विधेयक 'जातीय दंगली कमी करण्याऐवजी वाढविणारे'   आहे इथपासून ते 'राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे' आहे, असे मत तेथे बोललेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. सत्ताधारी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले पण विधेयकाचे समर्थन केले नाही... असे या विधेयकात काय आहे ?
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ...
... हे विधेयक - जातीय दंगली कमी करणारे की वाढविणारे ? ( विशेष )  

Saturday, September 10, 2011

सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक 'घातक' असल्याचा मुख्यमंत्र्यांचा सूर

नवी दिल्ली. केंद्र सरकार आणू पाहत असलेल्या 'धार्मिक व लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक विधेयक 2011'च्या प्रस्तावित मसुद्याला एनडीएतील घटक पक्षांसह सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक असलेल्या तृणमूल काँग्रेसनेही विरोध केला आहे. हा प्रस्तावित मसुदा अतिशय घातक, अल्पसंख्य आणि बहुसंख्य यांच्यात असलेली दरी आणखीणच रूंदावणारा आणि राज्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचं मत वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीने या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे.

पूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

१. सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक 'घातक' असल्याचा मुख्यमंत्र्यांचा सूर  

२.  http://psiddharam.blogspot.com/2011/07/blog-post_30.html


.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी