Friday, August 17, 2012

क्रांतिस्तंभ पुन्हा दिमाखात उभा!

धर्मांधांना चोख उत्तर...
आझाद मैदान परिसरात शनिवारी धर्मांध मुस्लिमांनी हैदोस घातला. यावेळी १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यातील शहीदांच्या स्मृती जपणार्‍या क्रांतिस्तंभावरही धर्मांधांनी हल्ला केला. या हल्ल्यात नासधूस झालेला क्रांतिस्तंभ शिवसेना आणि पालिकेने अवघ्या तीन दिवसांत पुन्हा दिमाखात उभा केला. स्वातंत्र्यदिनीच क्रांतिस्तंभाला नवी झळाळी मिळाली. अनेक देशप्रेमींनी बुधवारी या क्रांतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. साभार दैनिक सामना / 17 - 08 -2012

या धर्मांधाला कसाबच्या आधी फासावर चढवा !

मुंबईतील देशद्रोही मुसलमानांनी घडवलेल्या दंगलीत सर्वात मोठा आघात झाला तो हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याची अस्मिता जागवणार्‍या ‘अमर जवान’ या क्रांतिस्तंभावर... ! २६/११ ला कसाब टोळीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांचा स्मृतीस्तंभ आणि १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मा जवानांचा पवित्र क्रांतिस्तंभ यावर या धर्मांधाने आक्रमण करून तोडफोड केली. या स्मारकातील बंदूक उखडून टाकली. या दंगलीतील हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. या अवलादीला ताबडतोब पकडा आणि कसाबच्या आधी त्याला जाहीरपणे फासावर लटकवा, अशी जोरदार मागणी राष्ट्रप्रेमी जनतेतून होत आहे. - दैनिक ‘सामना’, १३.८.२०१२

भ्रष्ट ऐषआरामाने पावित्र्य विटाळले


-भाऊ तोरसेकर

चटकन कुणाला वाटेल की, पत्रकारांवरील हल्ला हे मी केलेले विषयांतर होते. पण वस्तुस्थिती तशी नाही. पहिली गोष्ट म्हणजे माध्यमात आणून ओतलेला प्रचंड काळा पैसा ही समस्या भ्रष्टाचाराशी संबंधीत आहे आणि त्याचाही देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराशी घनिष्ठ संबंध आहे. किंबहुना भ्रष्टाचार प्रतिष्ठीत करण्यासाठी आधी समाजाची बुद्धी कमीतकमी प भ्रष्ट करावी लागते. याचा म्हणूनच पत्रकारितेशी घनिष्ठ संबंध आहे.

Wednesday, August 15, 2012

स्मरण वेदनामय अपघाताचे...

काही घटना अशा असतात की त्या विसरू म्हटले तरी विसरता येत नाही. विसरल्याचा आव आणला तरी भूतकाळ थोडाच बदलतो ! आणि भूतकाळाचा ठसा वर्तमान आणि भविष्यावर उरतोच की. भूतकाळातील त्रूटीपासून बोध न घेतल्याने इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, संदर्भ थोडेफार बदलत असतील तेवढेच.
१४ ऑगस्टच्या रात्रीच जीवघेणा आघात झाला होता. संपूर्ण शरीरच लुळे पडले. पुढे या आघातातून सावरण्यासाठी काही वर्षे जावी लागली. हे वर्णन मला झालेल्या जीबीएस या जीवघेण्या आजाराचे आहे आणि आपल्या मातृभूमीच्या वेदनादायी फाळणीचेही. हा दुर्दैवी योगायोग. मी आता त्या आजारातून पूर्णपणे सावरलोय. शरीरातील अज्ञात बिघाडीमुळे त्या आजारात आपलीच रोगप्रतिकार शक्ती आपल्यावर हल्ला करते, त्यामुळे बाहेरची प्रतिजैविके निरुपयोगी ठरतात. सेक्युलर, मानवाधिकार आदी बुरखा पांघरून काही घरभेदी भारताला पोखरून काढत आहेत. याच 'विषाणूंमुळे' देशाची फाळणी झाली होती. देशाला पोखरणाऱ्या या रोगाविषयी ब्लॉगवर अधिकाधिक माहिती सातत्याने देण्याचा प्रयत्न केलाय आणि करतही आहे.
देशविरोधी शक्तींबाबत जागरूक राहण्याची क्रिया निरंतर चालणारी आहे, त्याच प्रमाणे आरोग्याची काळजी घेणे हीदेखील निरंतर चालणारी क्रिया आहे. जी बी एस च्या आजाराचा आघात होऊन १४ / १५ ऑगस्ट रोजी बरोबर तीन वर्षे होत आहेत. जी बी एस म्हणजे मूत्यूद्वारच. त्यातून ईश्वर कृपा आणि प्रेम करणाऱ्या असंख्य जीवलगांमुळे मी सुखरूप सुटलो. आजपासून सातत्याने आरोग्याची काळजी घेण्याचा शुभ संकल्प करतोय. देशाच्या आरोग्यासाठी जागरूक राहण्याचा सामुहिक संकल्प करुया...
जीबीएसबद्दल अधिक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

Monday, August 13, 2012

‘शिवाय नम: अप्पा’ यांना अशी घडली कैलास-मानस सरोवर यात्रा


सोलापूर - भगवान शिवशंकराचे निवासस्थान मानले गेलेल्या कैलास पर्वताचे याचि देही दश्रन घडणे कोणत्याही शिवभक्तासाठी परमोच्च आनंदाचा क्षण. सोलापुरात ‘शिवाय नम: अप्पा’ या नावाने ज्यांची ओळख आहे त्या नागनाथ सिद्धप्पा कळंत्रे (वय 67) यांनी कैलास मानस सरोवराची केलेली यात्रा रोमहर्षक आहे. गेल्या 52 वर्षांपासून नित्य नेमाने दिवसातून दोनदा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दश्रन घेणार्‍या या शिवभक्ताशी साधलेला हा संवाद.

Saturday, August 11, 2012

सावरकर आणि आसाम


आसामात चालू असणार्‍या घुसखोर मुसलमानांच्या दंगलींनी आज उग्र रूप धारण केले आहे. हा प्रश्न अकस्मात् उत्पन्न झालेला नाही. खिस्ताब्द १९११ पासून आसाममध्ये घुसखोर मुसलमानांची वस्ती करवून तो मुस्लिम प्रांत बनवण्याची कारस्थाने चालू आहेत. या मुस्लिम घुसखोरीपासून आसामला आणि पर्यायाने देशाच्या पूर्वसीमेला उत्पन्äन झालेल्या धोक्याकडे स्वा. सावरकरांनी देशाचे लक्ष खिस्ताब्द १९४० पासून सतत वेधले आहे. खिस्ताब्द १९४१ मध्ये सावरकरांनी आसामचा प्रवास (दौरा) करून तेथे मोठी जागृती उत्पन्न केली. या प्रवासात त्यांनी ४,५०० मैलांचा प्रवास केला.

Friday, August 10, 2012

आसाममधील मदतकार्यासाठी आवाहन

सोलापूर । प्रतिनिधी
आसाम राज्यामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे लक्षावधी देशबांधवांवर निर्वासित होण्याची पाळी आली. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीने तेथील दलिगांव ब्लॉक भागात सेवाकार्याला सुरुवात केली आहे. दीर्घकाळ चालू शकणा-या या पुनर्वसन कार्यासाठी मुक्तहस्ते देणगी देण्याचे आवाहन केंद्राने केले आहे. देणगीदारांना ‘80 जी’ची सवलत मिळणार आहे. विवेकानंद केंद्र, 165 रेल्वे लाइन्स, होमगार्ड मैदानाजवळ, सोलापूर येथे 16 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत रोख / चेक स्वरूपात देणगी स्वीकारली जात आहे. या राष्ट्रीय कार्यात योगदान देण्याचे आवाहन केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील यांनी केले आहे. संपर्क : आनंद भंडारे 9763439001.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी