Thursday, January 21, 2016
९०० वर्षांपूर्वी दिलेली “गिफ्ट’’ आम्ही उघडून पाहिलीच नाही !
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धराम. ९०० वर्षांपूर्वी सोलापुरात जन्मास आलेले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते. त्यांनी ६८ हजार वचनांची निर्मिती केली. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रात शिवयोगी सिद्धराम यांना ईश्वर मानून भक्ती करणारा वर्ग खूप मोठा आहे. परंतु त्यातील खूप कमी लोकांना सिद्धरामांच्या वचनसाहित्याची माहिती आहे. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या या विचारांची ही शिदोरी, गिफ्ट आम्ही उघडून पाहिलीच नाही.
Saturday, January 2, 2016
श्रीपाल सबनीस उठले अन् तुम्हीच माझे शरद पवार म्हणत सगळ्यांच्या देखत भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले
श्रीपाल सबनीस यांचा राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्हाला हर्षोल्हासात फोन आला की ‘‘चपराकच्या संपूर्ण टीमसह ताबडतोब घरी या. मी आतुरतेने तुमची वाट पाहतोय.’’ कसलाही विचार न करता आम्ही आमच्या फौजफाट्यासह त्यांचे घर गाठले. तिथे शरद पवारांच्या गोटातले विश्वासू पत्रकार, ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ‘‘साहेबांनी पी. डी. पाटलाला फोन केलाय. राष्ट्रवादीची सगळी ताकत आपल्या मागे उभी आहे.’’ त्यानंतर सौभाग्यवती सबनीस यांनी औक्षणाचे ताट आणले. भोंगळे यांना राखी बांधली. भोंगळेंनी राखीच्या ताटात ओवाळणी टाकण्यासाठी शंभराची नोट काढली. त्याबरोबर सबनीस उठले आणि आमच्या सगळ्यांच्या देखत त्यांनी भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले. ‘‘ओवाळणीत पैसे नकोत. आमच्या ‘हिने’ तुम्हाला भाऊ मानले आहे. सध्या माझ्यासाठी तुम्हीच शरद पवार. तुम्हाला केलेला नमस्कार त्यांना मिळेल. एकदा संमेलानध्यक्ष पदाची भीक माझ्या पदरात घाला. त्यानंतर मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही. माझी ही शेवटची इच्छा आहे.’’ आणि त्यांनी डोळ्यात पाणी आणले.
संपूर्ण लेख
पुढील प्रमाणे...
Thursday, December 31, 2015
एका हातात बॉम्ब दुसर्या हातात गीता
''आम्हाला वारंवार एक प्रश्न विचारला जातो आणि तो अनेक दशके विचारला गेलेला आहे की, भारताने गेल्या हजारो वर्षांच्या वाटचालीमध्ये आपला भूभाग विस्तारित का केलेला नाही किंवा जगामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न का केला नाही ? त्याचे उत्तर आपण देऊ शकत नसलो तरी काही नामवंत अभ्यासकांनी ते दिलेले आहे. भारतीयांच्या विस्तार न करण्याच्या प्रवृत्तीमागे त्याची मानसिकता दडलेली आहे. त्याचे स्पष्टीकरण करताना हे विद्वान लोक भारतीयांची सहिष्णुता, बेशिस्त, कोणाचाही बदला न घेण्याची किंवा सूड न घेण्याची भावना, परकीयांना आपल्यात सामावून घेण्याची लवचिकता आणि आक्रमणापेक्षा स्वसंरक्षणाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती याकडेे बोट दाखवतात.''
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी सहलेखक एस. वाय. राजन यांच्या सहकार्याने 1998 साली लिहिलेल्या ‘इंडिया व्हिजन 2020 - अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ या पुस्तकात वरील प्रतिपादन केलेले आहे. डॉ. कलाम यांनी या पुस्तकात हा विषय फार सखोलपणे मांडलेला आहे.
भारतीयांच्या या सार्या मनोवृत्तीचे मूळ त्यांच्या गोंधळलेल्या मनःस्थितीत असते आणि ही गोंधळलेली मनःस्थिती ही आपली राष्ट्रीय प्रवृत्ती आहे. युध्दाचा त्याग करणारा राजा अशोक हा आपल्या देशातल्या जनतेचा आदर्श राजा झाला तेव्हापासूनची अनेक शतके भारतीयांच्या मनःस्थितीला हा संभ्रम वेढून राहिलेला आहे.
Friday, December 18, 2015
दिलीप कुलकर्णी यांनी उलगडली पर्यावरणस्नेही विकासनीती
विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे केले आयोजन
प्रतिनिधी । सोलापूर
निसर्गाच्याव्यवस्थेतील प्रत्येक घटक विघटित होतो. माणसांचे केंद्रीकरण अन्् प्रगतीच्या दिखाव्यामुळे कचऱ्याची निर्मिती होते. स्वत:ला वगळून कचऱ्याचे निर्मूलन अशक्य आहे. कचारानिर्मितीच होणार नाही, यासाठी प्रयत्न करणे हाच त्यावरील एकमेव शाश्वत पर्याय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी (कुडाळ, रत्नागिरी) यांनी केले. विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवार आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम अध्यक्षस्थानी तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, नगरप्रमुख प्रा. प्रशांत स्वामी डॉ. वासुदेव रायते पर्यावरण मंडळाचे प्रमुख अजित आेक आदी उपस्थित होते.

Wednesday, December 16, 2015
विवेकानंद केंद्रातर्फे गुरुवारी पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णींचे व्याख्यान
सोलापूर । विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवारी
(१७ डिसेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता प्रसिद्ध पर्यारवणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी
यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. विवेकांनद केंद्र, १६५ रेल्वे लाइन्स येथे “कचरा
निर्मूलन आणि नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान होईल, अशी माहिती मंडळाचे
प्रमुख अजित ओक यांनी िदली. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील तर
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सीइओ अरुण डोंगरे उपस्थित असतील.
व्याख्यानानंतर कचरा िनर्मूलन आणि नागरिकांचा सहभाग यावर चर्चा होईल.
#होम_मैदान_सोलापूर कोणाच्या मालकीचे?
होम मैदान शासकीय आहे आणि शासनाकडून यात्रेसाठी देवस्थानला ही
जागा देण्यात येते, असे अधिकारी आणि काही सन्माननीय पढतमूर्ख सांगत आहेत.
शासन जणू उपकार करते असा भासवण्याचा प्रयत्न यामागे असतो. पण हे खरे नाही.
५० वर्षांपूर्वी महापालिकेत एक अतिशय शहाणे अधिकारी आले होते.
त्यांनी म्हटले, “सिद्धेश्वर तलाव हे सरकारी मालकीचे आहे. त्यामुळे आम्ही तलाव बुजवणार आणि त्या ठिकाणी बाग फुलवणार.’’
त्यांनी म्हटले, “सिद्धेश्वर तलाव हे सरकारी मालकीचे आहे. त्यामुळे आम्ही तलाव बुजवणार आणि त्या ठिकाणी बाग फुलवणार.’’
हा वाद तेव्हांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता.
मुख्यमंत्र्यांनी समज दिली तेव्हा कुठे अधिकाऱ्यांची अक्कल ठिकाणावर आली.
मुख्यमंत्र्यांनी समज दिली तेव्हा कुठे अधिकाऱ्यांची अक्कल ठिकाणावर आली.
Tuesday, December 15, 2015
मुंढेजी, अहंकाराचे भूत मानगुटीवरून उतरवा
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि सिद्धेश्वर यात्रा समिती वाद या विषयावर
युवापत्रकार सागर सुरुवसे यांचा दैनिक तरुण भारतच्या रविवारच्या आसमंत पुरवणीमध्ये
प्रसिद्ध झालेला लोकप्रिय लेख…
“देवस्थान समितीने संपूर्ण होम
मैदानावर मॅट आच्छादन केले आहे. आपातकालीन मार्ग म्हणून जिल्हाधिकारी
कार्यालयालगतचा रस्ताही मोकळा सोडला आहे. ही दोन्ही कामे पूर्ण झाली आहेत आणि
उद्घाटन माननीय जिल्हाधिकार्यांच्या हस्ते, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होत आहे. ही स्वप्नवत कल्पना. पण ही गोष्ट सत्यात
उतरली असती जर का जिल्हाधिकारी मुंढे यांनी स्वत:च्या कार्यशैलीत बदल केला असता.’’
हे उद्गार आहेत सोलापुरात जिल्हाधिकारी पदावर राहिलेल्या एका उमद्या अधिकार्यांचे.
अर्थातच त्यांनी आपली ही भावना खासगीत बोलताना व्यक्त केली आहे.
संत ज्ञानेश्वरांनी अशा स्वभावाच्या व्यक्तींचे वर्णन मोठ्या चपखलपणे केले आहे. ज्ञानोबा म्हणतात, ‘अहंकाराचे वागणे मोठ्या नवलाचे आहे. अज्ञानी, सर्वसामान्य लोकांच्या मागे तो लागत नाही. पण बुद्धीमंतांच्या मात्र तो मानगुटी बसतो. त्याला आपल्या तालावर नाचायला लावतो.’ सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या वर्तनाला हे वर्णन तंतोतंत लागू पडते.

Monday, December 7, 2015
पुनश्च एकदा सडेतोड
आमचे मित्र सागर सुरवसे यांनी तरुण भारतमध्ये सडेतोड या नावाने स्तंभ लेखनाला सुरुवात केली आहे. रामतीर्थकर सरांनी पेटवलेली मशाल अधिक प्रखर होत जावो या शुभेच्छा....
Friday, November 20, 2015
वादळाशी केला संसार : अपर्णा अरुण रामतीर्थकर
व्यासंगी व ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे ६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या
पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांनी जागवलेल्या काही आठवणी.
धर्मनिरपेक्षतेचे नाटक थांबवा
दै. दिव्य मराठीत प्रकाशित मुजफ्फर हुसेन यांचा लेख
जर भारताला सर्व प्रकारची हिंसा आणि असहिष्णुतेपासून मुक्ती द्यायची असेल तर प्रत्येक जाती आणि समुदायाच्या असहिष्णुतेशी लढा द्यावा लागेल. केवळ हिंदूंच्या असहिष्णुतेची निंदा करून चालणार नाही. अलीकडच्या काळात मोदीविरोधाच्या नावाखाली काँग्रेसी नेत्यांनी असहिष्णुतेला हिंदू आवरण चढवून देश-विदेशात बदनामी केली. पण भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडला चांगले माहीत आहे की ‘न्यायप्रिय हिंदू हा मुळातच सहिष्णु आहे. त्याला पुन्हा पुन्हा अवमानित केले तरी तो केवळ आपल्या रक्षणासाठीच शक्तीचा वापर करतो.’ त्यामुळेच मोदींचा पाठलाग करणारे इंग्लंडच्या धरतीवरही गेले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अशा प्रवृत्तीचे लोक कोणताही बुरखा पांघरून आले तरी तो बुरखा फाडणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमीचे कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही...
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-mujaffar-hussen-column-on-secularism-5172867-NOR.html

Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)