Saturday, September 24, 2011

अण्णा, आता हे जरा अतीच होतंय...

अण्णा, तुमच्याबद्दल केवळ आमच्याच नव्हे तर कोट्यवधी भारतीयांच्या मनात नितांत आदर आहे. तुम्ही राळेगणसिद्धीचा केलेला कायापालट हा कोणालाही नतमस्तक व्हायला लावणाराच आहे, याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे काहीही कारण नाही.
तुम्ही आणि समाजाची काळजी असणा-या तुमच्यासारख्या काही लोकांमुळेच या देशाला माहितीचा अधिकार मिळाला आहे. आज याच माहितीच्या अधिकारामुळे अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. टू जी घोटाळ्यात चिदंबरम आणि पंतप्रधानही लिप्त असल्याचे केवळ माहितीच्या अधिकारामुळेच पुढे येवू शकले. तुमच्या या कार्यामुळेच तुमच्याप्रती मनात आपुलकीची भावना आहे. तरीही लहान तोंडी मोठा घास घेत म्हणावेसे वाटते, 'अण्णा, आता हे जरा अतीच होतंय...'
तुम्ही कन्याकुमारी येथे राहून लिहिलेले 'माझे गाव - माझे तीर्थ' हे आत्मचरित्र मी वाचले आहे. तरीही 'हे जरा अतीच होतंय...' म्हणणे धाडसाचे होईल, हे खरेच. पण तुमचे आंदोलन भरकटत असताना ते पाहवत नाही.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ...
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-anna-hajare-this-is-too-much-2455910.html?HT5=

1 comment:

  1. Mayur Deolasee25.9.11

    सिद्धाराम्जी तुमचा लेख वाचून प्रचंड निराशा झाली. तुम्ही पूर्वी दुसरीकडे काम करीत होता तेव्हा वेगळे लिहित होतात पण आता तुमचा सूर पूर्णतः बदललाय. तुम्ही निष्ठा बदलतंय, तुमच्या लेखांमुळे तुमच्याविषयी माझा एक देशभक्त संपादक असा ग्रह झाला होता पण ह्या लेखाने प्रचंड शंका उभ्या केल्या आहेत. तुम्हाला काय लिहायचे हे सांगणारी स्वतंत्र यंत्रणा आहे असे वाटत आहे. कॉंग्रेसची चमचेगिरी प्रिंटेड मिडिया ने करणे यात काहीही नवल नाही पण तुम्ही सुद्धा ...
    तुम्ही तुमच्या अत्मानिष्ठेला स्मरून विचार करून लिहावे हि कळकळीची विनंती तरी तुमच्या पर्यंत पोचावी हि अपेक्षा आहे.

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी