Monday, November 7, 2011

विवेकानंद केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

धर्मशाला. विवेकानंद केंद्र या अध्यात्मप्रेरित सेवा संघटनेला यंदाचा सतपाल मित्तल राष्ट्रीय घोषित झाला आहे. कन्याकुमारी येथे मुख्यालय असलेल्या विवेकानंद केंद्राने देशाच्या विविध भागात मानवता जपत सेवाकार्ये उभी केली केली आहेत, त्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विवेकानंद केंद्राच्या सरचिटणीस रेखा दवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नेहरू सिद्धांत केंद्र ट्रस्ट लुधियानाच्या वतीने हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विवेकानंद केंद्र करीत असलेल्या सेवाभावी कार्यांचा विचार पुरस्कार देताना करण्यात आल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. दि. 11 नोव्हेंबर रोजी लुधियाना येथे होणा-या कार्यक्रमात विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बालकृष्णन हे पुरस्कार स्वीकारतील, अशी माहिती ट्रस्टचे प्रेम अगरवाल यांनी दिली. दोन लाख रुपये आणि सुवर्णपदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मनुष्य निर्माण आणि राष्ट्रपुनरुत्थान या ध्येयाने विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ही संघटना कार्यरत असून अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आदी दुर्गम भागात केंद्राकडून शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य सुरू आहे. याशिवाय देशभर २४२ शाखांच्या माध्यमातून योग, स्वाध्याय आणि संस्कार याद्वारे केंद्राचे कार्य सुरु आहे.


No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी