Tuesday, December 20, 2011

गीतेवरील बंदीमागे ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्च

नवी दिल्ली  - गीतेच्या 'महाभारता'वरून रशियामध्ये काम करणा-या भारत, बांगलादेश, नेपाळसह अनेक देशांतील हिंदू समुदायातील लोकांनी हिंदू कौन्सिलची स्थापना करून प्रस्तावित बंदीला विरोध केला आहे. साधुप्रिय दास यांची इस्कॉनच्या रशियन विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपली संघटना मॉस्को येथील भारतीय दूतावासाशी व पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहे, असे दास यांनी म्हटले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-chaos-over-move-to-ban-geeta-in-russia-2656436.html

इस्कॉनचे संस्थापक स्व. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 'भगवत गीता अॅज इट इज' नावाने गीतेचा अनुवाद केला आहे. या अनुवादासह अन्य हिंदू साहित्यावरही बंदी घालावी, अशी मागणी रशियातील ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्चने केली आहे. या साहित्यामुळे धार्मिक सलोख्याला हानी पोहोचते, असा युक्तिवाद न्यायालयात केला जात आहे. (युरेनियम साठ्यावर बसलेले भुजंग - ख्रिश्‍चन मिशनरी )
 भगवद्गीता हा ग्रंथ अतिरिकी साहित्य आहे, या सबबीखाली रशियामध्ये बंदी घातली जात असल्याच्या वृत्तावरून संसदेमध्ये सर्व पक्षांच्या सदस्यांनी एकच गोंधळ केला. तर देशात विविध ठिकाणी तीव्र निदर्शने करून या हालचालीला विरोध दर्शविण्यात आला. यात कोलकात्यामध्ये इस्कॉन समूहाने रशियाच्या दूतावासासमोर जोरदार निदर्शने केली.
लोकसभेमध्ये राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि सपा नेते मुलायमसिंह यादव यांनी सर्वप्रथम रशियातील मोहिमेला विरोध दर्शवला. यानंतर भाजप, बसपा, जदयू, शिवसेना आणि बिजू जनता दलच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. कृष्ण भगवान  की जय, गीतेचा अवमान सहन केला जाणार नाही आदी घोषणांनी सभागृह दणाणले होते.
सायबेरियातील तोम्स्क सिटी न्यायालयामध्ये सोमवारी गीतेवर बंदी घालण्यासंबंधीच्या प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये इस्कॉनच्या वकिलांनी रशियाच्या लोकपालसह मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग विशेषज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर न्यायालयाने 28 डिसेंबरपर्यंत सुनावणी लांबणीवर टाकली. त्याआधी रशियाचे लोकपाल व्लादिमीर लुकीन म्हणाले की, इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांनी लिहिलेल्या 'भगवद्गीता अ‍ॅज इट इज'(भगवत गीता जशी आहे तशी) या ग्रंथाला जगभरात गौरवले आहे. अशा ग्रंथावर रशियात बंदी घालणे अस्वीकारार्ह आहे.
रशियामध्ये हिंदू धर्मीयांचे हक्क सुरक्षित राखले जावेत, अशी अपेक्षा सदस्यांनी केली. रशियातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहावे, अशी मागणी करत बिजू जनता दलाचे खासदार भर्तृहरी महताब यांनी हा मुद्दा उपस्थित केला. खासदारांच्या या गोंधळात दुपारी 2.00 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. रशियातील हिंदूंचे हक्क कायम राहावेत अशी मागणी महताब यांनी व्यक्त केले.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी