Sunday, August 19, 2012

आस्वादक व्हायला हवे!


विवेक घळसासी
एक छोटा मुलगा, आज त्याने काही ठरवले आहे. त्या देवाबरोबर जेवायचे आहे. तो देवाच्या शोधात निघाला. काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला. खूप चालला. एका बागेत गेला. थोडी विर्शांती घेण्यासाठी एका बाकावर बसला. जवळच एक म्हातारी होती. तिच्याकडे त्याचे लक्ष गेले. तिला बहुधा तहान लागलेली होती. त्याने जवळचे पाणी तिला दिले. ती पाणी प्याली.

बाटली परत देताना ती हसली. इतके सुंदर हसणे तो प्रथमच बघत होता. त्याने तिला खाऊ दिला. ती परत तसेच हसली. ते हास्य बघण्याचे त्याला वेडच लागले. तो उठला. दिवस सरत आला होता. आता त्याला घरी परतायचे होते. तो तिथून निघाला. थोडे पुढे गेला. वळून पाहिले. ती म्हातारी गोड हसत होती. तो धावत तिच्याकडे आला. तिला मिठी मारली. तिनेही प्रेमाने त्याला कुशीत घेतले. जराशाने तो निघाला. घरी पोचला. आज तो खूपच खुश दिसत होता. आईने विचारले तसा तो म्हणाला, ‘देव कितीतरी थकला होता आई! भुकेला, तहानेलाही होता. तरी खूप गोड हसत होता.’

इकडे
ती म्हातारीही घरी पोचली. केवढी आनंदी, केवढी तृप्त! रोजचा शीण नव्हता. एकटेपणाची बोच नव्हती. तिच्या मुलाला सारेच अनपेक्षित होते. ‘कुठे होतीस दिवसभर?’ त्याने आईला विचारले. ती दैवी तंद्रीतच होती. म्हणाली, ‘मला वाटत होते त्यापेक्षा खूप तरुण आहे देव! तरुण कसला? बालच!! मागता मला सारे दिले. प्रेमाने मिठीही मारली!’ म्हातारीच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता. केवढा आनंद, केवढी तृप्ती, केवढे समाधान!! माझ्या मेलबॉक्समध्ये आलेली ही छोटीशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि म्हातारीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला. सारे अध्यात्म एक छोट्याशा गोष्टीत ठासून भरल्याचे मला जाणवले. हजार धर्मग्रंथांचे सार एका गोष्टीत साठवणार्या कुणा अज्ञात लेखकाचे मला खूप कौतुक वाटले. देवाला निवृत्त करायला निघालेल्या किंवा देवाला शोधायला निघालेल्या प्रत्येकानेच ही गोष्ट वाचली पाहिजे. या एका गोष्टीत सार्या शंकांचे समाधान सापडते.

देवाला
शोधणे हा माणसाचा अनंत कालापासूनचा ध्यास आहे. सारे पंथ, सारे संप्रदाय आपापल्या आवडीनुसार देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. रस्ते हजारो, पद्धती हजारो शोध मात्र एकाच तत्त्वाचा! र्शद्धाळू त्यांच्या पद्धतीने तर शास्त्रज्ञ त्यांच्या पद्धतीनेविश्वाचे मूळसमजून घेण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. ज्ञानी, विज्ञानी, ध्यानी, योगी सारेत्यालाशोधत आहेत. आयुष्य पणाला लावून हा शोध सुरू आहे. अब्जावधी रुपये खचरूनगॉड पार्टिकलमिळवला जातो आहे. हे सारे छानच आहे. ‘देवकणहाती लागला तरी शोध पूर्ण होत नाही. अशा वेळी काय करावे याचे उत्तरही हीमुलगा, म्हातारीचीगोष्ट देते.

‘कणात
गवसले तेमणातमिळेलच असे नाही. कणाकणानेचमणबनतो हेही आपण कुठे लक्षात घेतो? मण मिळवायच्या हव्यासात किती र्शीमंत कण ओघळून जातात हे कळतच नाही. हाती उरते ते उदास रितेपण! मुलाच्या खाऊने म्हातारीचे पोट कायमचे थोडेच भरणार आहे? पण तिची तृप्ती खाऊने दिलेली नव्हती तर मुलाच्या मिठीने दिलेली होती. मुलाला काय दान-धर्म केल्याचे समाधान होते का? छे, तो तर म्हातारीच्या हसण्याने संतृप्त होता. तात्पर्य काय? पळापळ थांबवून आपण प्रतिसाद देऊ तर देव आपल्या समोरच उभा आहे हे जाणवेल! समोरच नव्हे शेजारीही! शेजारीच नव्हे, तर आपल्या आतही! ‘सबाह्य अभ्यंतरी। अवघा व्यापक मुरारी।।होय ना? मग घडघडून हो म्हणून त्याला कवेत घ्या ना!!

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी