Tuesday, April 2, 2013

वर्धापन दिन विशेष : सोलापूरची जागतिक ओळख


प्राचीन काळी सोन्नलपूर नावाने प्रसिद्ध असलेले सोलापूर हे ऐतिहासिक शहर आहे. भुईकोट किल्ला, तलावाच्या मध्यभागी वसलेले ग्रामदैवत सिद्धेश्वराचे मंदिर या वैशिष्ट्यांसोबतच जागतिक स्तरावर नोंद घेण्याजोग्या अनेक गोष्टी सोलापूरशी निगडित आहेत.
द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, सीताफळ, बोर या कृषी मालाची बाहेरील देशांत मोठय़ा प्रमाणात निर्यात होते. 300 कोटींच्या वस्त्रोद्योग उत्पादनाची दरवर्षी सोलापुरातून निर्यात होते. सोलापूरच्या वस्त्रोद्योगात सुमारे 5 हजार उत्पादक असून 70 हजारांहून अधिक कामगार आहेत.

सर्वाधिक साखर कारखाने
सर्वाधिक साखर कारखाने असलेला एकमेव जिल्हा म्हणून सोलापूरने ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात 28 साखर कारखाने आहेत.

स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर
पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील उजनी जलाशय स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिथे दरवर्षी रोहित, नदी सुरयी, चित्रबलाक, कुरव, विविध प्रकारचे करकोचे असे 70 प्रकारचे परदेशी पक्षी स्थलांतर करून येतात. त्यापैकी काही सायबेरिया, युरोप व मध्य आशियातूनही येतात. बहुतांश पक्ष्यांचे थंडीमध्ये आगमन होते. त्यानंतर उन्हाळ्यात ते माघारी परततात. सोलापुरातील धर्मवीर संभाजी तलाव आणि हिप्परगा तलाव येथेही दरवर्षी बाहेरील देशांतून शेकडो पक्षी येतात
.http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-foundation-day-special-solapurs-world-identity-4222970-NOR.html

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी