Thursday, September 1, 2011

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल

माझी केवळ विचार करण्याची क्षमताच शाबूत आहे; उर्वरित शरीर प्राण असूनही निपचित होतं. अचानक भेटायला येणाऱ्यांना थांबविण्यात आलं. डॉक्टर शस्त्रसज्ज होऊन आले. "गळ्याच्या इथे थोडं काम आहे. थोडा त्रास होईल, काही नाही', असे ते म्हणाले. आता येईल त्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी मी कधीच केली होती. थोडा अधिक त्रास व्हायचा तेव्हा मी श्वासासोबत मनातल्या मनात ओम्‌कार उच्चारण करीत असे. माझ्या गळ्यातून एक वीतभर लांब नळी हृदयाच्या दिशेने...
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने part 1

 मु. पो. यशोधरा हॉस्पिटल part 2

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो part 3


Wednesday, August 31, 2011

जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने

हा जीबीएसचा आजारच मोठा चमत्कारिक आहे. सगळे आजार रोगप्रतिकार शक्तीच्या
कमतरतेमुळे होतात, तर म्हणे हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या
हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं,
पाय, हात आणि हळूहळू फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला करतो. लाखात केवळ
दोन-चारजणांना होणारा हा आजार! या आजारानं मला पछाडलं होतं. त्या
गोष्टीला आज 15 ऑगस्ट 2010 ला बरोबर 1 वर्ष झालं. हा भयंकर आजार पूर्णपणे
बरा व्हायलाही काही महिन्यांपासून ते दीड-दोन वर्षांचा कालावधी लागतो.
पूर्ण lekhasathi खाली क्लिक करा...
http://psiddharam.blogspot.com/2010/08/12.html

Monday, August 29, 2011

स्वामी विवेकानंदांवरील परिसंवादात रमली मुंबईची तरुणाई

मुंबई. स्वामी विवेकानंद यांना युथ आयकॉन समजले जाते. विवेकानंद जयंती देशभर युवा दिवस म्हणून साजरा होतो. दि. २५ आणि २६ ऑगस्ट रोजी मुंबईतील रुईया आणि जोशी बेडेकर महाविद्यालात स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञावर राष्ट्रीय परिसंवाद पार पडले. या परिसंवादात युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.  
भारत जसा आहे तसा त्यावर प्रेम करा. भारतातल्या गरीब, दुखी-पिडीतांवर प्रेम करा. प्रत्येक जीव ईश्वराचेच रूप आहे त्यामुळे माणसातल्या ईश्वराची पूजा करणे सर्वश्रेष्ठ पूजा आहे, असा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. तो विचार आज कृतीत आणण्याची गरज आहे असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बी. निवेदिता यांनी केले.
पूर्ण बातमीसाठी खाली क्लिक करा...

Wednesday, August 24, 2011

इमामाचा देशद्रोही फतवा

शाही इमाम बुखारी यांनी अण्णांच्या आंदोलनाच्या संदर्भात एक फतवा काढला आहे. अण्णांचे आंदोलन इस्लामविरोधी असल्याने या आंदोलनात मुस्लिमांनी भाग घेऊ नये, असे या फतव्यात म्हटले आहे. या फतव्यामध्ये अण्णांच्या आंदोलनाला इस्लामविरोधी ठरविण्यासाठी इमामाने जे कारण दिले आहे ते संताप आणणारे, कीव करण्यासारखे आहे. अण्णांच्या आंदोलनात 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' अशा घोषणा दिल्या जात असल्याने हे आंदोलन इस्लामविरोधी असल्याची बांग शाही इमामाने दिली आहे. या देशातील कोणत्याही देशभक्त माणसाच्या संतापाचा भडका उडावा, असा हा फतवा आहे. भारत माता की जय याला जर यांचा विरोध असेल, तर यांना सडेतोडपणे सांगावे लागेल की अरे भारत माता की जय ही या देशाच्या राष्ट्रगीताचा भाग असणारी घोषणा आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात देशातील सामान्यातला सामान्य माणूस जात, पात, पंथ सर्व विसरून देशभक्तीच्या भावनेने सहभागी झाला आहे. अशावेळी देशाच्या जयजयकाराच्या विरोधात इमामाने फूत्कार टाकणे हे संताप आणणारे आहे. लांगूलचालनाचा परिणाम राष्ट्रद्रोहाकडे कसा घेऊन जातो याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हटले पाहिजे. मात्र, इमामाच्या या फतव्याला मुस्लिम समाजातीलच काही लोकांनी धुडकावून लावले, हे बरे झाले. मुस्लिमांच्या उलेमा कौन्सिलने इमामाच्या फतव्याला कडाडून विरोध केला आहे. अण्णांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील लोक सहभागी झालेले असून, इमामांचा फतवा चुकीचा आहे, असे या उलेमा कौन्सिलने म्हटले आहे. उलेमा कौन्सिलच्या या मतापाठोपाठ दोन हजार मुस्लिमांनी जनता दलाचे खासदार अली अन्वर यांच्या नेतृत्वाखाली मुद्दाम नॉर्थ एव्हेन्यू पासून रामलीला मैदानापर्यंत मोर्चा काढून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रामलीला मैदानावर आंदोलनात सहभागी होण्याची कृती केली. इस्लामचा चुकीचा अर्थ काढून कोणी मुस्लिमांना गुमराह करत असतील, तर यापुढे या देशात हे चालणार नाही, हेच या मुस्लिमांनी जणू निक्षून जतावले आहे. सगळे मुस्लिम हे आपल्या हातात आहेत, अशा आविर्भावात त्यांच्या आधारे देशद्रोहाच्या टोकाला जाऊन वाटमारी करण्याचा धंदा यापुढे चालणार नाही, असा देशद्रोही धर्मांधांना हा इशारा आहे. यात आणखी एक शंका येते आहे ती कुजक्या राजकारणी, कॉंग्रेसी कारस्थानाची. अण्णांच्या आंदोलनात विक्षेप आणण्यासाठी ही मंडळी मुस्लिम, दलित यांना भडकावून देण्याचे कपटकारस्थान करण्याच्या मागे आहेत की काय? काही दलित संघटनांनी विनाकारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत अण्णांच्या आंदोलनाच्या विरोधात निदर्शने करण्याचा प्रयत्न केला होता. हा फार्स प्रायोजित असण्याची शक्यता होती. त्याच मालिकेत शाही इमामाचा हा फतवाही अण्णांचे आंदोलन ज्यांना सोयीचे नाही, त्या राजकीय नतद्रष्ट लोकांकडून प्रायोजित असू शकतो. या देशात अल्पसंख्यकांचे विषय संवेदनशील बनवून त्या आधारे भडका उडवून द्यायचा आणि त्या धगीवर राजकीय पोळ्या भाजण्याचा धंदा खूप आधीपासून चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कारस्थान खेळले जात आहे. घटना हा दलित समाजाच्या श्रद्धेचा भाग बनवायचा आणि नको तेव्हा त्या श्रद्धेला आवाहन करून कामाला लावायचे, असा यांचा धंदा आहे. वास्तविक या देशात आजवर कपट कारस्थान करणार्‍या याच लोकांनी राजकीय खुर्ची वाचविण्यासाठी देशाची घटना गुंडाळून आणिबाणी आणली, अनेकदा सोयीनुसार घटनादुरुस्त्या केल्या. कितीतरी वेळा घटनेची पायमल्ली केली आणि आता केवळ अण्णांचे आंदोलन पराभूत करण्यासाठी हे दलित अस्मितेचे कार्ड खेळण्याचा सवंग डाव आखला गेला. अल्पसंख्यकांना भडकवून अण्णांच्या आंदोलनाला अपशकून करण्याचे कारस्थानही या लोकांनी केले असावे. शाही इमामांनी केवळ वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणांना विरोध नोंदवून गप्प बसायला हवे होते. तसे न करता इमामांनी, 'मुस्लिम समाजातील लोकांनी अण्णांच्या आंदोलनात भाग घेऊ नये' असे केलेले आवाहन वेगळीच शंका उत्पन्न करणारे आहे. शाही इमामांचा रोख वंदे मातरम्, भारत माता की जय यावर नाही. या दोन घोषणांचा हवाला देत इस्लामी समाजाला या आंदोलनापासून तोडण्याचे हे कारस्थान आहे, असे वाटू लागले आहे. ख्रिश्‍चन संघटनांनी मोर्चा काढून अण्णांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याचे वृत्तही आले आहे. वास्तविक अण्णांचे आंदोलन सर्व जात, पंथ, भाषा यापासून मुक्त आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून सर्व जाती-पंथाचे लोक या आंदोलनात उतरले आहेत. अशावेळी केवळ ख्रिश्‍चन समाजाने वेगळा मोर्चा काढण्याची काही गरज नाही. भ्रष्टाचार हा एक दुर्गुण आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन या सर्वांनाच भ्रष्टाचाराचा त्रास होतो. या देशातून भ्रष्टाचार हद्दपार व्हावा, ही सगळ्यांचीच तीव्र इच्छा आहे. सर्वांनी मिळून लढा दिला तरच तो यशस्वी होईल. त्यातून वेगळी चूल मांडण्याची गरज नाही. अण्णांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी रा. स्व. संघाच्या मंगलोरजवळ पुत्तूर येथे झालेल्या बैठकीत भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर अण्णांचे आंदोलन सुरू झाले. त्याचाही दुरुपयोग करत अण्णांचे आंदोलन हे संघाचे कारस्थान आहे, अशा घाणेरड्या पातळीवर कॉंग्रेसच्या मंडळींनी कुप्रचार सुरू केला होता. आता तसे होऊ नये म्हणून संघाने अत्यंत संयमाने खबरदारी घेतलेली दिसते आहे. अण्णांचे आंदोलन बदनाम करण्याचा तो हुकमी मार्ग बंद झाल्याने इस्लाम, दलित या समाजघटकांना उत्तेजित करून, भडकवून देऊन हे आंदोलन हाणून पाडण्याची एक घाणेरडी खेळी आहे की काय? कोणी कसलीही खेळी करोत की राजकारण करोत आता यापुढे या देशात वंदे मातरम् आणि भारत माता की जय या घोषणांना, राष्ट्रगीतांना केलेला विरोध सहन केला जाणार नाही, हे निक्षून सांगण्याची वेळ आली आहे. ज्यांना वंदे मातरम् आणि भारत माता की जय मान्य नसेल त्यांना या देशाच्या भूमीवर एक क्षणभरही राहण्याचा अधिकार नाही, हे आता कोणताही संदेह मनात न ठेवता अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. देशद्रोहाची भावना भडकवून देऊन आपले राजकीय स्वार्थ साधण्याचा आगीशी खेळ कोणी करत असेल, तर त्यांनाही कायमचा धडा देण्याची वेळ आता आली आहे. मुस्लिम, दलित समाजातील विचारी लोकांनीच त्या त्या वेळी पुढे येऊन मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून त्यांना भडकवून देऊन तोडण्याचे जे कारस्थान खेळले जाते, ते हाणून पाडले पाहिजे. हे लांगूलचालनाचे, हे अस्मिता भडकवण्याचे, हे देशद्रोही सौदा करण्याचे प्रकार करण्याचा विचारही मनात येणार नाही, अशी शिक्षा अशा प्रकारचा खेळ करणार्‍या कुटिल लोकांना भारतातील सामान्य लोकांनी दिली पाहिजे. यापूर्वी लांगूलचालनाच्या असल्या घाणेरड्या प्रयोगांमुळेच स्वातंत्र्याच्या चळवळीत कॉंग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण वंदे मातरम् म्हणण्यास तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षाने विरोध केला. त्याला न जुमानता विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी वंदे मातरम् गायिले. कॉंग्रेस अध्यक्ष मंचावरून निघून गेले. त्याचवेळी त्यांना अडवून, जर तुम्हाला वंदे मातरम् मान्य नसेल तर स्वातंत्र्याच्या चळवळीत तुम्हाला काडीचे स्थान नाही, असे म. गांधींसारख्यांनी सांगितले असते तर पुढे कदाचित देशाची दुर्दैवी फाळणी झालीच नसती. आता तरी त्या चुका पुन्हा होता कामा नयेत. शाही इमामाने कोणत्याही हेतूने केलेले असेना, पण त्यांचा फतवा हा सरळ सरळ देशद्रोहाचे आवाहन करणारा असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला भरण्याची गरज आहे.

( साभार : तरुण भारत )

Monday, August 22, 2011

रामलीला मैदानावरील जिवंत छायाचित्रे

या छायाचित्रांवर वेगळ्याने भाष्य करण्याची आवश्यकता नाही. ही खूपच बोलकी छायाचित्रे आहेत. ही छायाचित्रे स्वत पाहा... इतरांनाही पाठवा...
रामलीला मैदानावरील जिवंत छायाचित्रे ... साभार : दै. भास्कर 

 
 

 

 

 

 

 

 
 

 

 
 

 
 

 
 

 

 

मावळ फोडणे 'काका'ला जमले नाही...

मावळ हा पूर्वी जनसंघाचा व आत्ता भाजपचा बालेकिल्ला. तो फोडणे 'काका'ला जमले नाही. ७२ च्या निवडणुकीत मावळमधून कृष्णा भेगडे निवडून आले. 'काकांनी' आणीबाणीचा फायदा उठवला. भेगडे यांना  काँग्रेसमध्ये यायला भाग पाडले. आत्ता मावळचे आमदार भाजपाचे संजय भेगडे आहेत, तर खासदार शिवसेनेचे गजानन बाबर आहेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना मावळमध्ये तो नसल्यामुळेच मावळ प्रकरण हाताळताना संवेदनशीलता दाखविली गेली नाही, असे म्हणणे चुकीचे होईल काय ?
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
विचार महाराष्ट्राचा
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-mawal-firing-and-we-2370315.html?HT5=

मावळ्यांचे अश्रू तुम्हाला व्यथित करतात का ?

राज्यात गृहमंत्री राष्ट्रवादीचा. राहुल गांधींच्या भेटीने राष्ट्रवादीचे नाक कापले गेले अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली. परिणामी अजित पवार यांनी वक्तव्य दिले की, 'अण्णा हजारे यांना अटक करून केंद्र सरकारने घोडचूक केली.' मावळचा हा उत्तर रंग. उट्टे काढून झाले. या सा-या प्रकरणाचे सेना-भाजप या पक्षांनी राजकारण केले, असा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला. विषय संसदेत गेला. एक दिवस देशाचे सर्वोच्च सभागृह बंद पाडले गेले. सरकारने पोलिस शिपायांना निलंबित करण्याची तत्परता दाखविली. (अर्थात काही दिवसांनी ते पुन्हा नोकरीवर रुजू होतील.) उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशाकरवी या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

विचार महाराष्ट्राचा : पवनाकाठच्या मावळ्यांचे अश्रू तुम्हाला व्यथित


Friday, August 19, 2011

... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप

त्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे ? मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेड्यात काढले जाते, जातीयवादाचा शिक्काही मारला जातो. तरीही मला वाटते की हा विषय लोकांपर्यंत नेणे देशहिताचे आहे. संत तुकोबा म्हणतात, 'सत्य काय आहे हे मला समजले आहे, त्यामुळे बहुमत काय आहे याची मला फिकीर नाही.'
या देशातील तथाकथित विचारवंत, धर्मनिरपेक्षवादी वगैरे काय बोलतात यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणे अधिक महत्वाचे आहे. सोनिया गांधी यांचा कल देशविरोधी शक्तींकडे असल्याचे पुरावे येथे देत आहे. सोनिया गांधी संचालक असलेली संस्था काय करते हे तुम्हीच त्या संस्थेवर पाहा...


या ग्रेट महाराणी को प्रेसिडेंट असलेल्या संस्थेच्या संकेत स्थळाच्या तळाशी पाहा... मग तुम्हीच ठरवा ही संस्था काय काम करते ते...

http://www.nancho.net/fdlap/fdlalert.html
हे दुसरे फई connection तर नाही ? UPA जागा हो... ISI विषयी प्रेम असलेली व्यक्ती तुमच्या अध्यक्षस्थानी आहे...
फई connection समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-fai-ghulam-nabi-and-kasmir-issue-2287104.html   


स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी

नागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg0WN50SPUPRr6uNRE-BO-_wLjy6gWBVmm0RzYw8wSd7fWXYJfH2kVhkq8Ey0VgCve_MqPvwRUFHIUL_jwpKYFVNALjssZHpq5kjT6NQauDCKs-uuDw68sbgE1-zXdl5lNpf1IylFNfy16i/s1600/soniasudarshan.jpg



Monday, August 15, 2011

स्वातंत्र्य दिन विशेष : ... म्हणून भारत महान आहे !


जगात सर्वात कार्यक्षम आणि सर्वात वजनाने हलकी, लहान लढाऊ विमान भारताने विकसित केले आहे.

कांची पीठातर्फे चालवली जाणारी चेन्नई येथील शंकर नेत्रालय हे आधुनिकता आणि सेवा यात आशिया खंडात सर्वप्रथम आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे दररोज 59 लाख प्रवाशांची वाहतूक करते. जगातली ही सर्वाधिक संख्या आहे.

जगात सर्वात कार्यक्षम आणि सर्वात वजनाने हलकी, लहान लढाऊ विमान भारताने विकसित केले आहे.

Friday, August 12, 2011

माध्यमांनी सरकारचा दुटप्पीपणा देशासमोर आणावा : केजरीवाल

जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणारे सदस्य हे निर्वाचित नसल्याचे सांगत केंद्र सरकार जनलोकपाल विधेयकाला विरोध करीत आहे. दुसरीकडे मात्र निर्वाचित नसलेल्या सदस्यांकडून तयार करवून घेतलेले 'प्रिव्हेन्शन ऑफ कम्युनल अ‍ँड टार्गेटेड व्हायलन्स बिल' या पावसाळी अधिवेशनात मांडण्याची तयारी केंद्र सरकार करीत आहे. यावरून सरकारचा दुटप्पीपणा दिसून येतो. यापुढे आम्ही हा मुद्दा जोरकसपणे समाजासमोर मांडू, असे सूतोवाच सामाजिक कार्यकर्ते आणि अण्णा हजारे यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
माध्यमांनी सरकारचा दुटप्पीपणा देशासमोर आणावा : केजरीवाल 
हिंदूंच्या जीवावर उठलेले "सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक"

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी