विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याची शक्ती
सावरकरांच्या विचारात - सिद्धाराम पाटील
सोलापूर : सामरिक आणि अन्य सामाजिक विषयांवरील सावरकरांचे विचार भारताला शक्ती देणारे आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे सामर्थ्यही सावरकरांच्या विचारात आहे, असे विचार तरुण भारतचे उपसंपादक सिद्धाराम भै. पाटील यांनी व्यक्त केेले.
सोलापूर बार असोशिएशनच्या वतीने सावरकर पुण्यतिथीनिमित्त जिल्हा न्यायालयाच्या आवारातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. एन. आदमने व बार असो.चे अध्यक्ष ऍड. डी. जी. चिवरी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वात आधी उडी घेतलेले आणि सर्वात शेवटपर्यंत सक्रीय राहिलेले क्रांतीकारी देशभक्त होते. मदनलाल धिंग्रा, भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र आदींनी सावरकरांपासून प्रेरणा घेतली होती. चीन आणि पाकिस्तानच्या कारवाया पाहता सावरकरांचे द्रष्टेपण अधिकच ठळक होते. आपण कोणत्याही क्षेत्रात राहून देशभक्ती करू शकतो, परंतु यासाठी राष्ट्रीय दृष्टी पाहिजे, ती सावरकरांच्या वाङमयातून मिळते, असे पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार असो.चे सचिव श्रीनिवास कटकूर, वक्त्यांचा परिचय ऍड. अमृत बिराजदार आणि आभारप्रदर्शन ऍड. स्वाती आयगोळे यांनी केले.
No comments:
Post a Comment