Tuesday, June 1, 2010

"शांतीदूत' येशूचे बंदूकधारी शिष्य

अरुणाचल प्रदेश हा भारताचा सौभाग्यालंकार आहे. सूर्यनारायणाची चाहूल भारतात पहिल्यांदा याच प्रदेशाला लागते. निसर्गरम्य असलेल्या या प्रदेशावर कपटी चीनचा डोळा आहे. सुमारे 55 हजार चौरस किलोमीटरची भारतभूमी गिळंकृत करूनही चीनची मुजोरी थांबलेली नाही. चीनमधल्या शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांतून अरुणाचल हा चीनचा भूप्रदेश असल्याचे व भारताने बळकवल्याचे शिकविले जाते. चीनच्या कुरापत्या कमी म्हणून की काय ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गेल्या तीन दशकांपासून अरुणाचलात उच्छाद मांडला आहे.

भारतातील शहरी भागांमध्ये हिंदू धर्माबद्दल अपप्रचार करून धर्मांतरण करण्याचा ख्रिस्ती मिशनरी नेहमीच प्रयत्न करतात. कुणी आजारी असेल तर त्यांच्या मागे लागून प्रार्थनेला चला, येशू आजार बरा करतो, असे सांगत तर कधी चर्चमध्ये प्रार्थनेला चला तुम्हाला चांगली नोकरी लागेल अशी आमिषे दाखवत धर्मांतराचा प्रयत्न केला जातो. सोलापुरातल्या एका ख्रिस्ती डी.एड. कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी काही मुलींना ख्रिस्ती व्हावे लागले होते. अशी किती उदाहरणे सांगावीत? परंतु अरुणाचल प्रदेशात मिशनऱ्यांनी अवलंबलेला मार्ग ख्रिस्ती धर्माला लांच्छन लावणारा आहे.
ब्रह्मदेश आणि नागभूमी (नागालॅंड)च्या सीमावर्ती भागातील गावकऱ्यांना एनएससीएन (आय.एम.) या अतिरेकी संघटनेने जबरदस्तीने ख्रिस्ती करण्याचे अभियान सुरू केले आहे. यासंबंधीचे वृत्त सोमवार, दि. 31 मे 2010 च्या टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. अरुणाचलातील या दुर्गम भागातील वनवासी बांधव हे मोठ्या प्रमाणात बौद्धधर्मीय अथवा निसर्गपूजक (दोन्यी-पोलो अर्थात चंद्र-सूर्याचे उपासक आहेत.) आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अरुणाचलातील चांगलांग आणि तिराप हे जिल्हे म्हणजे एनएससीएनच्या अतिरेक्यांचे नंदनवनच बनले आहेत.
"नागालॅंड फॉर ख्रिस्त' हे एनएससीएनचे ब्रीद आहे. लांगमन या गावातील लोकांना एनएससीएनने सात दिवसांच्या आत ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करा, अशी चेतावनी दिली आहे. अरुणाचल प्रदेश, नागभूमी, मणिपूर आणि त्रिपुरा हा ईशान्य भारताचा प्रदेश ख्रिस्तीबहुल करून भारतापासून तोडण्याच्या षड्‌यंत्राने गती घेतल्याचे दिसत आहे. सध्या या षड्‌यंत्रांतर्गतच नागभूमीतल्या ख्रिश्ननांनी गेल्या दीड महिन्यापासून मणीपूरला जाणारा प्रमुख महामार्ग रोखून धरला आहे. 4 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या संसदेत हिलरी क्लिंटन यांनी गे्रटर नागालॅंड (अर्थात ख्रिस्तीदेश) निर्मितीसाठी अमेरिकेने प्रयत्न करावेत, असे म्हटले होते. आता ग्रेटर नागालॅंडवाले आणखी सक्रिय झाले आहेत. मणीपूरवर दबाव आणला जात आहे. अरुणाचलात बंदुकीच्या जोरावर ख्रिस्तीकरण सुरू आहे. शांतीदूत म्हणवून घेणाऱ्या पांढऱ्या झग्यातील लांडग्यांचे खरे रूप समजून घेणे आज आवश्यक झाले असताना आमची प्रसिद्धीमाध्यमे मात्र या समस्येकडे पाठ फिरविताना दिसत आहेत.

1 comment:

  1. Anonymous2.6.10

    aaj hindusthan var dekhil kritich raaj karat aahe. nagaland, aassam mizoram, he sarv pradesh kristi aani muslimancya vilakhyat aahet.

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी