Sunday, May 22, 2011

तरुण भारतकडून निरोप
दै. तरुण भारतमध्ये ७-८ वर्षे पत्रकारिता केल्यानंतर आता मी भास्कर ग्रुपच्या ‘दिव्य मराठी’त जात आहे. त्यानिमित्ताने रविवार दि. २२ मे २०११ रोजी मला दै. तरुण भारतने समारंभपूर्वक निरोप दिला. माजी पेट्रोलियम मंत्री आदरणीय रामभाऊ नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दै. तरुण भारत, तरुण भारतचे संचालक श्री. दिलीप पेठे, श्री. सुजीत देसाई, माजी संपादक अरुण करमरकर, अनील कुलकर्णी, मार्गदर्शक श्री. विवेक घळसासी, संपादक श्री नारायण कारंजकर आणि माझे सहकारी मित्रांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. दै. तरुण भारतच्या हजारो वाचकांनी जे भरभरून प्रेम दिलं त्यांच्याविषयीही मनात आदराची भावना आहे.

तोडतोय बंधन क्षमा करा...
घर... दार... गावची सीमा... मला क्षमा करा...
सोलापूर तरुण भारत आणि वाचक...
तरुण भारतमधील आणि बाहेरील पत्रकारितेतील जिवाभावाचे मित्र...
सोलापूर विद्यापीठातील गुरुजन आणि मित्र...
विवेकानंद केंद्र आणि राष्ट्रीय विचारासाठी कार्य करणारे सर्व कार्यकर्ते...
तुमचे स्नेहबंधन मी अखेरपर्यंत जपेन...
आणखी काय लिहू...

तरुण भारतने रुजवलेले संस्कार आणि मूल्य जपण्याची शक्ती मिळू दे हीच भारतमातेचरणी प्रार्थना...

सिद्धाराम...
२२ मे २०११, सायं. ७.३५

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी