Tuesday, October 25, 2011

चाणक्य नीती 10 : अशा स्त्री, मित्र किंवा नोकरासोबत कधीही राहू नका

आपल्या आसपास अनेक प्रकारचे लोक असतात. काही आपले नातेवाईक असतात, काही मित्र, नोकर आदी असतात तर काही अनोळखी. प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. काही चांगल्या स्वभावाचे असतात तर काही दुष्ट स्वभावाचे. आचार्य चाणक्य यांनी आपल्याला कशा लोकांसोबत राहू नये याचे मार्गदर्शन केले आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात,
दुष्टा भार्या शठं मित्रं भृत्यश्चोत्तरदायक:।
स-सर्पे च गृहे वासो मृत्युरेव न संशय:।।
या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे....
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-chanakya-niti-woman-wife-friend-servant-life-management-2524385.html

 

दुष्ट स्वभावाची, कटू बोलणारी, वाईट चारित्र्याची स्त्री, नीच आणि कपटी मित्र, उलट बोलणारा नोकर आणि ज्या घरात वारंवार साप निघतात असे ठिकाण त्यागले पाहिजे. अशा लोकांसोबत, अशा ठिकाणी रहाणे म्हणजे मृत्यूच्या सानिध्यात रहाणे होय. अशा लोकांपासून सदैव मृत्यूची भीती असते.
आचार्य यांच्या मतानुसार ज्या स्त्रीचे चारित्र्य अपवित्र आहे, स्वभावाने दुष्ट आहे अशा स्त्रीसोबत रहाणा-या माणसाचे जीवन सदैव संकटांनी भरलेले असते. अशा स्वभावाच्या स्त्रीच्या पतीचे जीवन मृत्यूसमान असतो.
याशिवाय ज्या लोकांचे मित्र कपटी आणि नीच स्वभावाचे असतात त्यांच्यावर विश्वास टाकू नये. अन्यथा ते कधी धोका देतील कळायचेसुद्धा नाही. नोकर उलटून बोलत असेल, मालकाचा आदर करीत नसेल तर त्यास तत्काळ हटविले पाहिजे. अशा नोकराकडून मोठी हानी होण्याची शक्यता असते. याशिवाय ज्या घरात वारंवार साप निघतात तिथे राहिल्याने सर्पदंश होऊन मृत्यू येण्याची शक्यता असते. म्हणून असे स्थान सोडले पाहिजे.
कोण आहे चाणक्य ?
असे मानले जाते की सर्वात आधी अखंड भारताची संकल्पना आचार्य चाणक्य यांनी मांडली होती. त्या काळात भारताला आर्यावर्त असे नाव होते. आर्य म्हणजे सुसंस्कृत. आर्यावर्त म्हणजे सुसंस्कृत लोकांचा देश. ( ब्रिटीशांनी आर्य बाहेरून आले असा चुकीचा तर्क मांडला. असे करून भारतीयांमध्ये फूट पाडायची त्यांची नीती होती. आता अलीकडच्या संशोधनातून ब्रिटीशांचा तो तर्क खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्य नावाचे कुणी बाहेरून या देशात आलेच नव्हते. आर्य म्हणजे सुसंस्कृत. 'कृण्वन्तो विश्वम् आर्यं' साऱ्या जगाला सुसंस्कृत करू या.) तेव्हा भारताच्या सीमा खूप विस्तृत होत्या. त्या काळात म्हणजे सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी ख्रिश्चन, इस्लाम आदी धर्मांचा उदय झालेला नव्हता. भारतात छोटी छोटी गणराज्ये नांदत होती. अखंड भारतातील संस्कृती एक होती. भारत हे एक राष्ट्र होते, मात्र गणराज्ये अनेक होती. या सा-या गणराज्यांना जोडून राजकीय दृष्ट्या अखंड भारत निर्माण करण्याचे स्वप्न आचार्य चाणक्य यांनी पाहिले होते.
जेव्हा सम्राट सिकंदराने भारतावर आक्रमण केले तेव्हा आचार्य चाणक्य यांनी कूटनीतीने त्याला परत जाण्यास भाग पाडले. आचार्य चाणक्य यांच्यामुळेच सिकंदराला भारत जिंकता आले नाही. त्या काळी भारतातील सर्व गणराज्यांमध्ये सर्वाधिक शक्तीशाली गणराज्य होते मगध. मगधची राजधानी होती पाटलीपुत्र. या शहराला आता पाटना असे नाव आहे. ही नगरी आता बिहार या राज्याची राजधानी आहे. मगध गणराज्याच्या सम्राटाचे नाव धनानंद होते. तो राजा सदैव भोग विलासात लिप्त होता. प्रजेची त्याला काहीही काळजी नव्हती. तो अन्य छोट्या छोट्या गणराज्यांकडून मनमानी पद्धतीने कर वसूल करायचा. आचार्य चाणक्य यांनी मगध सम्राटाला सावध करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही उपयोग झाला नाही.
साधारण शिक्षक असलेल्या चाणक्य यांच्यासमोर संपूर्ण भारताच्या भवितव्याची चिंता होती. म्हणून त्यांनी एका सामान्य बालकास तक्षशीला विद्यापीठात शिक्षण दिले. तोच बालक पुढे महान योद्धा चंद्रगुप्त मौर्य बनला. चंद्रगुप्ताने धनानंद याचे कुशासन मोडून काढले आणि अखंड भारताची स्थापना केली.
काय आहे चाणक्य नीती ?
चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे. याशिवाय चाणक्यांनी लिहिलेला अर्थशास्त्रावरील ग्रंथही प्रसिद्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही अभ्यासला जातो.
चाणक्य नीती 9 : जिथे असतील या 5 गोष्टी तिथे असावे आपले घर
चाणक्य नीती 8 : अशा सुंदर मुलीशी विवाह करू नये, कारण...
चाणक्य नीती 7 : तुमच्यातल्या या एका गुणाने दरवळेल तुमची कीर्ती
आर्य चाणक्य विद्याधाम शाळेत भरतो आठवडी बाजार
चाणक्य नीती 6 : कशी आणि कधी होते पत्नीची खरी परीक्षा ?
चाणक्य नीती 5 : सदैव आनंदी रहायचे असेल तर असं जगा

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी