चिंता
राज्यसभा खासदार अमरसिंग यांनी सरकारला चिंतित केले आहे. मात्र, सरकारची चिंता अमरसिंगांच्या आजारपणाची नाही. खासदार खरेदी प्रकरणात अमरसिंग तिहारमध्ये असताना जे बोलत होते, त्याने सरकारला चिंतित केले आहे. तिहारमध्ये असताना दिवसा तर अमरसिंग शांत राहात होते, कुणाशी फार बोलत नव्हते. पण, रात्री झोपेत त्यांची जी बडबड होत होती, त्याने सरकारला सतर्क केले आहे. अमरसिंगांची प्रकृती लक्षात घेता त्यांच्या प्रकृतीवर रात्री लक्ष ठेवण्यासाठी तिहार प्रशासनाने एक डॉक्टर तैनात केला होता. या डॉक्टरने सरकारला अमरसिंग झोपेत काय बडबड करतात, याची माहिती दिली आहे. मै देख लूंगा, पोल खोलूंगा, न्यूक्लियर डीलके बारे मे बोल दूंगा, केवल मैं फासीपर जा रहा हूं, अमरसिंग तिहारमध्ये असताना झोपेत ही वाक्ये पटपुटत होते. खासदार खरेदी प्रकरण तर समोर आले आहेच. पण, आण्विक करारात कोणता सौदा झाला आहे हे अद्याप बाहेर आलेले नाही. अमेरिकेत असणारे व्यावसायिक संतसिंग चटवाल व अमरसिंग यांनी या करारात मोठी भूमिका बजावली आहे. अमरसिंगांजवळ या कराराचे रहस्य असल्याचे मानले जाते. हे रहस्य अमरसिंगांच्या पोटातच राहावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अमरसिंग झोपेत जे बडबडत आहेत, त्याने सरकारची झोप उडविली आहे.
दिल्ली दरबार - रवींद्र दाणी, साभार : तरुण भारत
www.tarunbharat.net

जया!
कॉंग्रेसला जया नावापासून नेहमीच धोका होत आलेला आहे. दक्षिणेतील जयललिताने कॉंग्रेसला अनेक वेळा संकटात आणलेले आहे. यात आता आणखी एका जयाची, जया प्रदाची भर पडली आहे. अमरसिंग तिहारमध्ये गेल्यापासून जया प्रदाने कॉंग्रेसच्या काही नेत्यांची भेट घेऊन त्यांना सावध करणे सुरू केले आहे. अमरसिंगांना फार त्रास दिल्यास ते गप्प बसणार नाहीत, असे सांगताना जया प्रदा खासदार खरेदी प्रकरणावर अमरसिंगांनी कुणाच्या वतीने हे काम केले, याचा तपशील सांगत आहे. जया प्रदाला हा सारा तपशील अर्थातच अमरसिंगांनी सांगितलेला आहे. यानंतर सरकार व कॉंग्रेसची समस्या वाढली आहे. आजवर त्यांना फक्त अमरसिंगांना सांभाळावे लागत होते, आता जया प्रदाला सांभाळावे लागत आहे. अमरसिंगांनी तोंड उघडल्यास अनेकांना तोंड दाखविण्यास की लपविण्यास जागा राहणार नाही, असे बोलून जया प्रदाने खळबळ उडवून दिली. त्यानंतर कॉंग्रेसच्या एका नेत्याने तिची भेट घेऊन अमरसिंगांकडे लक्ष दिले जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे समजते. एक मंत्री म्हणाला, अमरसिंगांना सांभाळणे तर सोपे होते, पण, खासदार खरेदी व आण्विक कराराचे रहस्य जया प्रदाच्या पोटात किती दिवस राहील सांगणे अवघड आहे. भेट अमरसिंगांची जमानत मुदत २७ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तिहारमध्ये त्यांचा मुक्काम फार काळ नव्हता. तरी एक भेट अमरसिंगांसाठी अविस्मरणीय ठरली. तिहारमधील त्यांच्या मुक्कामाचा पहिला वा दुसरा दिवस असावा. अमरसिंगांना शुद्ध हवा मिळावी म्हणून त्यांना त्यांच्या बराकीबाहेर काढण्यात आले होते. तेवढ्यात एक ओळखीची हाक त्यांच्या कानावर पडली. अमरसिंगांनी मागे वळून पाहिले. चेहरा ओळखीचा होता, अमरसिंग त्याला विसरूच शकत नव्हते. त्याच्यामुळेच अमरसिंगांना तिहारमध्ये यावे लागले होते. त्यानेच भाजपाच्या तीन खासदारांना विक्रीसाठी अमरसिंगांकडे आणले होते. हा आपल्यासाठी सापळा आहे हे त्यांच्या लक्षात आले नव्हते. अमरसिंगांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. २२ जुलैच्या सकाळी त्याने 'ठाकूरसाब! कैसे हो' असे म्हणत चर्चेला सुरुवात केली होती. आज पुन्हा त्याने तशीच हाक दिली होती. तो आवाज होता सोहेल हिंदुस्थानीचा. त्या वातावरणातही सोहेलने अमरसिंगांना एक डॉयलॉग ऐकविलाच, 'ठाकूरसाब! हम तो एक करोड लेकर यहां आये, लेकिन आप? आप तो एक करोड देकर आये हो!' सोहेल बरोबरच बोलला होता. यावर अमरसिंगांजवळ उत्तरही नव्हते. दुसरी जया अमरसिंग- बच्चन कुटुंबीयांतील संबंध तणावपूर्ण असल्याने अमरसिंग प्रकरणाकडे बच्चन कुटुंबाचे स्वाभाविक दुर्लक्ष होते. बच्चन कुटुंबातील कोणीही अमरसिंगांना भेटावयास गेले नाही वा त्यांची साधी चौकशीही केली नाही. यावर नाराजी नोंदविली जया प्रदाने. सिनेसृष्टीतील ज्यांनी अमरसिंगांकडून मोठा आर्थिक फायदा उठविला, ते आता कुठे आहेत असे जया प्रदाने विचारल्यानंतर अमिताभ बच्चन आपल्या कन्येसह रुग्णालयात दाखल झाले. अमिताभला पाहताच अमरसिंगांनी पहिला प्रश्न विचारला, जया भाभी कहा है? अमरसिंग-जया बच्चन यांच्यात राज्यसभा उमेदवारीवरून बिनसले आहे. अमरसिंगांनी सपा सोडली आणि जयाने त्या सपाची राज्यसभा उमेदवारी स्वीकारली, हे काही अमरसिंगांना पटले नव्हते. त्यांनी नाराजी नोंदविल्यानंतर जयाने राज्यसभा उमेदवारी परत केली. मात्र, तेव्हापासून उभयतांमधील संभाषण बंद आहे. जया बच्चनने अमरसिंगांना भेटण्याचे यासाठीच टाळले आहे. अमरसिंगांनी केवळ अमितजींकडेच जयाची चौकशी केली नाही, तर मुलायमसिंगांकडेही केली. त्यावर मुलायमसिंग हासत म्हणाले, अमरसिंगजी! एक जया, जया प्रदा तो आपके साथ है ही!दिल्ली दरबार - रवींद्र दाणी, साभार : तरुण भारत
www.tarunbharat.net
No comments:
Post a Comment