Tuesday, October 4, 2011

सोनिया गांधींचे जावईबापू लष्करप्रमुखांपेक्षाही मोठे!

रॉबर्ट वडेरा देशाचे भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांपेक्षाही मोठे असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण ज्या लोकांना देशांतर्गत विमानतळावर तपासणीतून जावे लागत नाही, अशा लोकांच्या यादीत रॉबर्ट यांच्या नावाचा समावेश आहे. तसे पाहिले तर ज्या लोकांचा या यादीत समावेश आहे, त्यांना त्यांच्या पदानुसार ही सूट मिळालेली आहे. मात्र, रॉबर्ट वडेरा व तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा हे कोणत्याही अधिकृत पदांवर नसतानाही त्यांची नावे या यादीत आहेत. 28 सप्टेंबर 2005 रोजी रॉबर्ट यांचे नाव या यादीत आले होते. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीने देशभरात एक पत्रक काढले होते. रॉबर्ट वडेरा जेव्हा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसह प्रवास करतील तेव्हा त्यांची तपासणी करण्यात येऊ नये, असे या पत्रकात म्हटले होते. देशाच्या भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांनाही तपासणीतून जावे लागते, मग रॉबर्ट वडेरांना ही सूट कशासाठी असा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-sonia-gandhi-son-in-law-robert-vadra-property-2478503.html?HT5=

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी