Thursday, December 1, 2011

धन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया !

गुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय)  सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. यापूर्वी याप्रकरणाचा तपास करणा-या विशेष्‍ा तपास पथकाच्‍या (एसआयटी) टीमने इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरण बनावट असल्‍याचे म्‍हटले होते.  सोहराबुद्दीन एन्‍काऊंटर प्रकरणानंतर आणखी एक प्रकरण सीबीआयकडे सोपवण्‍यात आले आहे. सीबीआयकडे तपास सोपवताना उच्‍च न्‍यायालयाने पोलिसांवर विश्‍वास नसल्‍याचे म्‍हटले आहे. एसआयटीच्‍या मते, पोलिसांनी मुंबईची महाविद्यालयीन विद्यार्थीनी इशरत जहॉं (19), जावेद शेख उर्फ प्राणेष पिल्‍लई, अमजद अली राणा तथा झीशान जौहर यांची चकमकीपूर्वीच हत्‍या केली होती.  त्‍यांना अहमदाबाद बाहेरील भागात एका कारमध्‍ये मारण्‍यात आले होते. पोलिसांनी नंतर त्‍यांचा लष्‍कर-ए-तोएबा या संघटनेशी संबंध जोडला होता. हे सर्वजण गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदींना मारण्‍यास आले होते, असे त्‍यांनी म्‍हटले होते.
न्यायालयाचा निकाल ऐकून धन्य ते न्यायालय असेच म्हणावे वाटते. भारतीय न्यायव्यवस्था महान आहे. येथे, या देशात अतिरेक्यांवरही अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जाते. इशरतला मारले गेले त्यानंतर लष्कर ए तोयबाच्या संकेतस्थळावर शहीद म्हणून तिचा गौरव झाला होता. अर्थात ती अतिरेकी असल्याबद्दल कोणाच्या मनात शंका नको. अतिरिकी असली म्हणून काय झाले, तिला असे मारणे योग्य आहे का ? असा हा सवाल आहे.
अतिरेक्यांना मिळेल तिथे न मारता न्यायालयीन प्रक्रियेत ठेवल्यास कसाब आणि अफझल गुरुप्रमाणे हे नरराक्षस बिर्यांनी खात जगतात. वाकुल्या दाखवतात. त्यामुळे अतिरेक्यांना संधी न देता ठार करण्याचा विचार पोलिसांनी केला असेल तर त्यांनी तसा विचार करू नये, हा न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ आहे. अतिरेकी असल्याचे सिद्ध झाले तर त्यांना सरळ सरळ गोळ्या घाला, असा कायदा या देशात करण्याचे धाडस मतांचे राजकारण करणारे राजकारणी करणार नाहीत आणि सेक्युलरतेची माळ जपणारी बुद्धीजंन्तुंची जमातही सहन करणार नाही. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, सारी मिडिया या प्रकरणाचे वृत्तांकन करताना जणू इशरत ही सज्जन, सालस आणि देशभक्त होती, असा आभास निर्माण करीत आहे. थेट सत्यापर्यंत जाण्याचा दावा करणारी मिडिया इशरत कोण होती, याबद्दल टिपण्णी करण्याचे टाळून जनतेत भ्रम निर्माण करीत आहे.

देशाला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून रोखणारे मिशनरी

Truth of Secular मेडिया

अतिरेक्यांना धर्म असतो !

1 comment:

  1. Anonymous2.12.11

    इशरत जह़ॉ ही घटनेने देऊ केलेल्या संरक्षणाला पात्र आहे असे एस्आय्.टीने गृहीत धरले आहे. कोर्टात या गृहीताला आव्हान मिळाल्याशिवाय त्या गृहीताच्या योग्यायोग्यतेवर कोर्ट विचार करू शकत नाही.

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी