Monday, July 2, 2012

डॉ. कलाम यांनीच सोनियांना रोखले होते

ते’ पत्र सार्वजनिक करण्याची मागणी
 वृत्तसंस्था
 नवी दिल्ली, १ जुलै
 कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला असता तर त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी केलेल्या दाव्याला जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आव्हान दिले आहे.
 डॉ. कलाम यांनी १७ मे २००४ रोजी सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्यात यावे, अशी मागणीही डॉ. स्वामी यांनी केली आहे. १७ मे २००४ रोजी दुपारी १२.३० वाजता आपण राष्ट्रपतींना भेटलो होतो आणि सोनिया गांधी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात कायदेशीर अडचण असल्याचे आपण त्यांना सांगितले होते. त्याचदिवशी सायंकाळी पाच वाजता सोनिया गांधी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करणार होत्या. मात्र, त्यापूर्वी दुपारी तीन वाजता राष्ट्रपतिभवनातून एक पत्र सोनिया गांधींपर्यंत पोहोचविण्यात आले. सायंकाळची भेट रद्द करण्यात आली असून, इच्छा असल्यास १८ मे रोजी भेट होऊ शकते, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. हे पत्र सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा डॉ. मनमोहनसिंग आणि नटवरसिंह त्याठिकाणी उपस्थित होते, असा दावा डॉ. स्वामी यांनी एका मुलाखतीत केला आहे.
 डॉ. कलाम यांनी ते पत्र प्रकाशित केले नाही तर ते इतिहासाशी न्याय करणार नाहीत. डॉ. कलाम सत्य का सांगत नाहीत हे मला माहीत नाही पण,ते आताच हे सगळे का सांगत आहेत हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे, असेही डॉ. स्वामी यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
2 july 2012, Tarun Bharat

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी