Thursday, August 23, 2012

`रझा अकादमी’ संकेतस्थळांवर बंदी का नाही


...तर रझा अकादमी, जमात-ए-इस्लामी हिंद आदी राष्ट्रद्रोही संकेतस्थळांवर बंदी का नाही ? - हिंदू जनजागृती समितीचा हिंदूद्वेष्ट्या काँग्रेसला प्रश्न


पत्रकार परिषदेत डावीकडून अधिवक्ते वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. अभय वर्तक, श्री. रमेश शिंदे, श्री. दुर्गेश परुळकर, श्री. शिवाजी वटकर (छायाचित्रकार : श्री. अरविंद पानसरे)
      मुंबई, २२ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदू जनजागृती समितीचे संकेतस्थळ हे राष्ट्रप्रेमी संकेतस्थळ आहे. या माध्यमातून जगातील हिंदूंना जागरूक करण्याचे आणि एक प्रकारे शासनाला साहाय्य करण्याचे काम संकेतस्थळ करत आहे. असे असतांनाही एकीकडे हिंदूद्वेष्ट्या काँग्रेस शासनाने समितीच्याच संकेतस्थळावर बंदी घातली आहे. यातून लोकराज्याच्या मार्गाने जाणार्‍या राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रभक्त संकेतस्थळावर आघात केला आहे. समितीच्या संकेतस्थळावर बंदी घातली जाते, तर हिंदू आणि काँग्रेस यांविषयी विखारी लिखाण असणार्‍या `रझा अकादमी’, `जमात-ए-इस्लामी हिंद’, `तेहरिक-ए-हुर्रियत जम्मू-काश्मीर’, `टू सर्कल डॉट नेट’ आदी संकेतस्थळांवर आजही बंदी का घातली जात नाही. अशी राष्ट्रद्रोही संकेतस्थळे आजही का चालू आहेत, असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केला.
   तसेच या संदर्भात शासनाने समितीच्या संकेतस्थळावरील बंदी  तात्काळ उठवावी, अन्यथा शासनाच्या या मोगलाईच्या विरोधात समिती लोकराज्याच्या मार्गाने आगामी काळात निवेदने देणे, देशभर आंदोलन करणे, संसदेत खासदारांच्या माध्यमातून आवाज उठवणे, त्यापुढे वेळ पडल्यास न्यायालयाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारेल, अशी चेतावणीही श्री. शिंदे यांनी दिली.
   हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शिंदे बोलत होते. या वेळी हिंदू महासभेचे श्री. दुर्गेश परुळकर, केरळीय क्षेत्र परिपालन समितीचे श्री. पी.पी.एम्. नायर, राष्ट्रीय हिंदू विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ते वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर हे उपस्थित होते.
२४ ऑगस्ट या दिवशी आझाद मैदानात धरणे आंदोलन
     हिंदूद्रोही काँग्रेस शासनाने हिंदू जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर घातलेल्या बंदीच्या विरोधात येत्या २४ ऑगस्ट या दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्यावर कारवाई का नाही ? - दुर्गेश परुळकर
     हिंदू महासभेचे श्री. दुर्गेश परुळकर म्हणाले, ‘‘काँग्रेसने सत्ता घेतल्यापासून ‘देशद्रोही’ची व्याख्याच पालटून टाकली आहे. ‘देशद्रोही’चा अर्थ काँग्रेसवर टीका करणारा, देशद्रोही अल्पसंख्यांकांची लक्तरे वेशीवर टांगणारा, तसेच अल्पसंख्यांकांच्या इच्छेखेरीज अन्य कोणीही काहीही बोलायचे नाही, असाच शासनाने पायंडा टाकला आहे. ‘हिंदुत्ववादी’ म्हटले की संकुचित वृत्तीचे, असे गृहित धरलेले आहे. काल श्री. ठाकरे यांना भेटणारे पोलीस कर्मचारी तावडे यांच्यावर तात्काळ कार्यवाही होते; मात्र रझा अकादमीच्या व्यासपिठावर उपस्थित असलेल्या कृष्णप्रकाश यांच्यावर का कार्यवाही होत नाही ?’’
संकेतस्थळावर बंदी म्हणजे काँग्रेसची  हुकूमशाही ! - अधिवक्ते वीरेंद्र इचलकरंजीकर
     राष्ट्रीय हिंदू विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ते वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘विकिलीक्ससारख्या संकेतस्थळाने अमेरिकेला जागतिक स्तरावर अनेक हादरे दिले. तरीही अमेरिकी शासनाने त्यावर बंदी घातली नाही; मात्र हे काँग्रेस शासन पूर्वीच्या तुघलक, बाबर आदी हिंदूद्वेष्ट्या राजांप्रमाणेच आताही वागत आहे. तत्कालीन मुघल राजांनी हिंदूंची देवळे तोडली, तसेच आताच्या राज्यकर्त्यांनी संकेतस्थळावर बंदी घालून सहस्रावधी हिंदूंच्या मने तोडली आहेत. अशा प्रकारे लोकराज्याच्या माध्यमातून हुकूमशाही लादण्याचेच काम काँग्रेस शासन करत आहे. यातून धर्मस्वातंत्र्यावर घाला घातला आहे.’’
हिंदूंवर आक्रमणे होऊनही शांत बसल्यास हिंदूंसाठी भविष्य अधिक भयानक ! - अभय वर्तक,  सनातन संस्थेचे प्रवक्ते 
     श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘देशाचे मालक असलेले बहुसंख्य हिंदूच आज भिकारी बनले आहेत. हिंदू शांतता, सनदशीर मार्गाने कार्य करतात, तरीही शासन हिंदूंवरच अन्याय करते; मात्र दुसरीकडे मुसलमान, दंगलखोर, राष्ट्रद्रोही लोकांवर कार्यवाही करण्यास धजावते. यातून सर्वसामान्य हिंदू, पोलीस आणि प्रसिद्धीमाध्यमे वाचलेली नाहीत. यापुढेही सर्व हिंदू अशाच प्रकारे शांत राहिले, तर यापेक्षाही भयानक काळ आल्याशिवाय रहाणार नाही. त्यासाठी आताच संघटित व्हा आणि हिंदूद्रोह्यांच्या विरोधात संघटितपणे विरोध करण्यास सिद्ध व्हा.’’
हिंदू राष्ट्राची पुनर्स्थापना करणे हाच एकमेव पर्याय ! - पी.पी.एम्. नायर
     केरळीय क्षेत्र परिपालन समितीचे श्री. पी.पी.एम्. नायर म्हणाले, ‘‘हिंदूंच्या संकेतस्थळावर बंदी, मंदिर सरकारीकरण कायदा आदी धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही कृत्य काँग्रेस शासनाकडून केली जात आहेत. या माध्यमातून हिंदूंचा सत्यानाश करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन हिंदू राष्ट्राची पुनर्स्थापना करणे, हाच एकमेव आहे.’’
भ्रष्ट कारभार लपवण्यासाठीच शासनाची संकेतस्थळावर बंदी ! - शिवाजी वटकर
     हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर म्हणाले, ‘‘समितीच्या संकेतस्थळावर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आणि माहिती ठेवण्यात आले होते. स्वत:चा भ्रष्ट कारभार लपवण्यासाठीच शासनाने त्यावर बंदी घातली, हे शासनासाठी दूषणास्पद आहे. ही समितीच्या कार्याची गळचेपी असून समिती हे आव्हान स्वीकारत आहे.’’
पत्रकार परिषदेला पुढील वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते
    सामना, आपला वार्ताहर, पुण्यनगरी, नवशक्ती, मुंबई मित्र, वृत्तमित्र, द ग्लोबल टाइम्स, वृत्तमानस, मुंबई दक्षता, निर्भय पथिक, महानायक, दोपहर का सामना, नवभारत, भास्कर, नूतन सबेरा, मुंबई समाचार, ऑपेरा हाऊस टाइम्स, हिंदुस्थान टाइम्स, नवभारत टाइम्स
वृत्तवाहिन्या
    तहेलका, जनादेश वृत्तवाहिनी, चॅनल वन

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी