Sunday, April 28, 2013

तरुण भारतवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न


तारीख: 27 Apr 2013 20:46:53

-पोलिसांच्या सतर्कता; हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निषेध
प्रतिनिधी
जळगाव, दि. २६ -
दैनिक तरुण भारतमधील प्रकाशित बातमीचा राग येऊन मुस्लिम समाजातील काही युवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने जमून नंतर तरुण भारतच्या गोलाणी मार्केटमधील कार्यालयाावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गोलाणी मार्केट परिसरात आल्यानंतर मात्र पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगत आणि शांततेचे आवाहन करुन हा प्रयत्न हाणून पाडला.

दरम्यान, वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या या वृत्तीचा प्रसारमाध्यम सृष्टीतून आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र निषेध केला असून प्रसारमाध्यमाविरुध्द भावना भडकावणार्‍या वृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.
अनधिकृत मशिदींच्या संदर्भात तरुण भारतने दोन दिवस प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या संदर्भात आज काही मुस्लिम लोकांनी तरुण भारतचा निषेध करण्यासाठी म्हणून पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. समाजवादी पार्टीचे नेते हारुन मुफ्ती नादवी यांच्या नेतृत्वाखाली हजारो युवक आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले.
प्रक्षोभक भाषण
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुफ्ती हारुन नदवी यांनी सभा घेतली. त्याठिकाणी तरुण भारतचा निषेध करण्यात आला याठिकाणी प्रक्षोभक भाषणेही झाली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचा वापर करुन भाषणबाजी झाली.
तरुण भारतवर हल्ल्याचा प्रयत्न
या प्रकारानंतर तेथून पांगलेला जमाव मोठ्या संख्येने गोलाणी मार्केटकडे चालून गेला. गोलाणी मार्केटमध्ये असलेल्या तरुण भारतच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच सावधता बाळगून या जमावाला शांत केले, पांगविले.
गोलाणीत जमावबंदीचे आदेश
गोलाणी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात काही मुस्लिम युवकांचा जमाव होता, त्यांचा संभाव्य धोका लक्षात घेता परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले.
तरुण भारतला संरक्षण
या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर तरुण भारत कार्यालयाला सशस्त्र पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे. संरक्षणाच्या बाबतीत सर्व सहकार्य करण्याची ग्वाही पोलीस अधीक्षक एस. जयकुमार यांनी तरुण भारत व्यवस्थापनाला दिली.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी