Tuesday, May 28, 2013

रोहिंग्या मुस्लिमांना कुटुंब नियोजन सक्ती

यांगून । म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांना कुटुंब नियोजनाची सक्ती करण्यात आली आहे. राखिने राज्याकडून यासंदर्भातील आदेश बजावण्यात आला आहे.

राखिने आणि रोहिंग्या मुस्लिमांमध्ये झालेल्या दंगलीनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. रोहिंग्या समुदायाला आपले कुटुंब 2 मुलांपर्यंत र्मयादित राखावे लागणार आहे. बुथिडाँग आणि माऊंडॉ या शहरी भागात मुस्लिम समुदायाचे प्रमाण 95 टक्के आहे. हिंसाचाराच्या तपासासाठी आठवडाभरापूर्वी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. रोहिंग्या समुदायाची लोकसंख्या राखिने समुदायाच्या तुलनेने 10 टक्क्यांनी अधिक वेगाने वाढू लागली आहे, असे सरकारी आकड्यातू स्पष्ट झाले आहे. 26 may 2013, divya marathi, page no. 11

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी