Tuesday, May 28, 2013

गोहत्येविरोधात भिक्खूचे आत्मदहनInline image 1

मटा ऑनालाइन वृत्त । कॅण्डी

श्रीलंकेतील एका बौध्द भिक्खूने गो हत्येचा विरोध करण्यासाठी स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भिक्खूची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅण्डी शहरातील सेंट्रल टाऊन परिसरात असलेल्या बुध्द विहाराजवळ ही घटना घडली. जेथे गौतम बुध्दांच्या दाताचे अवशेष ठेवले आहेत त्याच मंदीरासमोर बुध्द जयंतीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

इंग्रजी वृत्तपत्र डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार आत्मदहन करणा-या भिक्खुने स्वत:ला जाळून घेताना आपण मांसासाठी गोमातेच्या हत्येचा विरोध करण्यासाठी हे करत असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणावर भाजलेल्या या भिक्खुला तातडीने कोलंबोच्या नॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माला राज धर्म म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीलंकेतील ७५ टक्के लोकसंख्या बौध्द धर्मीय आहे. बौध्द धर्मात पशु हत्येला बंदी आहेच मात्र पशुचा छळ करणेही पाप समजले जाते. तरीही श्रीलंकेतील अनेक बौद्ध धर्मीय लोक मांसाहर करतात. मात्र बौध्द धर्मात गायीला पवित्र समजले गेले असल्याने अनेकजण गोमांस खाण्याचे टाळतात. तरीही गौमांस खाणा-यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक कत्तलखान्यामंध्ये मोठ्या प्रमाणात गायींची कत्तल होते. याला अनेकदा धार्मीक तसेच प्राणीमित्र संस्थानी विरोध केला आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20257062.cms

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी