Saturday, July 27, 2013

बाटला हाऊस चकमक खरीच; अतिरेकी शहजाद अहमद दोषी

 वृत्तसंस्था   |  Jul 26, 2013, 09:27AM IST
राजकीय चकमक
1. सर्वात पहिल्यांदा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी घटनेचे बनावट चकमक असे वर्णन केले होते. ते प्रथम बाटला हाऊसला पोहोचले. नंतर आझमगडचा दौरा केला. तेथे मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांना निष्पाप असल्याचे म्हटले होते. न्यायालयीन चौकशी व्हावी, असे म्हटले होते. निर्णयानंतर वक्तव्य आणि मागणीवर ठाम.

2. बाटला हाऊसची छायाचित्रे पाहून सोनिया गांधी यांना रडू कोसळले होते, असे सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावर खूप राजकारण झाले; परंतु नंतर सलमान यांनी घूमजाव केले, माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, असे त्यांनी म्हटले होते. खुर्शीद सध्या मात्र मौन धारण करून आहेत.

3. सपाचे प्रमुख मुलायम सिंहदेखील मागे नव्हते. त्यांनीही चकमकीच्या खरेपणावर सवाल उपस्थित केला होता. त्यांच्यासह त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करत होते.
4. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मात्र चकमक खरी असल्याचे म्हटले होते; परंतु प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यास मात्र नकार दिला होता. न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली होती. उलट निर्णयानंतर दिल्ली पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले होते.
5. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, निर्णयावर प्रश्न उपस्थित करणे अयोग्य आहे. काँग्रेस सुरुवातीपासून या चकमकीला खरी असल्याचे मानत आली आहे.
दिल्लीत 13 सप्टेंबर 2008 मध्ये साखळी बाँबस्फोट झाले होते. त्यात 26 जणांचा मृत्यू तर 133 जण जखमी झाले होते. सहा दिवसांनंतर 19 सप्टेंबरला दिल्लीत पोलिसांच्या विशेष दलाने बाटला हाऊसमध्ये हल्ल्याचा कट करणार्‍या इंडियन मुजाहिदीनचे दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर चकमक झाली. दोन दहशतवादी आतिफ अमीन व साजिद ठार झाले. शहजाद व आरिफ घटनास्थळाहून फरार झाले. पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांना गोळी लागली. दुसर्‍या दिवशी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सरकारने त्यांचा अशोकचक्र देऊन गौरव केला. हेड कॉन्स्टेबल बलवंत देखील जखमी झाले होते.
सर्व साक्षीदार दिल्ली पोलिसांचे
सत्र न्यायाधीश राजेंद्र कुमार शास्त्री यांनी हा खटला 20 जुलैपर्यंत राखून ठेवला होता. शिक्षा 29 जुलैला सुनावली जाण्याची शक्यता आहे. सुनावणीच्या काळात सरकारी वकिलांनी 70 साक्षीदार सादर केले होते. यातील सहा जण प्रमुख साक्षीदार आहेत. हे सर्व दिल्ली पोलिसांचे कर्मचारी आहेत. ते सर्व बाटला हाऊस चकमकीत सहभागी होते.
मानवी हक्कवाल्यांनी चूक सुधारली
मानवी हक्क कार्यकर्त्यांनी बनावट चकमक म्हटले होते. शर्मा यांची हत्या पोलिसांच्या आपसातील वैमनस्यातून झाल्याचा त्यांचा दावा होता. हे प्रकरण दिल्ली उच्च् न्यायालयात दाखल झाले. न्यायालयाने 2009 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला पोलिसांच्या भूमिकेचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयोगाने आपल्या अहवालात पोलिसांना क्लीन चिट दिली होती.

वृत्तसंस्था । नवी दिल्ली
दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये झालेली चकमक बनावट नव्हती, असे गुरुवारी न्यायालयात सिद्ध झाले. न्यायालयाने मुख्य आरोपी शहजाद अहमदला पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे. अहमदला सोमवारी शिक्षा ठोठावली जाण्याची शक्यता आहे.

बाटला हाऊसच्या फ्लॅट क्रमांक एल-18 मध्ये 19 सप्टेंबर 2008 मध्ये ही चकमक झाली होती. त्यात निरीक्षक शर्मा शहीद झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह व सपा प्रमुख मुलायम सिंह यांच्यासह अनेक नेते या चकमकीला बनावट असल्याचे सांगत आले आहेत. वास्तविक गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ही चकमक खरी असल्याचे म्हटले होते. चकमकीच्या वेळी पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. एकाने शरणागती पत्करली होती, तर दोघे फरार झाले होते. पोलिसांनी 1 जानेवारी 2010 रोजी शहजादला उत्तर प्रदेशातील आझमगडमधून अटक केली होती. त्याला बुधवारी पहिल्या निकालात हत्या प्रकरणातदोषी ठरवण्यात आले. दुसरा दहशतवादी अद्यापही फरार आहे. दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी आता तरी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली. त्यावर दिग्विजय म्हणाले, मी आपले वक्तव्य व मागणीवर अजूनही कायम आहे. माफीचा तर प्रश्नच येत नाही. किमान या जन्मी तरी माफी मागणार नाही.

नवी दिल्ली- सन 2008 मधील बहुचर्चित बाटला हाऊस एन्काउंटर बनावट नसल्याचा निर्णय आज (गुरूवार) साकेत कोर्टाने दिला. दहशतवादी संघटना इंडियन मुझाहिद्दीनचा कथित सदस्य शहजाद अहमद याला अखेर दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणी त्याला येत्या 29 जुलैला शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. या एन्काउंटरदरम्यान पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांच्यावर शहजाद यानेच गोळ्या झाडल्या होत्या, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले. 
 
इंडियन मुझाहिद्दीनचा हस्तक असलेल्या शहजाद अहमद याला हत्या आणि अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी 20 जुलै रोजी पूर्ण झाली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र कुमार शास्त्री यांनी निर्णय राखून ठेवला होता. सुमारे 70 जणांची साक्ष तपासण्यात आल्या होत्या. 
 
दोषी ठरवण्यात आलेल्या शहजाद याला फाशीचीच शिक्षा झाला पाहिजे, अशी मागणी शर्मा यांच्या 76 वर्षीय आई  देविंदर देवी यांनी केली आहे.

दरम्यान, 19 डिसेंबर 2008 रोजी बाटला हाऊस परिसरातील एका घरात पाच दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.शहजाद अहमद आणि जुनैद पळून जाण्यात यशस्वी झाले होते तर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले होते.मात्र, पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांना वीरमरण आले होते.


त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी शहजाद उर्फ पप्पू यास उत्तर प्रदेशातील आझमगड येथे अटक केले होते.


शर्मा यांना सात शौर्यपदक देऊन सम्मानित करण्यात आले होते. त्यात एका राष्ट्रपती पदकाचाही समावेश आहे. शर्मा यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी आणि दोन मुले आहेत. शर्मा 1989 मध्ये दिल्ली पोलिस दलात सहभागी झाले होते.http://epaperdivyamarathi.bhaskar.com/solapur/260/26072013/0/1/

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी