Saturday, October 5, 2013

जगातील सर्वात मोठे मंदिर बिहारमध्ये

उंची ४0५ फूट : २0 हजार लोक बसू शकतील एवढा मोठा सभामंडप
पाटणा : जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बिहारमध्ये उभारण्यात येत आहे. तब्बल ४0५ फूट उंच आणि २0 हजार लोक बसू शकतील एवढा मोठा सभा मंडप या मंदिराचे वैशिष्ट्य ठरावे.
पश्‍चिम चंपारण जिल्ह्यातील केसरीयानजीकच्या जानकीनगरमध्ये महावीर मंदिर ट्रस्टतर्फे हे विराट रामायण मंदिर उभारण्यात येत असून दुर्गापूजेनंतर या मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांनी दिली.
बाराव्या शतकातील जगप्रसिद्ध अंग्कोर वॅट मंदिरापेक्षा याची उंची दुप्पट असेल. कंबोडियातील या मंदिराची उंची २१५ फूट आहे. पाटण्यापासून सुमारे १२५ किमी अंतरावरील याच संकुलात उंच कळस असलेली १८ मंदिरे असतील. तसेच यातील शिवमंदिरातील शिवलिंग हे जगातील सर्वात मोठे शिवलिंग असणार आहे.
एकूण १९0 एकर जमिनीवर उभारण्यात येणार्‍या या संकुलातील मुख्य मंदिरात राम, सीता, लव व कुश यांच्या मूर्ती असतील. तर याच्या गाभार्‍यासमोर विस्तीर्ण सभामंडप असेल. यासाठी सुमारे ५00 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी देशभरातील भाविकांनी, विशेषत: सर्वसामान्यांनी दिलेल्या दानातून उभारण्यात येणार आहे.

- या भव्य मंदिराचे नाव आधी 'विराट अंग्कोर वॅट राम मंदिर' असे ठरविण्यात आले होते. पण कंबोडियातील काही लोकांनी त्यास आक्षेप घेतल्याने ते बदलून 'विराट रामायण मंदिर' असे करण्यात आले. हिंदू राजा सूर्यवर्मन राजवटीतील 'अंग्कोर वॅट' हे मंदिर सध्या युनेस्को जागतीक वारसा यादीत समाविष्ट आहे.
(वृत्तसंस्था) 03 oct 2013, Lokmat
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-03-10-2013-177f3&ndate=2013-10-03&editionname=main

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी