Thursday, June 28, 2012

नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी

रवींद्र दाणी, 26 जून, तरुण भारत
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक चूक केली. त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करून, 2014 चे पंतप्रधानपदाचे उमेदवार, दावेदार, वारसदार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, असे सांगितले असते, तर ‘मोदी हे धर्मनिरपेक्ष आहेत,’ असे लॅमिनेटेड केलेले प्रमाणपत्र पाटण्यातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आतापर्यंत जारी झाले असते. मोदी यांनी ते केले नाही आणि त्यांना धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र मिळाले नाही.

सोनिया गांधी - शिवसेनेचे नवे दैवत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पहिली दोन दशके सेनाप्रमुख म्हणून ओळखले जात. मात्र गेली दोन दशके हिंदू हृदयसम्राट या नावाने ते संबोधले जातात. ही नवी उपाधी त्यांच्या स्वभावाप्रमाणे अगदी स्पष्ट आहे. बाळासाहेबांनी 35-40 वर्षांत एकच चूक केली. भारतीय लोकशाहीला कलंक आणि लांछन असलेल्या 1975 च्या आणीबाणीस त्यांनी का पाठिंबा दिला हे कळले नाही.

Tuesday, May 29, 2012

सावरकरांच्या जीवनात स्वामी विवेकानंद


सिद्धाराम पाटील । सोलापूर
23 डिसेंबर 1910 रोजी विनायक सावरकरांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बंदिवासातील पहिल्या दिवसाच्या मन:स्थितीचे वर्णन करताना सप्तर्षी नावाच्या प्रदीर्घ कवितेत ते म्हणतात की, मी गेल्या सहा महिन्यांपासून विवेकानंदांच्या राजयोग पुस्तकाचा अभ्यास करत आहे.

Saturday, May 26, 2012

अण्णा हजारे आणि स्वामी विवेकानंद
सन २०११ या वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव राहिला. अण्णांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असा होता. संपूर्ण जगाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची दखल घेतली. कोट्यवधी भारतीयांनी त्यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त केला. अण्णांनी राळेगणसिद्धीचा केलेला कायापालट हा कोणालाही नतमस्तक व्हायला लावणारा आहे. समाजाची काळजी असणा-या अण्णांसारख्या काही लोकांमुळेच या देशाला माहितीचा अधिकार मिळाला. आज याच माहितीच्या अधिकारामुळे अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. 

Monday, April 23, 2012

सुधारक संत महात्मा बसवेश्‍वर

या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, हे तत्त्व
बसवण्णा जाणून होते. भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी
'अनुभव मंडप' ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही
बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते.

Friday, April 6, 2012

एक हात गेला म्हणून काय, दुसरा आहे ना!


सिद्धाराम पाटील | सोलापूर 
एक हात गेला म्हणून काय, दुसरा आहे ना!
ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या तिस-या वर्षात शिकणा-या 19 वर्षीय उमद्या तरुणाचा उजवा हात बस अपघातात तुटून 20 मीटर लांब जाऊन पडला. एक हात तुटून गेला म्हणून काय झालं, दुसरा हात आहे ना, ही सकारात्मक ऊर्जा त्याला जगण्याचं बळ देत राहिली. त्याने डाव्या हातात कुंचला धरला आणि स्वत:ला पेंटिंगच्या विश्वात झोकून दिलं. अपघातापूर्वी काढत होता त्याहून उजवी चित्रे तो डाव्या हाताने साकारू लागला. या मूर्तीमंत जिद्दीचं नाव आहे झीशान युनूस दुर्गकर.

Sunday, April 1, 2012

दिव्य मराठी' सोलापूर आवृत्ती लोकार्पण सोहळ्याची क्षणचित्रे...


सोलापूर: दैनिक 'दिव्य मराठी' च्या सोलापूर आवृत्तीचे शनिवारी मोठ्या दिखामदार सोहळ्यात लोकार्पण झाले. येथील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात देशातील सर्वांत मोठ्या भास्कर समूहातील या मराठी वृत्तपत्राच्या स्वागतासाठी अनेक मान्यवर आणि उत्साही सोलापुरकर आवर्जुन उपस्थित होते. या सोहळ्याची काही क्षणचित्रे...

Saturday, March 3, 2012

‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने...

दि. २१ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये ठाणे दिवाणी
न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालाचे वृत्त प्रसिद्ध झाले
आहे. जात आणि धर्माचा उबग आल्याने आपल्याला धर्मविरहित घोषित करुन केवळ
भारतीय म्हणून ओळख मिळावी, अशी मागणी ठाणे येथील श्रीरंग खंबाटे या
वकिलाने केली होती. न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली.
एखादी व्यक्ती कोणत्याच धर्म किंवा जातीची नाही, अशी मान्यता कोर्टाने
दिल्यास त्याची व्यक्तिगत मते इतरांवर लादल्यासारखे होईल, तसेच त्या
व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांमध्ये वारसा हक्क व त्यांचा धर्म
यावरुन समस्या निर्माण होऊ शकतात, असे कारण न्यायालयाने दिले. घटनेच्या
३४ व्या कलमानुसार न्यायालयांना धर्मसंबंधी घोषणा करण्याचा अधिकार नाही,
असेही कोर्टाने म्हटले.

Wednesday, February 22, 2012

.. तर २०१७ मध्ये भाजपचा महापौर

आमचे मित्र श्री सुनील यांनी एक लेख लिहिला आहे. तो येथे देत आहे... 

सोलापुरात भाजप नगरसेवकांची संख्या वाढली आहे. त्याबद्दल पक्षाचे हार्दिक अभिनंदन. २००७ च्या निवडणुकीतील यशापेक्षा यावर्षीचे यश निश्चितच कौतुकास पात्र आहे. पण २००२ च्या निवडणुकीतील यशाच्या  तुलनेत आतापर्यंत पक्षाकडे सत्ता यायला हवी होती. ते अजून शक्य झाले नाही. याचे कारण २००७ च्या निवडणुकीत युती न करता पक्ष लढला. परिणामी सेना-भाजपा दोन्ही पक्षांना त्याची फळे भोगावी लागली.

Thursday, February 16, 2012

राम राम आणि धन्यवाद !

८ महिने संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे होतो. माझ्यासाठी नवीन असलेल्या या शहराने खूप काही शिकवले. नवे मित्र आणि सहकारी दिले. अनुभवविश्व समृद्ध केले. हा काळ जीवनाला दिशा देणारा ठरला. सगळ्यांना राम राम आणि खूप धन्यवाद.
आता पुन्हा सोलापूरला आलोय. भेटत राहू...!

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी