Wednesday, December 16, 2015

विवेकानंद केंद्रातर्फे गुरुवारी पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णींचे व्याख्यान

सोलापूर । विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवारी (१७ डिसेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता प्रसिद्ध पर्यारवणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. विवेकांनद केंद्र, १६५ रेल्वे लाइन्स येथे “कचरा निर्मूलन आणि नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान होईल, अशी माहिती मंडळाचे प्रमुख अजित ओक यांनी िदली. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सीइओ अरुण डोंगरे उपस्थित असतील. व्याख्यानानंतर कचरा िनर्मूलन आणि नागरिकांचा सहभाग यावर चर्चा होईल.

#होम_मैदान_सोलापूर कोणाच्या मालकीचे?

होम मैदान शासकीय आहे आणि शासनाकडून यात्रेसाठी देवस्थानला ही जागा देण्यात येते, असे अधिकारी आणि काही सन्माननीय पढतमूर्ख सांगत आहेत.
शासन जणू उपकार करते असा भासवण्याचा प्रयत्न यामागे असतो. पण हे खरे नाही.
५० वर्षांपूर्वी महापालिकेत एक अतिशय शहाणे अधिकारी आले होते.
त्यांनी म्हटले, “सिद्धेश्वर तलाव हे सरकारी मालकीचे आहे. त्यामुळे आम्ही तलाव बुजवणार आणि त्या ठिकाणी बाग फुलवणार.’’
हा वाद तेव्हांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता.
मुख्यमंत्र्यांनी समज दिली तेव्हा कुठे अधिकाऱ्यांची अक्कल ठिकाणावर आली.

Tuesday, December 15, 2015

मुंढेजी, अहंकाराचे भूत मानगुटीवरून उतरवा


जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि सिद्धेश्वर यात्रा समिती वाद या विषयावर युवापत्रकार सागर सुरुवसे यांचा दैनिक तरुण भारतच्या रविवारच्या आसमंत पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला लोकप्रिय लेख…

“देवस्थान समितीने संपूर्ण होम मैदानावर मॅट आच्छादन केले आहे. आपातकालीन मार्ग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयालगतचा रस्ताही मोकळा सोडला आहे. ही दोन्ही कामे पूर्ण झाली आहेत आणि उद्घाटन माननीय जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होत आहे. ही स्वप्नवत कल्पना. पण ही गोष्ट सत्यात उतरली असती जर का जिल्हाधिकारी मुंढे यांनी स्वत:च्या कार्यशैलीत बदल केला असता.’’ हे उद्गार आहेत सोलापुरात जिल्हाधिकारी पदावर राहिलेल्या एका उमद्या अधिकार्‍यांचे. अर्थातच त्यांनी आपली ही भावना खासगीत बोलताना व्यक्त केली आहे.
संत ज्ञानेश्‍वरांनी अशा स्वभावाच्या व्यक्तींचे वर्णन मोठ्या चपखलपणे केले आहे. ज्ञानोबा म्हणतात, ‘अहंकाराचे वागणे मोठ्या नवलाचे आहे. अज्ञानी, सर्वसामान्य लोकांच्या मागे तो लागत नाही. पण बुद्धीमंतांच्या मात्र तो मानगुटी बसतो. त्याला आपल्या तालावर नाचायला लावतो.’ सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या वर्तनाला हे वर्णन तंतोतंत लागू पडते.

Monday, December 7, 2015

पुनश्‍च एकदा सडेतोड

आमचे मित्र सागर सुरवसे यांनी तरुण भारतमध्ये सडेतोड या नावाने स्तंभ लेखनाला सुरुवात केली आहे. रामतीर्थकर सरांनी पेटवलेली मशाल अधिक प्रखर होत जावो या शुभेच्छा....

Friday, November 20, 2015

वादळाशी केला संसार : अपर्णा अरुण रामतीर्थकर


व्यासंगी व ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे ६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांनी जागवलेल्या काही आठवणी.

धर्मनिरपेक्षतेचे नाटक थांबवा

दै. दिव्य मराठीत प्रकाशित मुजफ्फर हुसेन यांचा लेख

जर भारताला सर्व प्रकारची हिंसा आणि असहिष्णुतेपासून मुक्ती द्यायची असेल तर प्रत्येक जाती आणि समुदायाच्या असहिष्णुतेशी लढा द्यावा लागेल. केवळ हिंदूंच्या असहिष्णुतेची निंदा करून चालणार नाही. अलीकडच्या काळात मोदीविरोधाच्या नावाखाली काँग्रेसी नेत्यांनी असहिष्णुतेला हिंदू आवरण चढवून देश-विदेशात बदनामी केली. पण भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडला चांगले माहीत आहे की ‘न्यायप्रिय हिंदू हा मुळातच सहिष्णु आहे. त्याला पुन्हा पुन्हा अवमानित केले तरी तो केवळ आपल्या रक्षणासाठीच शक्तीचा वापर करतो.’ त्यामुळेच मोदींचा पाठलाग करणारे इंग्लंडच्या धरतीवरही गेले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अशा प्रवृत्तीचे लोक कोणताही बुरखा पांघरून आले तरी तो बुरखा फाडणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमीचे कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही...
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-mujaffar-hussen-column-on-secularism-5172867-NOR.html

Sunday, November 8, 2015

पत्रकार अरुण रामतीर्थकर यांनी मुद्रित, इलेक्ट्राॅनिक मीडियात उमटवला ठसा

प्रतिनिधी । सोलापूर
पत्रकारितेतचार दशके गाजवलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर हे मुद्रित आणि इलेक्ट्राॅनिक या दोन्ही प्रसिद्धी माध्यमांत ठसा उमटवणारे पत्रकार ठरले. पत्रकारितेकडे करिअर किंवा निव्वळ चरितार्थाचे साधन म्हणून पाहता ते एक व्रत असल्याची निष्ठा जीवापाड जपणाऱ्या पत्रकारांच्या पिढीचे अग्रणी म्हणून त्यांची ओळख होती.

Friday, November 6, 2015

ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली



ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रात्री निधन झाले. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून अश्विनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्ययात्रा ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या ओंकार सोसायटी (होटगी रोड) येथील राहत्या घरापासून निघणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे ते पती होत.

Tuesday, September 15, 2015

डोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल

व्हीआयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समजली जाणारी टोकियो फाउंडेशन आणि जगभरातील बौध्दांची सर्वोच्च संस्था इंटरनॅशनल बुध्दिस्ट कॉन्फिडरेशन या जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या तीन संस्थांनी मिळून या संमेलनाचे आयोजन केले होते. केवळ माझाच धर्म खरा म्हणणाऱ्या धर्मांचा अनुभव घेतलेल्या जगासाठी हा विचार नवीन आणि आश्वासक होता. हा विश्वबंधुत्वाचा विचार आजही एकांतिक धर्मीयांनी स्वीकारलेला नाही. धर्मांतरणे घडवून आणण्यासाठी ते कोणत्याही थराला चालले आहेत. त्यामुळे जगातील संघर्ष टाळण्यासाठी एका सशक्त पुढाकाराची गरज होती. जागतिक हिंदू-बौध्द संमेलनाकडे या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे..

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी