Tuesday, November 1, 2011

कुटुंब ही संपत्ती आहे आणि प्रेरणाही !

घर किंवा कुटुंब म्हणजे एक माळ आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्यात गुंफली जाते. घरातील सारे सदस्य या माळेतील मोती आहेत. एकही मोती कमी असेल किंवा धागा तुटलेला असेल तर माळेचे सौंदर्य नष्ट होते. माळ विखुरली जाते.
घरातील प्रत्येक सदस्याचे महत्त्व हे समसमान असते. आपण कुटुंबाशिवाय अपूर्ण असतो. आपल्यावर कोणतीही परिस्थिती येवो, कितीही संकटे येवोत, आपण सदैव कुटुंबासोबत राहिले पाहिजे. कुटुंबाला एकत्र ठेवले पाहिजे. कुटुंब म्हणजे ऊर्जा आणि प्रेरणा देणारे स्थान आहे.
महाभारतातील पांडवांकडे पाहा. किती अडचणी आल्या, इंद्रप्रस्थ निर्माण असो की वनवास, पांडव सदैव एकत्र राहिले. द्युतात हार झाल्यानंतर
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-kutumb-aikya-what-to-do-2532811.html
पांडवांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष वनवास पत्करावा लागला होता. दर्योधन त्यांना सतत त्रस्त करीत होता. मोठ्या भावामुळे संपूर्ण कुटुंबाला वनवासात भटकावे लागले. परंतु कोणीही आपल्या भावाविरुद्ध गेला नाही. सर्वांनी द्युतात युधिष्ठिर हरल्यानंतरही कुटुंब मोडू दिले नाही.
पाचही भावांनी मिळून सर्व संकटांचा समना एकजुटीने केला, हे आश्चर्यजनक आहे. हीच कुटुंबाची शक्ती आहे. इतक्या अडचणींतूनही त्यांनी आपले राज्य आणि सन्मान परत मिळविले.
सदैव ध्यानात ठेवा कुटुंबाला एक ठेवून वाटचाल केली तर मोठे मोठे संकटही क्षुद्र भासतात. कुटुंब एक ठेवा. कुटुंब ही आपली संपत्ती आहे आणि प्रेरणाही.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी