Tuesday, December 27, 2011

२०१४ पर्यंत निर्माण होईल राममंदिर

रायपूर - रायपुरच्या व्हीआयपी रोडवर भव्य राममंदिराची निर्मिती होत आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिरासारखेच हे मंदिर बांधण्यात येणार असून या मंदिर निर्माणातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. हे मंदिर श्रद्धा, संस्कार आणि शिक्षणाचे केंद्र असणार आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-ram-mandir-at-raipur-2682172.html
या मंदिर निर्माणातील विशेष बाब म्हणजे बांधकामात कुठेही सिमेंट आणि लोखंडाचा वापर करण्यात येणार नाही. चुना, गूळ आणि बेलाची फळे यांचा वापर करण्यात येणार आहे. २००६ साली मंदिराचा शिलान्यास झाल्यापासून येथे दररोज वीर हनुमानाची पूजा-अर्चा होत आहे.

असे असेल मंदिर

लांबी - ११० फूट

उंची - १०९ फूट

रुंदी - ६० फूट

सामुदायिक भोजनालय : १०,००० चौ. फूट

पुजा-यांसाठी निवास : ४५ हजार चौ. फूट

विद्यालय : संस्कृत शिक्षण, ज्योतिष आणि व्याकरण

वसतिगृह : १०० मुले व १०० मुली ( दुमजली )

संत निवास : १०० जणांसाठी

कोचिंग केंद्र : पीएससी, आईएएस आणि आईपीएस

रुग्णालय : अॅलोपैथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी