Tuesday, September 11, 2012

बाळासाहेब ठाकरे मुलाखत २

वाघाची डरकाळी!! नुसते ढोल कसले बडवताय?
मी उसळी मारली तर धर्मांध मुसलमान राहणार नाहीत!

महाराष्ट्र पोलिसांनी बिहारात जाऊन अमर जवान शिल्प तोडणार्‍यास अटक केली त्यात एवढा गहजब माजवण्यासारखे काय आहे? सार्वभौम राष्ट्राचे कायदे कोणासाठी असतात? जनतेसाठी की खतरनाक अतिरेक्यांसाठी?

संजय राऊत
मुंबई, दि. ७ - ‘आझाद मैदानची दंगल धर्मांध मुसलमानांनी ठरवून केली. कारस्थान आधीच ठरले होते; पण आज पुन्हा एकदा सांगतो, मी त्यांना सोडणार नाही. मी उसळी मारली तर धर्मांध, पाकिस्तानी मुसलमान निदान महाराष्ट्रात तरी राहू देणार नाही,’ असा खणखणीत आवाज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखतीच्या दुसर्‍या भागात दिला. अत्यंत स्पष्ट शब्दांत शिवसेनाप्रमुखांनी बजावले, ‘पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू देणार नाही!’
‘बिहार’वरून राजकारण करणार्‍यांना शिवसेनाप्रमुखांनी दम भरला. ‘महाराष्ट्राच्या पोलिसांना शहाणपणा शिकवायची गरज नाही. तुमच्या राज्यात शिरून खतरनाक अतिरेक्यांना पकडायचे नसेल तर ते आमच्या राज्यात येऊन दंगली करणार नाहीत याची काळजी घ्या!’
शिवसेनाप्रमुखांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून कोळसा घोटाळ्यापर्यंत आपली परखड मते दुसर्‍या भागात मांडली. सुरुवात झाली आझाद मैदान दंग्यावरून.
आझाद मैदानावरील दंगा पूर्वनियोजित होता...
- होय. दिसलेय ते. संपूर्ण तयारीनेच ते आले होते, पण पोलिसांची तयारी काय होती?
पोलिसांवर हल्ले करेपर्यंत त्यांची मजल गेली...
- मी तेच सांगतोय ना. का नाही करायचे त्यांनी? अमर जवान शिल्प तोडले त्यांनी. पोलिसांनी काय तयारी केली होती? नक्की काय आकडा होता? कुणी म्हणतात २५,००० होते, कुणी म्हणतात ५०,००० होते. नक्की आकडा किती होता?
साधारण पन्नास हजार होते...
- पन्नास, नक्की? कोणी मोजले?
हा पोलिसांचा आकडा आहे...
- अच्छा. पोलिसांचा आकडा. त्यांना आठवण नक्कीच राहणार. मार खाल्लाय ना त्यांनी.
पण पोलिसांना मारण्यापर्यंत, अमर जवान शिल्प तोडेपर्यंत या मुसलमान दंगलखोरांची हिंमत जाते कशी?
- तुमच्या गांडूपणामुळे. तुमची गांडुगिरी. त्या पटनायकाचा नक्की पट कळतच नाही काय आहे? काय त्याची भूमिका होती. कुणी म्हणतात त्याने पकडलेले लोक सोडून दिले असं वृत्तपत्रात छापून आलंय. कुणी म्हणतात, त्याला ते आदेश नव्हते. आता हे सोडवणुकीचे मार्ग झालेत. मी अडकलोय तू मला सोडव. मग मी तुला सोडवतो. दोघेही अडकलोय. ते आबा पाटील. काय त्यांची लायकी आहे काय गृहमंत्रीपदावर बसण्याची, पण बसलेत.
९२ च्या दंगलीनंतर प्रथमच धर्मांध मुसलमान हिंसक होऊन रस्त्यावर उतरला...
अरे बाबा, हे लांडे, बाबरी मशीद पाडल्याबरोबर इकडे रस्त्यावर उतरले होते ना? आता ती बाबरी मशीद इकडून किती लांब? हे सगळे खुलासे यापूर्वी झाले आहेत. ती बाबरी मशीद तिकडे उत्तर प्रदेशात पडल्यावर तुम्ही मुंबईत दंगलीला सुरुवात का केली? मग मी असे म्हणेन गोध्राला तुम्ही जे हत्याकांड केलंत, साबरमती एक्स्प्रेसच्या तीन बोगी तुम्ही जाळल्यात अगदी पद्धतशीर प्लॅनिंग करून. अगदी मांडणी करून जाळल्यात. तुम्ही बायकांची, लहान मुलांचीसुद्धा पर्वा केली नाहीत. बाहेरून दरवाजे बंद केलेत. पेट्रोलचे बोळे फेकलेत. हे सर्व आलंय वर्तमानपत्रात छापून. हे माझं नाहीय. गोध्य्राला हल्ला करणारे कोण? मुसलमानच होते ना? आणि जर मग अयोध्येची रिऍक्शन मुंबईतील मुसलमान दंगल करून दाखवत असतील. निषेध करून दाखवतात तर मग गोध्राची रिऍक्शन संपूर्ण गुजरातमध्ये खासकरून अहमदाबादमध्ये आली तर मग बोंबा कशाला मारता? बांग कशाला ठोकता भडव्यानो? काय गरज आहे तुम्हाला बांग ठोकण्याची? ते जर चालतं तर मग हे का नाही चालत? रिऍक्शन आहे गोध्य्राची अहमदाबादमध्ये. त्यांचे गुजराथी मारले गेले. ते सर्व करसेवा करून आले होते.
पण बाबरीनंतर मुंबईत झालेल्या दंगलीला शिवसेनेने प्रतिकार केला...
- केला. बरं मग?
तसा प्रतिकार यावेळेला झाला नाही...
- उद्धवने केला नं. राजनेही केला. राज आला नं. सगळ्यांनीच पुढे पुढे करायची गरज नाही. राजने मोर्चा काढल्यानंतर उद्धवने आदल्या दिवशीच खुलासा केलाय. दूरदर्शनवर आलेलं आहे. शेवटी म्हणजे काय? ठाकरे घराणंच नं? बाकीचे गेले कुठे? संसद बंद करणारे गेले कुठे?
तिकडे पाकिस्तानमध्ये तुमच्या नावाचा प्रचंड दरारा आहे...
- होय. मग?
इकडे पाक मीडियाचे लोक आले तेव्हा त्यांनी सांगितले, पाकिस्तानला फक्त शिवसेनाप्रमुखांचीच भीती वाटते...
- होय आहेच. कारण मी त्यांना तसा सोडणार नाही. मी अजून उसळी मारत नाही तोपर्यंत. उसळी मारली तर मी इथे एकही धर्मांध, पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमान निदान महाराष्ट्रात तरी राहू देणार नाही आणि जिथे जिथे शाखा आहेत, माझ्या शिवसेनेच्या अगदी जम्मू-कश्मीरपर्यंत तिथे तिथे उसळी मारतील.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर बहिष्काराची तुमची भूमिका अजूनही कायम आहे?
- होय. मी त्यांना इथे खेळू देणार नाही. मी माझे शब्द बदलले नाहीत आणि बदलणार नाही.
देशभरात सध्या जो पाकधार्जिण्या मुसलमानांच्या हिंसेचा उत्पात सुरू आहे त्याचा अंत काय होईल असं वाटतं?
- माझ्या हातामध्ये सैन्य द्या. चमत्कार दाखवतो मी तुम्हाला. एक महिन्याच्या आत सगळं सरळ करून दाखवतो. फक्त सैन्य द्या माझ्या ताब्यात.
शिवसेना हे एक तुमचं सैन्यच आहे...
- नि:शस्त्र सैन्य! हातात फक्त भगवा आहे. तरीही एवढा दरारा आहे, पण हे तसलं नकोय मला. मला ती होर्डिंग्ज, बॅनर्स आणि ते ढोल बडवणारे नकोत. नवीनच तंत्र आलंय आता. ढोल बडवायचं.
राजकारणातला हा एक नवीन प्रकार आहे...
- होय. तो लालूंनी आणला पहिला.
महाराष्ट्रात पण सध्या ढोल बडवले जाताहेत...
- होय. आपल्याकडे ढोल बडवले जाताहेत याचं कारण शत्रूला बडवण्याची ताकद आमच्यातली नाहीशी झालीय. गेलीय. मग आता काय बडवायचं? जे पाहिजे बडवायला ते बडवता येत नाही. मग ढोल बडवा. सोपं आहे ते.
इतकं होऊनसुद्धा मुसलमानांबरोबर हिंदूसुद्धा कॉंग्रेसलाच का मतदान करतो?
- दुर्दैव! शिवाजी महाराजांच्या नशिबीसुद्धा हेच आलं. दोनशे लढाया मराठ्यांच्याविरुद्ध महाराजांना लढाव्या लागल्या. त्याची ती यादी आहे बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकात.
आणि तुम्ही हिंदुहृदयसम्राट असताना...
- होय. म्हणून काय झालं? त्यावेळी सुद्धा खंडू खोपडे होता नं? बाजी घोरपडे होता नं? नेताजी पालकर इतका विश्‍वासू असतानाही गेला नं? पश्‍चात्ताप होऊन परत आला नं? मग पश्‍चात्तापाला क्षमा करायची की फक्त त्याच्यावरती आम्ही प्रेम करायचं? त्याची ना कुणाला पर्वा ना काही. निर्लज्जपणानं जे प्रेमाचा स्वीकार करतो. मला जगायचं आहे क्षमा करा. खंडू खोपडेसुद्धा आला होता क्षमा मागायला, पण नाही. अजिबात नाही.
सध्या अचानक बिहारवरून वादळ उठलंय...
- कसलं आलंय वादळ...?
आझाद मैदान दंगलीतले आरोपी मुंबई पोलिसांनी पकडले. त्याचा राग आलाय तिकडे...
- कसला राग आलाय त्यांना? राग येण्याचं तसं कारण नाही. सार्वभौम राष्ट्राचे कायदे कोणासाठी केलेले असतात? जनतेसाठी की खतरनाक अतिरेक्यांसाठी? मुभा कुणाला द्यायची? तुमच्या राज्यात शिरून खतरनाक अतिरेक्यांना पकडायचे नसतील तर ते आमच्या राज्यात येणार नाहीत, दंगली करणार नाहीत याची काळजी घ्या व मग बोंबा ठोका. उगाच महाराष्ट्राच्या पोलिसांना अक्कल शिकवण्याचे धंदे करू नका.
यानिमित्ताने तुम्हाला ‘बिहारी’ ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत...
- होय. आमचे ठाकरे कुटुंब म्हणे बिहारातून महाराष्ट्रात आलंय. गंमत आहे. फक्त मला आता अमेरिकन कोण ठरवतंय ते पाहावं लागेल. ठाकर्‍यांचे पूर्वज अमेरिकेतून हिंदुस्थानात घुसले एवढाच शोध लावायचा बाकी आहे. मध्य प्रदेश, बिहारपर्यंत पोहोचलेत. अजून बरीच राज्यं शिल्लक आहेत. उद्धवने त्या दिग्विजय सिंगला चांगलं उत्तर दिलंय.
देशाच्या राजधानीत म्हणजे दिल्लीत प्रचंड राजकीय गोंधळ आणि अराजक माजलंय...
- अराजक येणारच! असं माझं केव्हापासून चाललंय. ओरडा. अराजकाच्याच उंबरठ्यावरती आपण उभे आहोत. मला असं वाटतंय २०१४ पर्यंत निवडणुका जाणारच नाहीत. त्याच्या अगोदरच होणार, हे माझं भाकीत आहे. पहा तुम्ही.
निवडणुका लवकर होतील असं आपल्याला का वाटतं?
- का वाटतं याचं उत्तर मी देऊ शकत नाही. मी महात्मा गांधी नसल्यामुळे माझा आतला आवाज वगैरे वगैरे हे असले शब्द काही वापरत नाही.
पण तुमच्या आवाजाला महत्त्व आहे...
- होय, आहे ना. नक्कीच. आज मी बोललोय ना? आणि ते होतेय असं दिसतेय ना तुम्हाला. मग पहा.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपण कॉंग्रेसला पाठिंबा दिलात...
- होय. जरूर दिलाय. कारण एनडीएकडे काही मांडणीच नव्हती आणि तसलं ‘लायक’ कुणी नव्हताच. कलामला पाठिंबा हा काही विचार मला पटण्यासारखा नव्हता आणि पुन्हा त्याने नंतर जो घोळ घातला. सोनिया गांधींच्या बाबतीत. त्याने माझं मनच उडालं त्या माणसाबद्दल. आता त्यांच्यानंतर कोण? कोणीच सापडला नाही म्हणून संगमा. संगमा माझेही मित्र आहेत, पण मित्रत्वाची नाती इथे तशी चालणार नाहीत. तुमची ‘कुवत’ काय? त्यात त्याने जो जातीय स्पर्श केला की आम्ही अमुक तमुक जातीचे आहोत म्हणून मते द्या. तुम्ही पहिल्यांदा ख्रिश्‍चन. मग आदिवासी वगैरे. तुम्हीच पहिल्यांदा जातीयवाद आणल्यामुळेच आम्हाला जातीय तत्त्वावरती बोलावं लागतं. नंतर उपराष्ट्रपती कोण? तर ते हमीद अन्सारी. ते होतेच. पुन्हा त्याला तुम्ही पाच वर्षे देता, का? दुसरे मिळत नाहीत? हे जे कॉंग्रेसचे राजकारण आहे त्याला मी कधीच हातभार लावणार नाही.
प्रतिभाताई पाटलांच्या बाबतीत तेच झालं...
- काय झालं? पुन्हा सांगतो प्रतिभाताई पाटलांच्या बाबतीत. इकडे माझ्याकडे विलासराव देशमुख आणि तिथे आबा पाटील बसले होते. दुर्दैवाने विलासराव गेले, पण आबा तर आहेत. आबाला विचारा प्रतिभाताईंना शिवसेनेची मते मिळावी म्हणून आले. मी म्हटलं काही काळजी करू नका, मी विचार काय केला की...
काय विचार केलात?
- त्यावेळी माझ्यासमोर प्रतिभाताई पाटील नव्हत्या. काही नाही नि काही नाही. त्यांनी शिवराज पाटलांचं नाव घेतलं होतं तेव्हा. मी स्पष्टच सांगितलं की या इस्त्रीवाल्याला मी कधीच पाठिंबा देणार नाही. फक्त कडक कपडे. अरे आधी देशाची घडी बघ, विस्कटली आहे ती बसव. तुझ्या कपड्यांची काय बघतोस? हे माझे विचार आहेत. त्यानंतर आणखी एक-दोन लोकांची नावं आली. मी म्हटलं, नाही. या लोकांना मी कधीच पाठिंबा देणार नाही. मग ती प्रतिभाताई पाटील येणार आहे, हेही मला माहीत नव्हतं. फक्त मी काय विचार केला? साठ वर्षांनी महाराष्ट्राकडे राष्ट्रपतीपद येतंय. नाही तर उत्तर प्रदेश आणि दक्षिणेकडेच हे पद गेलं. इथेच ते चाललं होतं. त्यांचं पिंगपॉंग. म्हटलं. ही संधी घालवायची नाही. मी कॉंग्रेसचा विचार केला नाही. कशाचा विचार केला नाही. फक्त महाराष्ट्राकडे राष्ट्रपतीपद येतंय. हे मी महत्त्वाचं मानलं. आता त्यांनी जर तिला नेमलं असेल मी काय म्हणणार, आता राष्ट्रपतीपद गेलं तरी चालेल, पण मी प्रतिभाताई पाटलांना मत देणार नाही, अशी भूमिका मी घेऊ शकत नाही. महत्त्वाचं काय आहे तर राष्ट्रपतीपद आणि महाराष्ट्र. याच दोन गोष्टींवरती आधारित होता तो पाठिंबा.
म्हणजे तुम्ही कॉंग्रेसला पाठिंबा दिला नाही...
- नाहीच. अर्थात मी कॉंग्रेसला पाठिंबा दिला नाही. आतासुद्धा हे जे आहेत तुमचे प्रणव मुखर्जी त्यांच्या बाबतीत माझी स्वच्छ भूमिका आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही छापता, नको त्यावेळेला मला टोलवण्यासाठी वापर करता. यावेळीही म्हटलंय हा कॉंग्रेसला पाठिंबा नाही. एक चांगला माणूस आज राष्ट्रपतीपदासाठी मिळतोय आणि तो माणूस काय आहे? ते आतलं राजकारण तुलाही माहीत आहे. तो तसा शरण जाणारा माणूस नाही. अजून सुरुवात झालेली नाही त्याची. त्यांचा स्वभाव तुम्हाला समजायचा आहे. कडक शिस्तीचा, अनुभवी माणूस आहे. मी दिला पाठिंबा.
म्हणजे तुमची भूमिका स्वच्छ आहे...
- होय. नक्कीच, पण हे पत्रकार जे आहेत काही त्यातले भाडखाऊ आहेत. भडभुंजे आहेत. काही विकाऊ आहेत. काही टाकाऊ आहेत. ते जाणिवेने काड्या घालण्याचे काम करीत असतात.
कोणत्या बाबतीत?
- आता राज आणखी उद्धव हे एकत्र आले. यामध्ये किती सुखावले, किती दुखावले? सुखावल्याचे प्रमाण किती? दुखावल्याचे प्रमाण किती? पोटदुख्या कुणाला? ते कसे तुटेल याचेही प्रयत्न आता सुरू झालेत. भांडणं लावायची दोघांची. बरोबर असे मुद्दे काढायचे की दोघांचे कुठेतरी वाजले पाहिजे. हे धंदे आता सुरू झालेले आहेत. पुढचं काय होईल ते होईल. राज कोणत्या मार्गाने जाणार आहे? उद्धवचा विचार काय आहे? ते ठरेल ना. कुठच्या तरी एका भूमिकेवरती येणार, पण तुम्ही आताच का ही भाकितं सुरू केलीत?
पण तुमचा विचार काय आहे?
- मी कशाला आता विचार करू? कशाकरिता करायचा? असं काय कोसळलंय की मला त्याचा आज विचार करावा लागतोय. काही गरज नाही त्याची मला. राजकारण असं घिसाडघाईने सोडवायचं नसतं. शत्रुपक्षाची पावलं कशी पडतात त्याच्यावरती तुमची पावलं अवलंबून आहेत. आपल्या पावलावर शत्रूंनी पाऊल नाही ठेवायचं. शत्रूच्या पावलावर आपलं पाऊल काय पाहिजे हे मी ठरवत असतो. युद्धनीती. पलीकडून काही सुरुवात होते काय याची वाट पाहा, पण आपण यडझव्यासारखे आधीच बॉम्बगोळे सोडायला लागल्यावर ते सोडणारच तुमच्या अंगावर! म्हणून हुशारीने पावलं टाकायची. आम्ही कपड्यामध्ये नागडे आहोत म्हणून आताच कशाला कपडे काढता? प्रसंग येईल तेव्हा बघू ना. आता नका नागडे होऊ. ती वाक्यं चांगली आहेत. नंगे से खुदा भी डरता है वगैरे... पण आता अशी माणसं निर्लज्ज आहेत की तुम्ही काही केलंत तरी, अगदी तुम्ही रेव्ह पार्टीला जाऊन बसलात तरी कोणी काही डरत नाही.
दिल्लीतील कोळसा घोटाळ्यात मनमोहन सिंग काळवंडले आहेत. कॉंग्रेसचे तोंड काळे झाले आहे. अजूनही तुम्हाला मनमोहन सिंग हे ‘मि. क्लीन’ वाटतात का?
- मनमोहन सिंगना मी कधीच मि. क्लीन म्हटलेलं नाही. माझ्या तोंडात वाक्यं टाकायची नाहीत आणि तुझ्यासारख्यांनी तर मुळीच टाकायची नाहीत. कॉंग्रेस पक्ष बरबटलेला आहे. क्लीन असा शब्द वापरण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. मग सीबीआयचं काय बोलतोय मी? मनमोहन म्हणजे एक बुजगावणं आहे. त्यांचा ‘प्यादं’ म्हणून वापर करतेय ती बाई. हे माझं वाक्य आहे. मनमोहन सिंगच्या बाबतीत. कसले रे हे क्लीन चीट?
कॉंग्रेसविरोधी लोकांत संताप आहे...
- नक्कीच आहे.
या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी विरोधक कमजोर पडत आहेत का?
- कमजोर म्हणण्यापेक्षा विरोधकांमध्येच सध्या एकजूट नाही राहिलीय. मतांच्या जोरावरती म्हणा किंवा त्यांच्या त्या ‘व्होट बँके’वरती म्हणा ते आपापल्या राज्यात खेळ खेळताहेत. मुलायम सिंगांची आज चलती आहे. कारण त्यांच्याकडे मतदान जास्त आहे. मायावतीला सुद्धा एक जोर येतो. कारण त्या कॉंग्रेस भिकार्‍यांना यांच्या मतांची गरज असते आणि मग त्यातून त्यांचं साटंलोटं जमतं. देवाण-घेवाण होते. माझी व्यंगचित्रकाराची एक हलकट दृष्टी आहे. ज्यावेळेला असे काही प्रसंग येतात, बहुमत वगैरे सिद्ध करण्याचे आणि त्यांना मतं कमी पडतात त्यावेळेला त्यांना भाव मिळतो. मग ती मायावती असो, मुलायम सिंग असो किंवा तुमची अगदी ममतासुद्धा. कशी वागली तरी. त्यांना त्यांची पापं माफ करतात आणि आपल्या बाजूला खेचतात. सोबतीला सीबीआय आहेच. आता थोडीशी पंचाईत येतेय.
कसली पंचाईत येतेय?
- ते मुल्ला मुलायम सिंग. त्यांनी काहीतरी तिसरी आघाडी काढलीय. बघू काय होतंय ते? या तिसर्‍या आघाडीचं काय एकंदरीत चित्र उभं राहतंय. हे जे चाललेलं आहे त्यामुळे कमजोर विरोधी पक्ष हा शब्द वापरण्याची गरज नाही. सगळेच कमजोर झालेत.
बिहारमध्ये नितीशकुमार आहेत...
- हो. आहेत ना. त्यांचंही एक तंत्र आहे ना! त्यांना मुसलमानांनी मतदान केलं म्हणून बिहारात मेजॉरिटी मिळाली. त्यामुळे भाजप अडकलाय त्यात. त्यामुळे मुसलमानांच्या विरोधात भाजप फार जोराने काही करू शकत नाही. कारण तिकडे तो बसलाय. भाजपची अर्धी सत्ता आहे ना बिहारात.
मोदींनाही नितीशकुमारांनी विरोध केला...
- होय. मोदीला का नाही बोलवत बिहारला? मोदीला त्यांनी दूर ठेवलं प्रचारापासून. कारण ती अहमदाबाद दंगल घेतली त्यांनी तिथे. मुसलमानांच्या विरोधात. ती घेतल्यामुळे मोदींना इकडे येऊ देऊ नका बिहारात प्रचाराला. आता ते मोदी आणि नितीशचे असे खडाष्टक आहे आता. ते मोदीला जवळ करीत नाही. कारण मुसलमानांच्या मतावरती परिणाम होईल. हे राजकारण आहे तुमचं दळभद्री. तुम्ही सत्तेच्या खुर्चीचे गुलाम आहात.
राजकारण असं घिसाडघाईने सोडवायचं नसतं. शत्रुपक्षाची पावलं कशी पडतात त्याच्यावरती तुमची पावलं अवलंबून आहेत. आपल्या पावलावर शत्रूंनी पाऊल नाही ठेवायचं. शत्रूच्या पावलावर आपलं पाऊल काय पाहिजे हे मी ठरवत असतो. युद्धनीती. पलीकडून काही सुरुवात होते काय याची वाट पाहा, पण आपण यडझव्यासारखे आधीच बॉम्बगोळे सोडायला लागल्यावर ते सोडणारच तुमच्या अंगावर! म्हणून हुशारीने पावलं टाकायची.

शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेले हे व्यंगचित्र.
२७ मे १९७३ ला ‘मार्मिक’च्या मुखपृष्ठावर ते प्रसिद्ध झाले. ३९ वर्षांपूर्वी उसळलेल्या जातीय दंगलीत दंगेखोर मोकाट आणि निरपराध माणसांच्या पाठीवरच कायद्याचा बडगा अशी स्थिती होती. आजही परिस्थिती तशीच आहे.


अराजकाच्याच उंबरठ्यावरती आपण उभे आहोत. मला असं वाटतंय २०१४ पर्यंत निवडणुका जाणारच नाहीत. त्याच्या अगोदरच होणार, हे माझं भाकीत आहे. पहा तुम्ही.
(क्रमश:)

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी