Monday, January 7, 2013

शोभायात्रेने शहर झाले विवेकानंदमय, १५० व्या जयंतीवर्षाची झाली सुरुवात



सोलापूर - शहराच्या मध्यवर्ती भागातून रविवारी संध्याकाळी निघालेल्या भव्य शोभायात्रेने सोलापूर विवेकानंदमय झाले. 150 व्या जयंतीवर्षाच्या शुभारंभासाठी सार्ध शती समारोह समितीने आयोजन केले होते. शोभायात्रेचे मागील टोक मंगळवार पेठ पोलिस चौकी येथे तर पुढचे टोक मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुतीमार्गे दत्त चौक इतकी भव्य शोभायात्रा होती. नामदेव चिवडा, नवी पेठ, लकी चौक मार्गे चार पुतळा शोभायात्रा आली.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-swami-vivekanand-150-birth-anniversary-celebration-starts-in-solapur-4140410-NOR.html
बाळीवेस चौकातून सायंकाळी 4 वाजता यास सुरुवात झाली. आमदार विजयकुमार देशमुख, स्वागत समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, संयोजक वल्लभदास गोयदानी, सहा. आयुक्त खुशालचंद बाहेती, केंद्राचे बसवराज देशमुख, प्रा. नरेंद्र काटीकर, डॉ. रणजित गांधी, रंगनाथ बंग, जगदीश पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, मदगोंडा पुजारी, चंद्रिका चौहान, डॉ. शोभा शाह, शुभांगी बुवा, मोहन डांगरे, बाबुभाई मेहता, प्रा. नसीमा पठाण, प्रशांत बडवे, डॉ. प्रदीप नांदगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बाल विवेकानंद, ध्यानस्थ स्वामीजी, शिकागो परिषदेतील वक्ते, महाकाली मंदिरातील स्वामीजी, लोकमान्य टिळक व जमशेदजी टाटा यांच्याशी स्वामीजींची भेट आणि स्वामीजींचा मुखवटा धारण केलेले विद्यार्थी असा थाट होता. भगवे ध्वज, स्वामीजींचे शक्तिदायी विचारांचे फलक विद्यार्थ्यांकडे होते.

या संस्थांचा सहभाग : विवेकानंद केंद्र, रा. स्व. संघ, अभाविप, ज्ञानप्रबोधिनी, भारत विकास परिषद, ज्ञाती परिषद, बी. एस. कुलकर्णी, वालचंद अभियांत्रिकी, यलगुलवार, शिवाजी, सेवासदन, एसव्हीआयटी, एसईएस चंडक, आसावा, शेठ गोविंदजी रावजी, सिद्धेश्वर वुमेन्स व इंग्लिश मीडियम, र्शाविका, सुरवसे, वसंतराव देशमुख विद्याविकास, सिद्धेश्वर आर्किटेक्चर, मॉडर्न, हिराचंद नेमचंद, जैन गुरुकुल, बीएमआयटी, ए. जी. पाटील, कस्तुरबाई कॉलेज, डॉ. रेड्डीज फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, दमाणी आदी.
भारावले शहरवासीय
‘कौन चले भाई कौन चले, स्वामीजीके वीर चले’ सारख्या घोषणांनी वातावरण भारावले होते. जवळपास 4 किलोमीटर मार्गावर रांगोळीच्या पायघड्या, अग्रभागी अश्वारुढ शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, ग्रंथपालखी, पारंपरिक वेशभूषेतील बाल नंदीध्वजधारक आणि सात नंदीध्वज, मंगल कलश घेतलेल्या सुवासिनी विद्यार्थी, बालवारकरी, टिपरी व रुमाल नृत्य करणार्‍या विद्यार्थिनी, एनसीसी व आरएसपी संचलन करणारे विद्यार्थी, रंगवण्यात आलेले बैल, स्केटिंगपटूंचा सहभाग होता.

यांचा होता सहभाग
45 शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थी - शिक्षकांनी नोंदवला सहभाग
अडीच किलोमीटरपर्यंत पसरली होती शोभायात्रा, दुतर्फा लोटली गर्दी
150 बालविवेकानंद आणि 15 चित्ररथांचे आकर्षण
हुतात्मा चौकात आतषबाजीने स्वागत व वंदे मातरम्ने सांगता

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी