Tuesday, June 11, 2013

हिंदू अधिवेशनाच्या समारोप

सिद्धराम भै. पाटील | Jun 11, 2013, 05:06AM ISTरामनाथी (गोवा) - भारत हे स्वयंभू हिंदू राष्‍ट्र असून हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू धर्मशास्त्र, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांच्या रक्षणासाठी भारताला हिंदू राष्‍ट्र घोषित करण्यात यावे, असा एकमुखी ठराव द्वितीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आज ‘जयतु जयतु हिन्दुराष्‍ट्रम’च्या उद्घोषात संमत झाला. अधिवेशनात सहभागी 21 राज्यांतील हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी भारत हिंदू राष्‍ट्र होण्यासाठी राष्‍ट्रव्यापी हिंदू संघटनांचा समान कृती कार्यक्रम निश्चित केला.


या अधिवेशनाला नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, पाकिस्तान येथील हिंदू प्रतिनिधीही उपस्थित होते. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनाची सोमवारी सांगता झाली. येत्या वर्षभरात समान ध्येयासाठी देशभरातील 20 राज्यांत प्रांतीय हिंदू अधिवेशने आयोजित करण्याचे या वेळी ठरवण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्‍ट्र आणि कर्नाटक या राज्यांत काही ठिकाणी जिल्हास्तरावर हिंदू अधिवेशने आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.

 समान कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत गोरक्षण, स्वसंरक्षण प्रशिक्षण, हिंदूंना न्यायालयीन लढ्यात साहाय्य, दंगलग्रस्त हिंदूंना साहाय्य, विदेशस्थ शरणार्थी हिंदूंना साहाय्य आदी विषयांवर हिंदू संघटनांनी संघटित होऊन कार्य करण्याचे निश्चित केले. नेपाळला पुन्हा हिंदू राष्‍ट्र घोषित करण्याचा ठराव नेपाळमधील हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींना मांडला आणि एकमुखाने तो संमत झाला.  

 या अधिवेशनाला 12 धर्माचार्य, ७0 हिंदुत्ववादी संघटनांचे 150 हून अधिक पदाधिकारी, 50 हून अधिक समाजसेवक, 15 हून अधिक अधिवक्ता, 15 हून अधिक ज्येष्ठ पत्रकार, ८ प्रवचनकार, ६ विचारवंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

अधिवेशनात एकमुखाने संमत ठराव
1. केंद्रीय गोहत्या बंदी कायदा करण्यात यावा आणि गोशाळांना अनुदान देण्यासाठी वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी.
2. भारतीय सीमांच्या रक्षणार्थ नेपाळमध्ये हिंदू राष्‍ट्र पुनर्स्थापित होण्यासाठी भारत शासनाने प्रयत्न करावेत.
3. काश्मीरमधून   निर्वासित झालेल्या हिंदूंचे सन्मानाने पुनर्वसन करण्यात यावे.
4. बांगलादेशमधील हिंदू संघटनांची शिखर संघटना असलेल्या बांगलादेश हिंदू जमाते महाज्योतच्या वतीने बांगलादेशी हिंदूंच्या हितरक्षणासाठी ठराव संमत करण्यात आला.
5.पाकिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात शरणार्थी आलेल्या हिंदूंना धर्मबंधुत्वाच्या भूमिकेतून तत्काळ भारतीय नागरिकत्व देण्यात यावे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-to-become-india-a-hindu-nation-akhil-hindu-seminar-4288455-NOR.html?SL1=

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी