Tuesday, June 11, 2013

हिंदू अधिवेशनात ठरतेय लोकसभेची रणनीती


सिद्धाराम भै. पाटील | Jun 10, 2013, 01:29AM IST
रामनाथी (गोवा) - पणजीजवळील फोंड्याच्या रामनाथी मंदिराच्या सभागृहात सुरू असलेल्या पाच दिवसीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा सोमवारी (10 जून) समारोप होत आहे. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीची विस्तृत रणनीती ठरवली जात आहे.


देशभरातील विविध शहरात आणि राज्यात प्रभावी असलेल्या शंभरहून अधिक हिंदू संघटनांचे नेते येथे तळ ठोकून आहेत. यामध्ये हैदराबादमध्ये ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ला आव्हान देणारे आणि भाग्यलक्ष्मी मंदिर रक्षण आंदोलनासाठी ओळखले जाणारे राजासिंह ठाकूर, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक, हिंदू महासभेच्या हिमानी सावरकर, हिंदू राष्‍ट्र सेनेचे धनंजय देसाई, आदी मान्यवरांचा समावेश आहे. हिंदुत्वाची अनेक आंदोलने यशस्वी केलेल्या हिंदू जनजागृती समितीने विखुरलेल्या सर्व हिंदू संघटनांना एकत्र आणले आहे. रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यासह सोशल मीडियात प्रसाराची प्रभावी यंत्रणा समितीकडे आहे.

शृंगेरी मठातही लवकरच ड्रेसकोड
श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी कर्नाटकातील महाविद्यालयांत ‘डे विकृती’ 40 टक्क्यापर्यंत थांबवल्याचे सांगितले. स्वैराचार रोखण्यासाठी देवस्थानेही पुढे येत आहेत. आता लवकरच शृंगेरी मठातही तिरुपती देवस्थानप्रमाणेच ड्रेसकोड लागू केले जाईल, असे ते म्हणाले.


काय आहे रणनीती
कॉँग्रेस हा धर्मद्रोही पक्ष आहे व भाजपही हिंदुत्वाचे नाव घेणारा पण निष्क्रिय असलेला पक्ष आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका नेत्यांनी घेतली आहे. असे असले तरी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक योग्य उमेदवार असल्याची भावना या अधिवेशनात व्यक्त झाली.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-hindu-meeting-planes-loksabha-stratagy-4287461-NOR.html

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी