Tuesday, June 11, 2013

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनास गोव्यात प्रारंभ


रामनाथी, गोवा-  बहुचर्चित अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला रामनाथी,गोवा येथील रामनाथ देवस्थानाच्या विद्याधिराज सभागृहात गुरुवारी सकाळी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. 10 जूनपर्यंत हे अधिवेशन चालणार असून पहिल्या दिवशी देशविदेशातील हिंदू संघटनांचे नेते व विचारवंत असे मिळून 300 प्रतिनिधी सहभागी झाले. हिंदू व्हाइसचे संपादक पी. देवमुथ्थू, केरळ हिंदू हेल्पलाईनचे प्रदीश विश्वनाथ, हिंदू संहतीचे तपन घोष, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यासह विविध हिंदू संघटनांच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात हिंदू हितासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. राज्यघटनेत घुसवण्यात आलेले ‘सेक्युलर’ शब्द हटवण्याची आवश्यकता आणि आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वनिष्ठांची रणनीती कशी असावी याबद्दल परिसंवादात दीर्घ चर्चा झाली. हिंदुंचे हितरक्षण आणि हिंदू राष्ट्रनिर्मिती या उद्देशाने भरवण्यात येणारे अधिवेशनाचे हे दुसरे वर्ष आहे. अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण http:/www.hindujagruti.org/summit   या मार्गिकेवरून सुरू आहे.

उपस्थित धर्माचार्य 
श्रीकृष्ण कर्वे, विजयकुमार देशमुख, प्रणवानंद रामस्वामी, बसवराज स्वामी, स्वामी महेश योगी, स्वामी प्रज्ञानंद सरस्वती आणि मलेशियातील धर्माचार्य स्वामी कुमारानंद

विविध सत्रांमध्ये व्यक्त झालेले विचार
भगवान श्रीकृष्णाचे उपासक बना
हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्णाची उपासना करा. जेथे योगेश्वर कृष्ण असतो, तेथे विजय असतो, असे गीता सांगते; म्हणून वीरशाली अर्जुनासारखे भगवान श्रीकृष्णाचे उपासक बना, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय नेते डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

धर्मशिक्षण आवश्यक
कानपूरचे पीतांबर योगपिठाधीश्वर स्वामी प्रज्ञानंद सरस्वती म्हणाले, देशात 80 कोटी हिंदू आहेत. संसदेत, विधानसभांमध्ये बहुसंख्येने हिंदू असले, तरी कोणी हिंदूहितासाठी पुढे येत नाही. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण दिले पाहिजे.

धर्मसाक्षर होण्याची गरज
कोलकाता येथील हिंदू एक्झीस्टन्स या संकेतस्थळाचे संपादक उपानंद ब्रह्मचारी म्हणाले, हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंच्या मनात संशय असल्याने हिंदू राष्ट्राची स्थापना होऊ शकली नाही. यासाठी प्रत्येक हिंदूने आत्मविश्वास आणि श्रद्धा ठेवून कृतीशील झाले पाहिजे. हिंदू साक्षर झाले असले, तरी धर्माविषयी निरक्षर आहेत.

संकटकाळी धावून जा
उत्तरप्रदेशातील आर्य समाजाचे स्वामी महेश योगी म्हणाले, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते बंगालपर्यंतच्या हिंदूंवर कोठेही संकट आले, तर हिंदूंनी संघटितपणे त्यांच्या साहाय्यासाठी धावून गेले पाहिजे.

आशीर्वादात्मक संदेश
कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती, पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती, तसेच आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे हिंदू अधिवेशनासाठीचे आशीर्वादात्मक संदेश वाचून दाखवण्यात आले.

>संतांच्या उपस्थितीत मंगलमय आणि सात्त्विक वातावरणात सुरुवात
>शंखनाद, दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठणाने आरंभ
> सनातन संस्था निर्मित मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेतील ग्रंथांचे प्रकाशन
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-akhil-bharatiya-hindu-adhivation-in-goa-4284824-NOR.html

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी