Tuesday, June 11, 2013

हिंदू हिताला प्राधान्य दिल्यास पाठिंबा

द्वितीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ठराव 
प्रतिनिधी । रामनाथी ( गोवा) 
जो राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीत हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी, भ्रष्ट शक्तीला संधी देईल त्याला विरोध करू आणि जो राजकीय पक्ष निवडणुकीच्या घोषणापत्रात हिंदू हिताला प्राधान्य देईल त्यालाच पाठिंबा देण्याचा ठराव गोव्यातील हिंदू अधिवेशनात मंजूर करण्यात आला. 
शनिवारी आयोजित 2014 च्या निवडणुकीत 'हिंदुत्वनिष्ठांची रणनीती' या विषयावरील चर्चासत्रात उपस्थित असलेल्या देशभरातील हिंदू विचारवंतांनी हा ठराव सर्वमताने घोषित केला. हिंदूंची व्होट बँक करून हिंदू बहुसंख्याकांच्या शक्तीची अल्पसंख्याकांच्या मतांसाठी लांगुलचालन करणार्‍या सर्व राजकीय पक्षांना जाणीव करून देऊ. 'जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पर राज करेगा,' अशी नवीन घोषणा असेल.हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी या ठरावांचे वाचन करताना सांगितले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने स्वत:चे घोषणापत्र बनवून ते सर्व राजकीय पक्षांना पाठवू. जो पक्ष ते मान्य करून स्वत:च्या घोषणापत्रात त्याचा समावेश करेल आणि निवडणुकीनंतर त्यानुसार प्रत्यक्ष कृती करण्याचे वचन देईल, अन्यथा सत्तेवरून उतरण्याचे मान्य करेल त्यालाच हिंदूंनी मतदान करावे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

9 june 2013, divya marathi, p 8

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी