Tuesday, September 9, 2014

एक अघोषित युद्ध - लव जिहाद

लव्ह जिहाद रोखणे काही खूप सोपे आहे असे नाही. कारण लव्ह जिहाद नावाची काही चीज नाहीच, असे समाजात बिंबवण्यासाठीही एक मोठा गट काम करत आहे. ही मंडळी समाजात सेक्युलरवादी म्हणून वावरतात. पत्रकार, विचारवंत म्हणून समाजात मान्यता असलेला हा वर्ग आहे. धर्मनिरपेक्षतेची भाषा या मंडळींना चांगलीच अवगत आहे. सेक्युलॅरिझमच्या आडोशाने लव्ह जिहादला विरोध करणारेच कसे जातीयवादी आहेत, हे सांगण्याचे काम बुद्धीजीवी जिहादी करत असतात.


राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज तरुणी तारा शाहदेव हिला 'सारा' बनवण्यासाठी रकीबुल हसन याने स्वत:चे नाव रंजित सिंह कोहली असल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे तारा हिच्या लक्षात आल्यानंतर तिने धाडस करून या प्रकरणाला वाचा फोडली आणि तेंव्हा कुठे वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे यांनी दबक्या आवाजात का होईना 'लव जिहाद' या विषयावर चर्चा सुरू केली. तसे पहिले तर गेल्या चार-पाच वर्षांपासून 'लव जिहाद' विषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. आता लव्ह जिहादची चर्चा राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिन्याही करू लागल्या आहेत.

'लव्ह जिहाद'ची चर्चा सुरू होताच सेक्युलॅरिझमचा जप करणारे बुद्धीजीवी पुढे सरसावले आहेत. 'लव्ह जिहाद' ही हिंदुत्ववावादी संघटनांनी केवळ राजकारणासाठी पुढे रेटलेली चाल आहे, हे सांगण्याची चढाओढ सुरू झालेली आहे. 'लव्ह जिहाद' हा शब्द वापरण्यास न्यायालयाने प्रसिद्धी माध्यमांवर बंदी घालवी, अशी मागणी करणारी याचिकाही कोणीतरी एकाने दखल केली आहे. राज बब्बर नावाच्या राजकीय नटाने 'लव्ह जिहाद'चे समर्थन करताना म्हटले आहे की जिहाद म्हणजे ईश्वरी तपश्चर्या आहे, जिहादमध्ये वावगे असे काहीच नाही.
''मग जेव्हा निषिद्ध महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा. त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहा.'' (कुराण, ९.५)
आकाशातून पडलेले पाणी या ना त्या मार्गाने अंती समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही ईश्वराची केलेली उपासना अंती एकाच ईश्वराला जाऊन मिळते. (शिवमहिम्न स्तोत्र)
विचारधारांमधील हा फरक जोवर भारतीय समजून घेणार नाहीत तोवर त्यांना जिहाद समजणे शक्य नाही. जिहाद समजला नाही तर 'लव्ह जिहाद' समजणे कदापी शक्य नाही. कुराण किंवा इस्लामी ग्रंथांमध्ये लव्ह हा शब्दच नाही, त्यामुळे लव्ह जिहाद नावाचा काही प्रकार असूच शकत नाही, अशा प्रकारचे हास्यास्पद युक्तीवाद केले जातील.
युक्तीवाद काहीही करण्यात येत असले तरी हिंदू मुलिंना पटवण्यासाठी मुसलमान तरुण हिंदू नावे धारण केल्याचे अनेक उदाहरणे पोलिस तपासात पुढे आली आहेत.
केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन (माकप) म्हणाले की, पाॅप्युलर फ्रंट आॅफ इंडिया ही संघटना 'लव्ह जिहाद'चा वापर करून केरळचे २० वर्षात इस्लामीकरण करू पाहात आहे.

'लव्ह जिहाद' प्रकरणी केरळच्या पोलिस महासंचालकांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालावर सुनावणी होताना केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. टी. शंकरन म्हणाले, ''या अहवालातून राज्यात वर्ष १९९६ पासून प्रेमाच्या नावाखाली बळाने धर्मांतर करण्याची चळवळ सुरू आहे. महाविद्यालयांचा परिसर हे धर्मांतराचे अड्डे बनू नयेत, यासाठी, तसेच आणि राज्यात बलप्रयोगाने होत असलेले धर्मांतर रोखण्यासाठी राज्य शासनाने कायदा करावा.''
व्हाइस आॅफ जस्टीसच्या पुढाकाराने सिक्कीम उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधिश न्यायमूर्ती सुरेंद्र भार्गव, आंध्र प्रदेशचे माजी पोलिस महासंचालक टी. एस. राव यांच्या समितीने लव्ह जिहादची सत्यता सांगणारा ''लव्ह जिहाद : मिथ आॅर रिअलिटी'' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. लव्ह जिहादची शेकडो प्रकरणे पुढे येत असली तरी सरकार किंवा पोलिस यंत्रणा त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत, हेही अनेकदा पुढे आले आहे.
महाराष्ट्रात वाढत्या लव्ह जिहादच्या घटनांविषयी विरोधी पक्षांनी विधानसभेत आवाज उठवल्यामुळे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी त्याविषयी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्धीकी यांनी चौकशी करण्यास विरोध दर्शवला आणि दबाव आणला. त्यानंतर नितीन राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, ''परस्पर संमतीने होणाऱ्या हिंदू मुसलमाना सज्ञानांच्या विवाहांमध्ये शासन हस्तक्षेप करूच शकत नाही. त्यामुळे हिंदू मुलींशी मुसलमानांच्या होणाऱ्या विवाहांची चौकशी करण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही. मुसलमान तरुणांच्या टोळ्या हिंदू मुलींना फसवून धर्मांतरित करत असल्याविषयी तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत असला तरी अशा टोळ्या कार्यरत नाहीत.''
विश्व हिंदू परिषदेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार वर्ष २००९ पर्यंत १ लाख २० हजार हिंदू मुली लव्ह जिहादला बळी पडून धर्मांतरीत झाल्या आहेत.
लव्ह जिहादची चर्चा अलीकडील काळात होत असली तरी हा प्रकार नवीन नाही. लव्ह जिहाद हा शब्द अलीकडे वापरात आलेला असला तरी हिंदू तरुणी आणि महिलांना बळजबजबरीने किंवा फसवून मुसलमान करण्याचा प्रकार शेकडो वर्षांपासून भारतात सुरू आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी लिहीले,
किती गुज्रिणी, ब्राह्मणी भ्रष्टविल्या । किती शांमुखी जाहजी फाकविल्या ।
कितीयेक देशांतरी त्या विकिल्या । किती सुंदरा हाल होवोनि मेल्या ।।
त्या काळातील लव्ह जिहादचे बिभत्स रूपच यातून समोर येते.
गेल्या महिन्यात, ३० आॅगस्ट २०१४ रोजी निवर्तलेले प्रसिद्ध इतिहासकार बिपीन चंद्रा म्हणतात, ''अकबर याने जोधाबाईचे केलेले अपहरण, ही एक प्रकारची लव्ह जिहादची ऐतिहासिक लहान आवृत्तीच होती.''
अल्लाउद्दीन खिलजी याने चितोडची राणी पद्मिनी हिचे शीलहरण करण्यासाठी चालून आला तेव्हा राणी पद्मिनीसह आठ हजार स्त्रियांनी जोहार केला. अर्थात अग्नीत उडी घेऊन प्राणत्याग केला. गेली तेराशे वर्षे जिहादने प्रेरित होऊन कधी बळजबरीने तर कधी लाडीगोडीने तर कधी फसवून हिंदू स्त्रियांशी निकाह (विवाह) केल्याच्या हजारो घटना घडल्या आहेत. आजच्या काळात हा प्रकार लव्ह जिहाद या नावाने चर्चेत आला आहे, एवढेच.
संपूर्ण जगाला दार उल इस्लाम करणे, हेच ध्येय असलेल्या अनेक संघटना जगभर काम करत आहेत. जे मुसलमान नाहीत, ते काफीर आहेत असे या कट्टर मुस्लिम संघटनांचे म्हणणे असते. काफिरांना बळजबरीने का होईना मुसलमान करणे, पवित्र धर्मकर्तव्य असल्याचे धर्मवेड जिहादींमध्ये असते. यासाठी प्रसंगी तलवार हाती घेणेही पवित्रच मानण्यात आले आहे. संपूर्ण भारताला इस्लाममय करणे, यासाठीचा एक मार्ग म्हणजे लव्ह जिहाद होय.
लव्ह जिहाद रोखणे काही खूप सोपे आहे असे नाही. कारण लव्ह जिहाद नावाची काही चीज नाहीच, असे समाजात बिंबवण्यासाठीही एक मोठा गट काम करत आहे. ही मंडळी समाजात सेक्युलरवादी म्हणून वावरतात. पत्रकार, विचारवंत म्हणून समाजात मान्यता असलेला हा वर्ग आहे. धर्मनिरपेक्षतेची भाषा या मंडळींना चांगलीच अवगत आहे. सेक्युलॅरिझमच्या आडोशाने लव्ह जिहादला विरोध करणारेच कसे जातीयवादी आहेत, हे सांगण्याचे काम बुद्धीजीवी जिहादी करत असतात.
जिहादविषयी अज्ञान असणारे परंतु हिंदू-मुस्लिमांमध्ये एकोपा नांदायला हवा, असे प्रामाणिकपणे वाटणारे लेखक, पत्रकार, विचारवंत यांना खुबीने वापरण्यातही छद्म जिहादी अतिशय तरबेज आहेत. त्यामुळे बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरणावर मौन असणारे अनेक बुद्धीजीवी लव्ह जिहाद नावाचा काही प्रकारच नाही, हे सांगण्यासाठी हिरीरीने पुढे येताना दिसतात.
इस्लामी स्टेटचे अतिरेकी भारतातही येऊ पहात आहेत. भारतातील अनेक मुस्लिम तरुण इस्लामी स्टेटच्या अतिरेक्यांच्या बाजूने लढण्यासाठी इराकला रवाना झाले. इस्लामी स्टेटच्या अतिरेक्यांनी गेल्या आठ महिन्यात इराक व सिरियातील १३ हजार शिया मुसलमानांना क्रूरपणे ठार केले. या अतिरेक्यांनी आपल्या संघटनेच्या नावात इस्लाम शब्द वापरला म्हणून जगातील कोणीही सेक्युलरवादी आक्षेप घेताना दिसत नाही. पण लव्ह जिहाद हा शब्द वापरल्याने इस्लामची बदनामी होते असे मात्र कंठरवाने सांगितले जाते.
लव्ह जिहादचे कारस्थान रचणारे कोणी असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कोणीच सेक्युलर अथवा मुस्लिम धर्मगुरू करताना दिसत नाही.

लाखाहून अधिक हिंदू मुलींना प्रेमात फसवून नंतर मुसलमान बनवले जाते, तरीही त्याबद्दल ब्र ही न काढणारे 'लव्ह जिहाद' या शब्दाचा वापर प्रसिद्धी माध्यमातून होत असल्याने इस्लाम बदनाम होत आहे, असा टाहो फोडतात. हा दांभिकपणाच नाही काय?
हिंदू समाजाचा शांततेवर अधिक विश्वास आहे; संघटित राहण्यात नाही. संघटना म्हणजे समस्या. परंतु केवळ शांततावादी राहिल्याने एकांतिक धर्मियांच्या आक्रमणाला तोंड देणे अशक्य आहे. इतिहासाने हे पुन्हा पुन्हा दाखवून दिले आहे. एकांतिक धर्मियांची विचारधारा भयंकर आहे. एकांतिक धर्मियांना हाताळण्यासाठी हिंदूंनी बदलले पाहिजे. हिंदू बदलला नाही तर कदाचित आणखी शंभर वर्षांनी त्याचे अस्तित्वच धोक्यात असेल.

विख्यात इतिहासकार सॅम्युअल हंटीग्टन याने म्हटले आहे की, हिंदुत्व ही एकच विचारधारा जगाच्या पाठीवर अशी आहे की यामध्ये धर्म आणि आध्यात्म वेगवेगळे आहेत; इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांमध्ये असे नाही.
भारतात उगम पावलेले सारे धर्म म्हणतात, माझा धर्म सत्य आहे, तसे तुमचेही धर्म सत्य आहेत. एकांतिक धर्म म्हणतात, जगात केवळ माझाच धर्म श्रेष्ठ आहे. संपूर्ण जग माझ्याच धर्माचे झाले पाहिजे. यातून सुरू होतात धर्मांतरण. धर्मांतरणाचाच एक प्रकार आहे लव्ह जिहाद.
सिक्युलर बुद्धीजीवी काहीही म्हणोत लव्ह जिहादचा धोका आता हिंदू समाजाने ओळखला आहे, हे सुचिन्हच आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी