Monday, December 5, 2011

मार्केट इकॉनॉमी की मार्केट सोसायटी (FDI)

गेले काही दिवस FDI या विषयावर उलट सुलट चर्चा सुरु आहे. FDI ला विरोधकांकडून जोरदार विरोध झाला. संपुआमधील घटक पक्षांनीच नव्हे तर केरळमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांनीही विरोध केला. बहुतांश वृत्तपत्रांची भूमिका FDI ला पाठींबा देण्याची राहिली. त्यामुळे परकीय गुंतवणूक काशी फायदेशीर आहे, बाजू जोरदारपणे समोर येत राहिली. दुसरी बाजू ठीक प्रकारे समजलीच नाही. विख्यात अर्थ तज्ज्ञ एस. गुरुमूर्ती यांचा या विषावरील दुसरी बाजू मांडणारा एक लेख वाचण्यात आला. पाहा ही बाजू कशी वाटते ? ज्यांना शक्य आहे त्यांनी या लेखाचे मराठी रुपांतर करावे, ही विनंती. 

Saturday, December 3, 2011

तब्बल 811 वर्षांनंतर उभारला देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ

दिव्य मराठी नेटवर्क । मोहाली (पंजाब) - पंजाबमधील ऐतिहासिक चप्पडचिडी या गावात मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी बुधवारी देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ 'मिनार-ए-फतेह'चे उद्घाटन केले. नांदेड येथील बाबा बंदासिंग बहादूर यांनी 300 वर्षांपूर्वी पंजाबमधील सरहिंदचा नवाब वजीर खानावर मिळवलेल्या यशाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा स्तंभ उभारण्यात आला आहे. कुतुबमिनारनंतर 811 वर्षांनी उभारण्यात आलेला हा देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-minar-e-fateh-in-panjab-2611963.html

Friday, December 2, 2011

मला भावलेली एक मेल

मित्रांनो, आपल्या इन बॉक्समध्ये अनेक मेल येत असतात. त्यातील काही मनाला भावून जातात. माझ्या इन बॉक्समध्ये नुकतीच एक मेल पडलेली दिसली. 'Save the Indian Rupee ........ Save India' ही मेल विचार प्रवृत्त करून गेली. ती मेल येथे देत आहे...

Thursday, December 1, 2011

धन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया !

गुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय)  सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. यापूर्वी याप्रकरणाचा तपास करणा-या विशेष्‍ा तपास पथकाच्‍या (एसआयटी) टीमने इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरण बनावट असल्‍याचे म्‍हटले होते. 

Monday, November 28, 2011

Truth of Secular Media




Tehelka armtwisted Goa govt into funding its literary fest

A crusader turns collector
Devika Sequeira, Nov 12, Panaji:
http://www.deccanherald.com/content/204473/a-crusader-turns-collector.html

After several preliminaries and high-power calls-some of them from Sonia

Gandhi's political adviser Ahmed Patel -''Tehelka'' publisher and chief
operating officer Neena Tejpal met Chief Minister Digambar Kamat in Goa
weeks ahead of ''Think 2011'', the magazine's 'festival of ideas' that
was held here from November 4 to 6.

युरेनियम साठ्यावर बसलेले भुजंग - ख्रिश्‍चन मिशनरी

एस. गुरुमूर्ती ( लेखक हे राजकीय विश्लेषक आणि विख्यात विचारवंत आहेत. )
गेल्या काही आठवड्यांपासून  कुडनकुलम च्या अणुवीज केंद्राच्या विरोधातले आंदोलन टीव्हीवरच्या रिऍलिटी शोप्रमाणे सुरू आहे. सतत बातम्यांच्या शोधात असणार्‍या दृकश्राव्य माध्यमांनी, १३ हजार कोटी रूपये खर्चुन पूर्ण झालेले आणि पूर्णत्वास आलेले हे ऊर्जा केंद्र बंद पाडण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला काही माध्यमांनी तर मॅटिनी शोचे स्वरूप आणले आहे. या सार्‍या प्रकारात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भ्रष्ट नक्कल केली जात आहे. आणि माध्यमे त्यातले नाट्य वाढवायचा प्रयत्न करीत आहेत. इथली जनता हतबल झाली असून ती जगण्याचा हक्क मागत आहे, असे माध्यमांकडून दाखवले जात आहे.

Saturday, November 19, 2011

सुखी गृहस्थी जीवनासाठी...

यशस्वी गृहस्थी जीवनाचा आधार सुखी दांपत्य असतो. पती-पत्नींमध्ये एकमेकांप्रती सन्मानाची भावना असेल आणि स्वाभिमानाची मर्यादा न ओलांडण्याचा विवेक असेल तरच दांपत्य जीवन सुखी बनणे शक्य आहे. पती पत्नीशी किंवा पत्नी पतीशी सन्मानाने वागत नसल्यास तिथे परामात्मा राहू शकत नाही. परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. ज्या घरात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल तिथेच त्याचा वास असतो.

Wednesday, November 16, 2011

भारताला बलशाली होण्यापासून रोखाणा-या शक्ती

भारताला बलशाली होण्यापासून रोखाणा-या शक्ती कशा रीतीने कार्यरत आहेत, हे सांगणारा एस. गुरुमूर्ती यांचा हा लेख कोणाच्याही डोळ्यात अंजन घालू शकेल. या अतिशय महत्वाच्या विषयावरील या लेखाचा अनुवाद करून कोणीतरी मराठीत आणेल का ? असे लेख मराठीतूनही प्रकाशित झाले पाहिजेत. ( कृपया कोणी या लेखाचा अनुवाद केलाच तर तो psiddharam@ gmail.com या पत्त्यावर पाठवावा ही विनंती.)

Forces halting our n-surge
The agitation against the Koodankulam Nuclear Power Plant has been running as a TV reality show for weeks now. The news-starved visual media has reduced the Koodankulam nuclear plant — a national investment of Rs 13,000 crore and just about to start — to a day-matinee-night show.

Thursday, November 10, 2011

'देऊळ' पाहून मनात आलेले काही प्रश्न

हिंदू विचारांवर श्रद्धा असलेला मी एक कार्यकर्ता आहे. अन्य धर्म जन्मास येण्यापूर्वीही हिंदू धर्म अस्तित्वात होता. तेव्हा या धर्माला सनातन धर्म म्हणत. जगातील अन्य भागातील लोकांना कपडे घालायचीही बुद्धी नव्हती तेव्हा या भारत देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती.

सरकारलाही नाही माहित, सोनिया गांधींनी कुठे कुठे केला परदेश दौरा

नवी दिल्ली. वृत्तसंस्था . संयुक्त पुरोगामी आघाडी आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कुठे कुठे परदेश दौरा केला याची माहिती सरकारच्या कोणत्याच मंत्रालयाकडे उपलब्ध नाही, असे दिसते. माहितीच्या अधिकाराखाली दाखल झालेल्या अर्जातून ही बाब समोर आली आहे. सोनिया गांधी यांच्या परदेश दौ-याविषयी माहिती मागणारा एक अर्ज माहितीच्या अधिकाराखाली दाखल झाला आहे आणि हा अर्ज सध्या वेगवेगळ्या विभागात फिरत आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी