Thursday, November 10, 2011

सरकारलाही नाही माहित, सोनिया गांधींनी कुठे कुठे केला परदेश दौरा

नवी दिल्ली. वृत्तसंस्था . संयुक्त पुरोगामी आघाडी आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कुठे कुठे परदेश दौरा केला याची माहिती सरकारच्या कोणत्याच मंत्रालयाकडे उपलब्ध नाही, असे दिसते. माहितीच्या अधिकाराखाली दाखल झालेल्या अर्जातून ही बाब समोर आली आहे. सोनिया गांधी यांच्या परदेश दौ-याविषयी माहिती मागणारा एक अर्ज माहितीच्या अधिकाराखाली दाखल झाला आहे आणि हा अर्ज सध्या वेगवेगळ्या विभागात फिरत आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-sonia-gandhi-foreign-tour-and-rti-2554013.html?SL1=

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील कैलाश कंवर यांनी माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज दाखल केला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या दोन वर्षात कुठे कुठे दौरा केला आणि त्यावर किती खर्च झाला, याची माहिती या अर्जाद्वारे मागण्यात आली आहे. अलीकडेच सोनिया गांधी यांच्यावर अमेरिकेत करण्यात आलेल्या उपचाराविषयीही माहिती मागितली आहे.
परराष्ट्र मंत्रालयात हा अर्ज दाखल करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने हा अर्ज सांसदीय कामकाज मंत्रालयाकडे पाठविला. या अर्जावत टिपण्णी करताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, संसद सदस्य असल्यामुळे सोनिया गांधी यांच्या परराष्ट्र दौ-याची माहिती सांसदीय कामकाज मंत्रालयाकडे असेल.
राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी यांनी केलेल्या दौ-याशी संबंधित प्रश्न आरटीआय कलम 6 (3) II नुसार सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाला पाठविण्यात आले. यानंतर सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाने हा अर्ज राष्ट्रीय सल्लागार परिषदेला परत करताना टिपण्णी केली की, मंत्रालय एनएसी सदस्यांची माहिती ठेवत नाही. सध्या तरी सोनिया गांधी यांच्या दौ-याची माहिती शोधात हा अर्ज वेगवेगळ्या मंत्रालयात फिरत आहे.

--
Sr. Sub Editor, divyamarathi.in, Sambhajinagar (Aurangabad). 9325306283.
visit @ 
www.psiddharam.blogspot.com
divyamarathi.in

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी