
आज
कुठे भगूरला, उद्या पुणे, परवा सांगली… सगळा प्रवास लाल डब्यातून
(एसटीने). गडचिरोली व चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात
व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ त्यांनी
पेटवलाय. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. परवा वाशीम
जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील सभेला 40 हजारांची उपस्थिती होती अन् नाशिक जिल्ह्यातील पिंपळनेरला 30 हजारांची. हे वर्णन आहे 58 वर्षीय ऍड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचं. ‘लव्ह जिहाद’ ही समस्या हळूहळू वाढत असल्याचं
त्यांना जाणवलं. लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना सावरता सावरता लव्ह
जिहाद थोपवणं, त्याविषयी जनजागृती करणं हे त्यांचं अंगीकृत कार्यच होऊन
गेलं.


कुंभमेळाकेवळ भारतीयांच्याच नव्हे तर
संपूर्ण जगाचे आकर्षण आहे. प्रचंड आस्थेपायी भारतातील लोक सर्व प्रकारचे
भेद विसरून कुंभमेळ्यात पुण्यप्राप्तीच्या हेतूने जातच असतात. त्याचवेळी
भारतीयांना एकत्र आणणारी अशी कुठली आस्था आहे, याचा शोध घेण्यासाठी अनेक
विदेशी लोक आवर्जून हा कुंभमेळा बघण्यासाठी येत असतात. कोट्यवधी लोकांची
श्रद्धा हा जगातल्या अन्य देशांसाठी तसा कुतुहलाचाच विषय असतो. यामागे
कुठले रसायन आहे, याचा शोध घेण्यासाठी भारतात आले आणि रामनामाची चादर
लपेटून येथेच रमले अशीही असंख्य उदाहरणे आहेत.


एकूण दहा योगस्थिती मिळून एक सूर्यनमस्कारबनतो. प्रत्येक सूर्यनमस्कारापूर्वी ‘ॐ मित्राय नम:
मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील आपल्यासाठी पिटीचा एक वेगळा तास असतो. आपले पालकहीआपल्याला शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानीखेळ खेळण्यास प्रोत्साहित करीत असतात.मात्र, रोजची शाळा, शिकवणी वर्ग, हॉबी क्लासेस यामध्ये आपला बराचसा वेळ चालला जातो. त्यामुळे रोज घरी व्यायाम करायला कंटाळा येतो. तसेच रोजच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपण व्यायाम देखील करू शकत नाही.