संस्कृती शोध
वसंत गद्रे
वसंत गद्रे
मी
फक्त एका समाजाला सोडून दुसऱ्या समाजात प्रवेश केला आहे. अशिक्षित,
अतार्किक, अशास्त्रीय अशा मुस्लीम उम्मांना सत्य विचारात घेण्याची
आवश्यकता वाटत नाही. अंधारातून मी वैदिक धर्माने दाखवलेल्या प्रवेशात येत
आहे. या धर्मात सत्याला मान आहे, शंकाकुशंकांना जागा आहे. विचारांची
देवाण-घेवाण होऊ शकते. मी माझे उरलेले आयुष्य अशा समाजात घालवण्याचे
निश्चित केले आहे. मौलवी महबूब अलींनी 'पंडित महेंद्रपाल आर्य' हे नाव
स्वीकारले.



मुकुल कानिटकरश्रीरामकृष्ण
परमहंसांना काशी विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा झाली. पूर्ण तयारीने
ठाकूरांबरोबर काही शिष्य आणि त्यांचे प्रबंधक मथुरबाबू रेल्वेने काशीला
निघाले. एका डब्ब्यात ठाकूर आणि भक्तगण व शेजारी दुसर्या डब्ब्यात
प्रसादाची सामग्री मथुरबाबूंनी घेतली होती. फळं, मिठाई अशा अनेक गोष्टी
होत्या.देवघर स्थानकावर गाडी खूप वेळ थांबते. ठाकूर बाहेर फलाटावर पाय
मोकळे करायला उतरले. ही बहुदा १८६८ ची घटना असावी. बंगालमध्ये दुष्काळी
परिस्थिती होती.
नवा
पोप निवडण्याची कार्डिनल मंडळींची बैठक पूर्ण होऊन तिथून अखेर जॉर्ज मारिओ
बर्गोग्लिओ यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. बर्गोग्लिओ हे ब्यूनोस
आयर्सचे आर्चबिशप आहेत. ब्यूनोस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आहे. अशा
प्रकारे अखेर पोप पदाचा सन्मान दक्षिण अमेरिका खंडाकडे गेला आहे.
बर्गोग्लिओ हे मूळचे इटालियनच आहेत. सर्वात महत्त्वाची आणि अभ्यासकांच्या
भुवया उंचावणारी गोष्ट म्हणजे ते जेसुइट आहेत.