पांडुरंग डिंगरे ऊर्फ तात्या यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते
मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या मानपत्रातील मजकुरावरून वाद निर्माण
करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने...
तात्या, आपल्याला मानपत्र देण्याचा दिमाखदार सोहळा पंढरीत शनिवार, दि. १५
जानेवारी रोजी पार पडला आणि तुमच्या नंतरच्या पिढीतील माझ्यासारख्या
तरुणांना 'देशभक्ती'चा गौरव सोहळा पाहून हर्ष झाला. केंद्रीय ऊर्जामंत्री
सुशीलकुमार शिंदे यांनाही 'आम्ही हिंदुत्व विचाराचे आहोत' असे सांगण्याचा
मोह आवरला नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ''आपण हिंदू आहोत.
'हिंदू' या शब्दातून मला कोणताही वाईट अर्थ ध्वनीत करावयाचा नाही.
त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे याच्याशी मी सहमत नाही. जे आपला द्वेष करीत
आले त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिकटविला असेल. पण त्याचे काय! हिंदू
या शब्दाने जे उज्ज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे त्याचा निर्देश व्हावा की
जे लज्जास्पद आहे, जे पायदळी तुडविले गेलेले आहे, जे दैन्यवाणे आहे अशाचा
बोध व्हावा हे आपल्यावर अवलंबून आहे. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील
अधिकांत अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध
होऊया.''तात्या, आपण नेमके हेच केले. आपल्या जीवनकार्याचा ना. शिंदे
यांनी ''राजकारणी असून जो सत्शील आहे, विद्वान आहे, जो भगवंताच्या
चरणापाशी रहातो, जो भगवंताने दिलेला प्रसाद समाजाला समाजकारणरूपाने देतो,
अशा राजकारणी माणसाच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी आज मी येथे आलो आहे.
तात्यांचा सत्कार म्हणजे सद्गुणांची पूजा आहे. तात्यांनी जो प्रकाश दिला,
तो प्रकाश सर्वतोपरी पसरणे गरजेचे आहे.'' अशा शब्दांत गौरव केला. या
प्रकाश सोहळ्यामुळे हिंदुत्वावर तुटून पडण्यासाठी टपलेल्या दिवाभितांना
जणु संधीच मिळाली. आपल्या ढोलीत घुत्कार करीत दुर्गंधी पसरविण्यार्या
दिवाभितांना मानपत्रावरून मळमळ ओकून त्यात आनंद मानण्याची आयती संधीच
मिळाली.'मुसलमानांना पाकिस्तान दिल्यानंतर उरलेल्या भारतात त्यांना
राहण्याचा अधिकार नाही, हे ठणकावून सांगणारे एकमेव कॉंग्रेसवाले तुम्ही
आहात', असा उल्लेख मानपत्रात करण्यात आला आहे. या वाक्यामुळे सेक्युलर
दिवाभितांना हजार इंगळ्या डसल्यासारखे झाले.तात्या, असे होणे हे
स्वाभाविकच होते. भारतमातेचे तुकडे पडले त्याचे शल्य न बोचणार्यांना,
काश्मिरातून हिंदूंचे निर्वंश करण्यात येऊनही हृदयाला वेदना न
होणार्यांना, पाकिस्तानातील हिंदू गेल्या ६० वर्षांत नरकयातना भोगतोय-
लक्षावधींना धर्म वाचविण्यासाठी भारतात पळून यावे लागले, याची वेदना न
होणार्यांना, सोलापुरातील शास्त्रीनगर, होटगीसारख्या ठिकाणी जिहादी
अतिरेकी सापडल्याचे समजल्यानंतरही त्याबद्दल चकार शब्द न
उच्चारणार्यांना हिंदुत्वाचा गौरव सहन न होणे समजण्यासारखे आहे, परंतु
बाबासाहेबांनी देशाची फाळणी होतेवेळी लोकसंख्येची अदलाबदल करण्याची मागणी
केली होती. म्हणजेच मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली होती.
बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण साधणार्या मंडळींनी मानपत्रातील
वाक्याला आक्षेप घेऊन आंदोलनाची भाषा करावी, हे न उलगडणारे आहे. इतकेच
नाही, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचाराने चालणार्या पक्षातील
पुढारी अफजलखानवधाच्या छायाचित्राला विरोध करणार्या बेगडी शिवभक्तांच्या
हातात हात घालून हिंदुत्वद्वेषींच्या कळपात सामील होणे, हा तर करंटेपणाच
झाला. हे सारं पाहून तात्या तुम्हाला या वयात वेदना होत असणार हे आम्ही
समजू शकतो. परंतु तात्या विश्वास असू द्या, या मूठभर सेक्युलर
दिवाभितांचा प्रसिद्धीमाध्यमांत भलेही प्रभाव असेल, जातीद्वेषाचे
स्वार्थी राजकारण भलेही या मंडळींना करू द्या. सत्य काय आहे, हे या
मुखंडांना माहीत नाही असे थोडेच आहे.'सत्य कुणाच्या रागालोभाची पर्वा
करीत नाही' हे आपण जगून दाखविलात. या देशाचे तुकडे धर्माच्या आधारावर
होणार असतील आणि मुसलमानांना पाकिस्तानच्या रूपात हा देश तोडून देत असाल,
तर किमान सार्या मुसलमानांना पाकिस्तानात पाठवा, अशी तुमची भूमिका होती.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक
देशभक्त महापुरुषांची हीच धारणा होती. या सत्याचा उल्लेख मानपत्रात होणे
हा अपराध कसा ठरतो? सत्तासुंदरीसाठी आसूसलेल्या तत्कालीन कॉंग्रेसच्या
नेत्यांनी मातृभूमीचे तुकडे गलितगात्र होऊन स्वीकारले. 'मी फाळणी होऊ
देणार नाही. फाळणी व्हायचीच असेल, तर ती माझ्या मृतदेहावरून होईल', असे
आश्वासन देणार्या गांधीजींनी हतबल होऊन देशाच्या फाळणीला मान्यता दिली.
लक्षावधी भारतीयांना आपल्याच मातृभूमीतून परागंदा व्हावे लागले. हजारोंची
कत्तल झाली. फाळणीच्या वेळी २५ टक्के असलेला हिंदू आज पाकिस्तान-बांगला
देशात ३-४ टक्के तरी उरला आहे काय, याची चिंता मानपत्रावरून राजकारण
करणार्या शहाण्यांना आहे काय?गेल्या तीस वर्षांत आसामातील ६ जिल्हे
बांगला देशातील मुस्लिमांच्या घुसखोरीने मुस्लिमबहुल झाले आहेत. आता
आसामचा मुख्यमंत्री कोणत्याही क्षणी बांगलादेशी बनू शकतो, अशी स्थिती
आहे. भारताला 'दारुल इस्लाम' बनविण्यासाठी जिहादी शक्ती देशात कशा रीतीने
सक्रिय झालीय, हे कधी पंढरपुरातल्या या 'हिंदू-मुस्लिम' एकतेची ओढ
लागलेल्या पुढार्यांना समजून घ्यावी वाटली आहे काय? माजी राष्ट्रपती
डॉ.एपीजे कलाम म्हणतात, ''गेल्या १० हजार वर्षांत भारताने कधी दुसर्या
देशावर आक्रमण केले नाही. इतरांनी मात्र अनेकदा भारतावर आक्रमण केले?''
याचा अर्थ काय? सारे जग हिंदू झाले पाहिजे, अशा दुराग्रहाने हिंदूंनी
जगात कत्तली करीत रक्तपात माजविला आहे काय? सर्व धर्मांना सामावून घेणे
हीच हिंदू धर्माची विशेषता आहे. ही विशेषता आंधळेपणाने आचरली जाते तेव्हा
त्याला सद्गुण विकृती म्हणतात. बंधूंनो, तुम्हाला सद्गुणविकृतीची बाधा
झालीय. हवे तर या मानपत्रावरून घुत्कारलेल्या दुर्गंधीत सहभागी झालेल्या
पंढरीतील भूछत्राप्रमाणे उगवलेल्या मुस्लिम संघटनांना विचारा. या
संघटनांनी कधी जिहादी अतिरेक्यांच्या विरोधात आंदोलन सोडा निषेध तरी
केलाय काय?तात्या, लोकांना फार काळ मूर्ख बनवता येत नाही, हे सेक्युलर
मूर्खांना कोण सांगणार? तीस्ता सेटलवाड, बिनायक सेन, अरुंधती रॉयसारखे
देशबुडवे सेक्युलर हे गल्ली बोळातल्या सेक्युलरांचे आदर्श आहेत. या
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशाची राजधानी दिल्ली येथे ख्रिस्ती
संघटनांनी एक रॅली काढली होती. बिनायक सेन, तीस्ता आणि अरुंधतीच्या
समर्थनार्थ या पांढर्या झग्यातील धर्म पिसाटांनी घोषणाबाजी केली. हे
सारे 'कनेक्शन्स' जनताजनार्दनाला समजत नाही असे थोडेच आहे. असो.तात्या,
अज्ञानामुळे आमचेच बांधव आज 'इश्यु' नसलेले विषय घेऊन राजकारण करीत आहेत.
पांडुरंग त्यांनाही योग्यवेळी बुद्धी देईलच की.
--
visit @
www.psiddharam.blogspot.com
No comments:
Post a Comment