Thursday, December 8, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 3 )

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 गुरु गोविंदसिंहांनी आपल्या बांधवांसाठी अपरंपार सोसले
तसे सारे काही आपल्या हिंदू बांधवांसाठी सोसायची
तुमची तयारी असेल तरच तुम्ही हिंदू आहात.
हिंधू धर्मासाठी गुरु गोविंदसिंहांनी
रणभूमीवर स्वत:च्या रक्ताचे सिंचन केले.
त्यांच्या दोन पुत्रांनी रणांगणात बलिदान केले.
ज्यांच्याकरिता गुरूंनी

स्वत:च्या आणि जिवलगांच्या रक्ताचे सिंचन केले
ते सर्व त्यांना सोडून गेले.
परंतु या कृतघ्नतेबद्दल धिक्काराचा शब्दही
त्यांच्या मुखातून उमटला नाही.
जखमी वनराजाप्रमाणे ते रणक्षेत्र सोडून दक्षिणेकडे निघून गेले.

माझे हे शब्द स्मरणात ठेवा :
जर आपल्या देशाचे हित करण्याची आपली इच्छा असेल
तर आपणांपैकी प्रत्येकाला गुरु गोविंद सिंह व्हावे लागेल.

आपल्या देशबांधवांमध्ये तुम्हाला हजारो दोष आढळतील
पण ते हिंदू रक्ताचे आहेत हे विसरू नका.
या देवांचे पूजन तुम्हाला प्रथम करावे लागेल.
त्यांनी तुमच्यावर सर्व प्रकारचे आघात केले, शिव्याशाप दिले,
तरी तुम्हाला त्यांच्याशी प्रेमानेच बोलावे लागेल.
त्यांनी जर तुम्हाला घालवून दिले
तर त्या शक्तिमान पुरुषसिंहाप्रमाणे - गुरु गोविंदसिंहांप्रमाणे
विजनवास पत्करा  आणि शांत चित्ताने मृत्यू स्वीकारा.
गुरूंचा आदर्श आपल्यापुढे असला पाहिजे.
त्यांच्याप्रमाणे वागणारा मनुष्यच
'हिंदू' म्हणवून घेण्यास योग्य आहे.

सगळे क्षुद्र मतभेद आता गाडून टाकूया
आणि प्रेमाचा शुभ्र जान्हाविचे अमृतजल सर्वत्र खेळेल असे करूया !

- स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 2 )

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 3 )

 

पुढील लिंकवर क्लिक करा...
 तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा
 स्वामी विवेकानंदांचा संदेश

वसुधैव कुटुम्बकम्‌

वसुधैव कुटुम्बकम्‌

 


No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी