Wednesday, July 25, 2012

आसाममध्ये दंगल, ३६ जणांची हत्या

मटा ऑनलाइन वृत्त । गुवाहटी

आसाममध्ये कोकराझार आणि चिरांग जिल्ह्यात बोडो आदिवासी आणि बांगलादेशी मुस्लिम यांच्यात १९ जुलै पासून सुरू असलेल्या दंगलीत आतापर्यंत ३६ जण ठार झाले आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने लष्कराला पाचारण केले आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15140626.cms
अतिरेक्यांना धर्म असतो !
सुमारे १३ हजार सैनिक दंगलग्रस्त परिसरात दाखल झाले आहेत. दंगलखोरांना रोखण्यासाठी संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. लष्कराने विविध तणावग्रस्त भागांमध्ये ध्वजसंचलन (फ्लॅग मार्च) केले.

दंगलीत कोकराझार आणि चिरांग जिल्ह्यातील सुमारे पाचशे गावांमध्ये शेकडो घरे जाळण्यात आली. बेघर झालेल्या सुमारे एक लाख ७० हजार नागरिकांना जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या शरणार्थी शिबिरात राहण्याची वेळ आली आहे.

हिंसाचाराचा फटका कोकराझार आणि चिरांग जिल्ह्यातून जाणा - या रेल्वे गाड्यांवर देखिल झाला आहे . दंगल करणारे गाड्या रोखून लुटालूट करत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने दंगलग्रस्त भागात जाणा - या अनेक गाड्या रद्द करायला केल्या आहेत .

लष्कर आणि पोलिसांनी प्रशासनाच्या मदतीने दोन्ही गटांच्या नेत्यांशी चर्चा करुन तणाव निवळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 


**************************
((( हिंसाचारामुळे जर्जर आसाम
सालात ईशान्य भागात 1, 489 हिंसक घटना घडल्या. या हिंसक घटनात ईशान्य भागात 257 नागरिकांचा मृत्यू झाला. एकट्या आसाममध्येच गेल्या वर्षभरात शंभरेएक बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या आहेत. व 1012 मध्ये 22 जुलै पर्यंत 70 नागरिकांचा मृत्यू झाला. भारताच्या ईशान्येकडील राज्यांत अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानच्या कुख्यात "इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' (आयएसआय) या संघटनेने या राज्यांतील दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली आहे. आसाममधून जाणाऱ्या भारत-बांगलादेश सीमेवर गुरांचा चोरटा व्यापार वाढल्याबद्दल सुरक्षा दलांनी चिंता व्यक्त केली आहे. मुस्लिम मूलतत्त्ववादी संघटनांना रोखण्याचे काम करताना गुरांचा चोरटा व्यापार वाढल्याचे लक्षात आले. भूतान, तिबेट, म्यानमार आणि बांगलादेश यांच्या सीमेवर असलेला ईशान्य भारताचा प्रदेश संवेदनशील आहे. अनेक दहशतवादी संघटना येथे कार्यरत आहेत. "युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) ही दहशतवादी संघटना इस्लामी दहशतवाद्यांबरोबर संपर्कात आहे.

आसामचे रूपांतर इस्लामी देशात
बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीमुळे "आयएसआय' आणि मूलतत्त्ववाद्यांना केवळ आसाममध्येच नव्हे, तर ईशान्येकडील अन्य राज्यांतही तळ उघडणे सोपे जाते. या प्रदेशात 20पेक्षा जास्त जिहादी गट कार्यरत आहेत. त्यात "मुस्लिम टायगर फोर्स ऑफ आसाम', "मुस्लिम युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम', "मुस्लिम युनायटेड लिबरेशन आर्मी', "युनायटेड मुस्लिम फ्रंट ऑफ आसाम', "युनायटेड इस्लामिक रिफॉर्मेशन मूव्हमेंट ऑफ इंडिया', "मुस्लिम सिक्‍युरिटी फोर्स', "युनायटेड लिबरेशन मिलिशिया ऑफ आसाम', "मुस्लिम सिक्‍युरिटी कौन्सिल ऑफ आसाम', "हरकत उल मुजाहिदीन', "हरकत उल जिहादे इस्लामी', "पीपल्स युनायटेड लिबरेशन फ्रंट', "रेव्होल्युशनरी मुस्लिम कमांडोज', "जमात उल मुजाहिदीन', "स्टुडंट्‌स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया' आणि "लष्करे तैयबा'सारख्या दहशतवादी संघटना येथे कार्यरत असून, आसामचे रूपांतर इस्लामी देशात करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. बांगलादेशातून होणाऱ्या अनिर्बंध घुसखोरीमुळे या राज्यांतील लोकसंख्येचा तोल आणि समन्वयच धोक्‍यात आला आहे. प्रथम घुसखोरी करायची आणि मग त्या प्रदेशाचा लचका तोडायचा, असा "आयएसआय'चा डाव आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, देशातील वीस दहशतवादी संघटना सध्या "आयएसआय'च्या जवळ आल्या आहेत.

घुसखोरांना रोखा
घुसखोरीबरोबरच दहशतवादी कारवायांसाठीही बांगलादेशच्या सीमेचा उपयोग केला जात आहे. आसाममध्ये एखाद्या ठिकाणी स्फोट घडवून आणायचा असेल, तर पूर्वी काही दिवस आधी शस्त्रास्त्रे, स्फोटके यांची जमवाजमव केली जात असे. आता स्फोटकांची जुळवाजुळव बांगलादेशातच केली जाते आणि स्फोट घडवून आणण्याच्या थोडे आधी ती आसाममध्ये आणली जातात. आसाममधील काही मूलतत्त्ववादी संघटनांची मुख्यालये बांगलादेशात आहेत, तर प्रशिक्षण केंद्रे म्यानमारमध्ये आहेत.

यांपैकी "उल्फा'ची विध्वंसक शक्ती अधिक असली, तरी अन्य संघटनांची शक्ती काही कमी नाही. "उल्फा' ही विघटनवादी संघटना आहे. गेल्या काही वर्षांत मूलतत्त्ववादी संघटनाही वाढल्या आहेत. इस्लामिक कट्टरपंथीयही जोर धरत आहेत. आसाममध्ये बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून, धुबरी, नागाव, गोलपारा या जिल्ह्यांत घुसखोरांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यात मूलतत्त्ववादाचा प्रसार केला जात असून, त्याकडे सत्ताधारी एक तर दुर्लक्ष करीत आहेत किंवा राजकारणासाठी त्याचा सोयीस्करपणे वापर केला जात आहे. भारतात बांगलादेशाचे सुमारे 4 कोटी नागरिक बेकायदा घुसले असून, स्थिती अशीच कायम राहिल्यास ही संख्या दुप्पट होण्यास वेळ लागणार नाही. बांगलादेशात असलेली "हुजी' ही दहशतवादी संघटना आसाममध्ये हिंसाचार घडवून आणते आहे. यांपैकी बहुतेक घुसखोर आसाममध्ये स्थायिक होतात. गेल्या दहा-बारा वर्षांत त्यांची संख्या वाढली आहे, आणि आता तर ते मतदारही झाले आहेत. घुसखोर बांगलादेशींनी एक पक्षही सुरू केला आहे. त्याने निवडणूकही लढविली आहे. त्यान्चे सध्या आमदार आहे व ते मुख्य विरोधी पशः आहेत. त्यामुळे घुसखोरांबाबत मतपेटीचे राजकारण आड येऊ लागले आहे. अल्पकालीन राजकीय लाभासाठी, मतांसाठी घुसखोरीबाबत नरमाईचे धोरण अवलंबले जाताना दिसते आहे.गुवाहाटी उच्च न्यायालयाने केलेले भाष्य द्रष्टेपणाचे व भयसूचक होते. न्यायालयाने म्हटले होते की, हे बांगलादेशी घुसखोर आसामच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत एवढेच नव्हे तर राज्याच्या अनेक जिल्ह्यांत ते 'किंगमेक' ही झाले आहेत. कठोर राजकीय इच्छाशक्ती दाखविली नाही तर या घुसखोरांच्या लोंढयांमुळे आसाममधील मूळ रहिवासी त्यांच्याच प्रदेशात अल्पसंख्य होण्याचा दिवस फार दूर नाही.)))

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी