वृत्तसंस्था । हैदराबाद
देशातील सर्वात र्शीमंत असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात भगवान व्यंकटेश्वरावर आपली र्शद्धा जाहीर केल्याशिवाय बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
तिरुपती देवस्थान कर्मचाऱ्यांचा पुन्हा धर्मान्तारणाचा उपद्व्याप
देवस्थानमच्या अधिकार्यांनी वारंवार विनंती करूनही वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी भगवान व्यंकटेश्वरावर र्शद्धा असल्याची नोंद नोंदणी पुस्तिकेत न करताच मंदिरात प्रवेश केल्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानमच्या विश्वस्त मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जगनमोहन रेड्डी हे ख्रिश्चन धर्मीय आहेत.http://10.94.82.15/epapermain.aspx?edcode=260&eddate=7/28/2012&querypage=4
तिरुपती मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बिगर हिंदूंनी व्यंकटेश्वरावर आपली र्शद्धा असल्याची घोषणा करण्याची मंदिराची जुनी पंरपरा आहे. मात्र ती मोडीत काढून जगनमोहन यांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांच्या या वर्तनामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारण व धर्मकारणात मोठे वादळ उठले आणि देवस्थानमच्या पदाधिकार्यांनाही हिंदू संघटनांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. एका ख्रिश्चन धर्मियाला मंदिरात प्रवेश दिलाच कसा, यावरून देवस्थानमच्या पदाधिकार्यांवर प्रचंड रोष व्यक्त झाला होता.
अन्य धर्माच्या साहित्यालाही बंदी : तिरू मला हीलवर अन्य धर्माचा प्रचार किंवा साहित्याचे वाटप करण्यावर बंदी घालण्याचा निर्णयही देवस्थानमने घेतला आहे. या हीलवर अन्य धर्माचे जवळपास 100 लोक या व्यवहारात गुंतले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर देवस्थानमच्या दक्षता पथकाने गंभीर दखल घेऊन कारवाईस सुरुवात केली आहे, अशी माहिती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी एल. व्ही. सुब्रमण्यम यांनी दिली
याला म्हणतात काळाची चाकं मागे फिरवायचा प्रयत्न करण .. असो .. दुकान उघडलं की ते चालवायला लागत प्रत्येकाला आपापलं ..
ReplyDeleteश्रद्धा ही व्यक्तिगत बाब ठेवायला आपण परत एकदा शिकू तेंव्हाच परिस्थिती सुधरेल कदाचित!