सोलापूर- प्रक्षोभक आणि समाजविघातक लिखाण करणा-या रझा अकादमी, जमात-ए-इस्लामी हिंद, तेहरिक-ए-हुर्रियत जम्मू-काश्मीर, टू सर्कल डॉट नेट आदी संकेतस्थळांवर आजही बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, देशभक्ती जागवण्याचे काम करणा-या हिंदू जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर का बंदी घालण्यात आली, या आशयाची नोटीस केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाला बजावण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दै. ‘दिव्य मराठी’ला दिली.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-do-ban-on-raza-academy-website-3694057-NOR.html
हिंदू जनजागरण समिती संकेतस्थळाच्या माध्यमातून अन्याय, अत्याचाराविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे आणि एक प्रकारे शासनाला साहाय्य करण्याचे काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला. असे असतानाही आमच्या संकेतस्थळावर बंदी का, याचा खुलासा व्हावा, असे नोटिशीत म्हटले आहे. तसेच समाजविघातक संकेतस्थळांवर कारवाई करावी, अन्यथा देशभर आंदोलन छेडले जाईल, प्रसंगी न्यायालयातही दाद मागितली जाईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment