Thursday, September 27, 2012

श्‍वेतांबर जैन कवींद्वारा श्रीगणेशाचे स्मरण

जैन धर्म भारताचा प्राचीन धर्म आहे. त्याचे प्रमुख दोन संप्रदाय आहेत- १) श्‍वेतांबर, २) दिगंबर. यातले दिगंबर संप्रदायाचे खूप कट्टर होते. त्यांच्या इथे तर गणेशासंबंधी काही साधने मिळत नव्हती. संपूर्णानंद यांच्या ‘गणेश’ या पुस्तकाच्या ९ व्या अध्यायात पं. श्री. कैलासचंद्र शास्त्री यांच्या सूचनेनुसारही उल्लेख केला गेला होता की, जैन धर्मात जिनेंद्र भगवानालाच गणेश व विनायक म्हणतात. या व्यतिरिक्त यांच्या नावाचा उल्लेख मिळत नाही. विवाहाच्या वेळी विनायक यंत्राची पूजा केली जाते. त्या वेळी श्‍लोक म्हटले जातात-
‘गणाना मुनीनामधीशस्त्वतस्ते
 गणेशाख्यया ये भवन्तं स्तुवन्ति
 |सदा विघ्नसंदोहशान्तिर्जनानां करे संलुढस्यायतश्रेयसानाम्‌॥
 यतस्त्वमेवासि विनायको मेदृष्टेष्टयोगानवरूद्धभाव:
|त्वष्माममात्रेण पराभवन्ति विघ्नाश्यस्तर्हि किमत् चित्रम्‌॥
श्‍वेतांबर संप्रदायात गणेशासारखी जगासारखे मुख असलेली पार्श्‍वयक्षाची काही प्रतिमा जैन मंदिरात स्थापित आहे. यामुळे खूप लोकांना भ्रम होतो की, गणेशाची मूर्ती जैन मंदिरात कशी? परंतु, वास्तवात २३ वे तीर्थंकर पार्श्‍वनाथाचा अधिष्ठाता शासनदेव श्‍वेतांबर ग्रंथानुसार पार्श्‍वयक्षच आहे.
जरी श्‍वेतांबर विद्वान आणि कवींनी आपल्या रचनेतील मंगलाचरणात नेहमी तीर्थंकर, गौतमगणधर तसेच सरस्वती देवीचे स्मरण केले आहे; पण काही कवी असेही झाले ज्यांनी क्लेषविनाशक विघ्नहर्ता गणेशाचे लोकप्रसिद्धीच्या कारणाने आपल्या रचनेत मंगलाचरणी गणेशाला नमस्कार व स्मरण केले आहे. आपण गण आणि मुनींचे अधिश्‍वर आहात. जे लोक गणेश नावाने आपली स्तुती करतात, ते आयतश्रेयस असतात (हिताचे भागीदारी). कवींच्या मंगलाचरणात श्री गणेशासंबंधी पद्य आहेत. त्याहून त्यांच्या उदारभावनेचा परिचय होतो.
सं. १५६५ मध्ये उदयभानुरचित विक्रमसेन रास यांच्या सुरुवातीला-
शभु शक्ति मनिधरी, करिस कवि नव नवइ छटि
|सिद्धी बुद्धीवर विघ्नहर, गुण निधावगणपति प्रसादि॥
कवी हेमरलाचिते गौरा बादल चौपाई सुरवातीला
सकल सुखदायक सदा सिद्धी बुद्धिसहित गणेश
|विघ्न विडारण रिध करण, पहिली तुझ प्रणमेश
|के शकविरचित चंदभालियागिरी चौपाईच्या सुरवातीला
विघ्न विडारन सुख करन आनंदअंग उल्लस
|गवरी-सुत प्रणमुधवर प्रत्यक्ष पुरोआस
महेश्‍वरी सुरि-शिष्य रचत चंपकसेन रास यांच्या सुरवातीला
गणपति गुण निधि विन ॐ, सरस्वती को पसाद॥
या प्रकारे अशा अनेक कवींच्या रचना आहेत, ज्यांच्या सुरुवातीला गणेशाचे स्मरण केले आहे. पण, त्यात रासो आदी रचयिता त्यांचे नाव सापडत नाही. मग काहींचे रचयिता जैन आहे की नाही, योग्य माहिती होत नाही.
१६ व्या शताब्दीपासून १८ व्या शताब्दीपर्यंत श्‍वेतांबर कवींच्या हिंदी आणि राजस्थानी दोन्ही भाषांच्या ग्रंथात गणेशाचे सुरुवातीला स्मरण केले आहे. यातले काही ग्रंथ वैद्यक, तर काही गणिताचे होते. वैद्यक आदी ग्रंथ तर सार्वजनिक आहे, पण अन्य काही संस्कृत तसेच चरित काव्यपण आहे. ज्यांच्या कथापण ऐतिहासिक तसेच सर्वजनोपयोगी आहे. श्रीगणेशाचे भक्त त्या रचनांतून लाभ घेऊ शकत होते. या विशाल दृष्टीने गणेशाच्या अति प्रसिद्धीच्या कारणामुळे जैन विद्वानांनी त्यांचे स्मरण केले आहे.
स्तवन
वन्दे वन्दासमन्दार मिन्दुभूषणनन्दनम्‌
|अमन्दानन्द संदोहबन्धुर सिन्धुराननम्‌
|इस्तपङ्कजनिविष्टमोदकव्याससंचरदशेषमर्थम्‌
|नौभि किंचिदवधूनितशुण्डादण्डकुण्डलितमण्डितगण्डम्‌
|अ गजाननपद्मार्कं गजाननमहर्निशम
|अनेकंद तं भक्तानामेकदन्तपास्महे॥
जैन धर्मात ज्ञान गोळा करणारे गणेश अर्थात ‘गणधराची’ मान्यता आहे. केवळ ज्ञानाला उपलब्ध करण्यासाठी अरहन्तचा उपदेश नेहमी गणधराच्या निमित्ताने होतो.
गणधर हे मुख्य पात्र तीर्थंकर कोणाला शिष्य जमवत नाही. साधूंचा जो संघ राहतो त्याने नियामक गणधर राहतात. बुद्धी, औषध, अक्षय, उर्ष, रस, तप आणि विक्रिया या सात प्रकारच्या अद्भुत शक्ती तसेच चार प्रकारच्या ज्ञान मिळविलेले महावीर स्वामींचे मुख्य गणधर होतात आणि त्यांनी त्या एक दिवसाच्या मुहूर्तावर देवाच्या उपदेशाचे १२ अंग आणि १४ पूर्वरूपात संकलन केले. जैन मनात याच गौतम गणधराला गणेश मानले जाते. सगळ्या तीर्थंकरांप्रमाणे महावीर स्वामीची दिव्यध्वनी ॐकार रूप तसेच निरक्षरात्मक झाल्याने सर्वभाषामय होती. गणधराद्वारा संकलित शास्त्र, पण सगळ्या विषय, पदार्थ विद्या, कलांचे शाब्दिक ज्ञान-विज्ञान रूप होते. अल्प अंशाचे शाब्दिक ज्ञान, ज्ञानविज्ञानाचे महासागर आहे जे सामान्य जनतेकरिता असीम आहे. यातून गणधराच्या ज्ञानाचे सूचन होते.
कल्पना पांडे
९८२२९५२१७७
tarun bharat, nagpur

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी