Thursday, September 27, 2012

सगळे जगणे ‘पर्यटन’ व्हावे!


शहाणे होण्याचा सोपा मार्ग आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवून ठेवला आहे. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत वर्तनहे तीन मार्गशहाणेबनवणारे आहेत. ज्ञानी माणसांशी मैत्री असेल, तर त्यांच्या सहवासात आपल्याला खूप काही मिळत जाते. ज्ञान, अनुभव, विचार यांच्या संगमाने संपन्न झालेल्यासभा, संमेलनातगेल्याने आपली झोळी आपसूकच भरून जाते. असेच महत्त्व देशाटनाचे आहे. देशाटन म्हणजे पर्यटन! भटकंतीने आपण सर्वार्थाने र्शीमंत होतो. नाना लोक, नाना पद्धती आपल्याला यात्रेमुळे कळतात. आपला दृष्टिकोन व्यापक होत जातो. म्हणजेच आपण शहाणे होतो. पर्यटन दिनानिमित्त पर्यटनाचा विचार व्हायला हवा. फिरण्याने आनंद मिळतो. पण, हे फिरणे जाणीवपूर्ण झाले की मगच ते पर्यटन होते.


सामान्यत: आपले पर्यटन प्रचलित आणि प्रस्थापित अशाप्रेक्षणीय स्थळांपुरते र्मयादित असते. पण, जगात प्रेक्षणीय काय नाही? सारे जगच प्रेक्षणीय आहे. मगदाखविलेजाते तेवढेच पाहण्यात काय मजा? दिसेल ते बघावे. समजून घ्यावे. मनात साठवावे. असे घडले की, आपले सगळे जगणेच पर्यटन होऊन जाते. आपले जगणे म्हणजे निरंतरचे पर्यटनच आहे. 84 लक्ष योनी आपण फिरतो. मोठय़ा भाग्यानेमाणूसम्हणून जन्माला येतो. माणूस होने हीचजिवाच्यापर्यटनाची परिपूर्णता असते. आपले जगणे पर्यटन होते का, या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर शोधायला हवे. ज्याचे जगणे असे पर्यटन झाले त्याच्या जवळपासही दु: फिरू शकत नाही. खचून टाकतील असे ताणतणाव त्याच्या आयुष्यात येत नाहीत. त्याचा प्रत्येक क्षण आनंदाचा महोत्सव होऊन जातो.

तक्षशिलेच्या
गुरुकुलात आर्य चाणक्यांनी तब्बल 18 वर्षे अनेक विषयांचे ज्ञान मिळवले. तेथून स्वत:च्या जन्मभूमीकडे-पाटलीपुत्राकडे येताना ते अठरा महिनेपर्यटनकरत आले. या संदर्भात चाणक्य म्हणतात की, ‘18 वर्षांत गुरुकुलात मी जेवढे शिकलो त्यापेक्षा कितीतरी जास्त मी 18 महिन्यांच्या भ्रमंतीत शिकलो!’ पर्यटनाची ही शक्ती आपण लक्षात घेतो का? पर्यटनाचा खरा अर्थ तरी आपल्याला कळाला आहे का? महाभारतात कौरवांचे महामंत्री असणार्या विदुरांनी पर्यटनाचा अर्थ सांगून ठेवला आहे. ते म्हणतात, ‘अवधूत बनून पर्यटन केले पाहिजे.’ अवधूत होणे म्हणजे स्वत:ची स्वतंत्र ओळख विसरून जाणे! स्वत:चे सारे आग्रह, आवडी-निवडी विसर्जित करून घराबाहेर पडणे! आपण असे पर्यटन कधी करतो का? शिकल्याशिवाय शहाणे होता येत नाही. स्वत:ला विसरल्याशिवाय काही शिकता येत नाही.

आपले
जगणे पर्यटन बनवण्याचा अर्थच मुळी, या दोन सूत्रांची सांगड घालणे, असा होतो. सध्या आपले जगणे फक्तसाचूनगेलेले पाणी झाले आहे. प्रसंगाने कधी हे साचले पाणीवाहतेहोण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपण अहंकाराचे बांध बांधतो. आवडी-निवडीची कुंपणे घालतो. ‘माझे-तुझेरखवालदार नेमतो. पाझरूनही कधी दुसर्याच्या अंगणात ओलावा जाऊ नये म्हणून भक्कम अस्तरीकरण करतो. राग-द्वेषाचे कणखर अस्तर! आपली संस्कृती सांगते की, ‘पाझरू दे, झिरपू दे, वाहू दे!’ आपण नेमके त्याच्या उलट जगतो. वाहणे हेच जीवन, चालणे हीच यात्रा, हे आपल्याला कधी कळणार? पर्यटनात अवधूत होणे म्हणजे प्रत्येक क्षण जगणे! आता जेथे आहोत तेथे कायम राहायचे नाही, हे पक्के ध्यानात ठेवायचे. तरीही आपल्या अस्तित्वानेतेस्थान सुशोभित करायचे. आपल्या सोबत जे आहेत त्यांच्या वाटा वेगळ्या आहेत, ही साथ सुटणार आहे, हे लक्षात ठेवायचे. तरीही आपला व्यवहार प्रेमपूर्ण आणि आत्मीयतेचा ठेवायचा. जेथे पडाव पडतो तेथे रमून जायचे. मागच्या मुक्कामाची आठवण नको की पुढच्या मुक्कामाची चिंता नको! पथारी पसरलेल्या जागेवर आपले स्वामित्व नाही याचे भान ठेवले की पुढच्या प्रवासाला निघणे सोपे जाते. बरोबर सामानही इतकेच की ओझे होऊ नये!

जगणे
पर्यटन झाले की, ते मोरपिसासारखे होते. तसे झाले नाही तर जगणे ओझे होऊन जाते. पर्यटन एक सुंदर व्रत आहे. आपल्या मागून येणार्यांसाठी आपण वावरलो तो परिसर सुखद आणि सुंदर करून पुढे जाणे हा व्रताचा महत्त्वाचा भाग आहे. पाठी येणार्याने म्हणावे की, ‘कोण यात्रिक येथे वस्तीला होता बरे! कसे सारे स्वच्छ आणि सुंदर करून गेला आहे!’ पाठच्यांच्या सुखाचा विचार हेच पर्यटनाचे खरे पुण्य असते. क्षणभराच्या का असेनात पण सोबत्यांच्या सोयींचा विचार हाच पर्यटनातला परमार्थ असतो. आता आहे त्यापेक्षा जग रम्य बनवत पुढे जाणे हेच पर्यटनातले सत्कर्म असते. प्रेक्षणीय स्थळे बघत जाणे हे सामान्य पर्यटन असते, तर आपल्या वावरण्याने प्रत्येक स्थळ प्रेक्षणीय करणे, हे खरे पर्यटन असते.

पर्यटन
दिनानिमित्त अशा पर्यटनाचा प्रारंभ करण्याचा संकल्प करायला काय हरकत आहे? अवधूत होऊन म्हणजेभाररहित होऊन पुढे जाऊ.. काहीस्वस्तिपद्मेरेखित! चरैवेति चरैवेति म्हणत!
vivek ghalsasi / divya marathi / dharmadarshan / page 7/ 25 sept 2012

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी