Thursday, September 27, 2012

इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची मुक्ताफळे

तारीख: 9/25/2012 10:53:34 PM
$img_title
म्हणे गणपती देव कसा?, फेसबूक अकाऊंटवर बंदी आणण्याची मागणी
वृत्तसंस्था
मुंबई, २५ सप्टेंबर
‘इनोसंट मुस्लिम्स’ या अमेरिकन चित्रपटात महंमद पैगंबराचा अपमान झाल्याचा कांगावा करून तसेच धार्मिक भावना दुखावल्याची बतावणी करून जगभर धुमाकूळ घालणारे मुस्लिम मुल्ला मौलवी अन्य धर्मीयांच्या भावना मात्र बिनदिक्कत पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. ‘पीस’ या खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवरून इस्लामचा सातत्याने प्रचार करणारे तथाकथित मुस्लिम विद्वान झाकीर नाईक यानेही गणपती देव कसा असू शकतो ? तो देव असेल तर सिद्ध करा अशी मुक्ताफळे उधळली आहेत. दरम्यान, झाकीर नाईकच्या या बेताल वक्तव्यांमुळे हिंदू धर्मीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून नाईकच्या फेसबूक अकाऊंटवर बंदी घाला, अशी मागणी करण्यात येत आहे.

संपूर्ण देशातील नागरिक गणेशोत्सव आनंदाने व भक्तिभावाने साजरा करीत असतानाच झाकीरच्या या विषारी वक्तव्यांमुळे धार्मिक सौहार्दाचे वातावरण गढूळ झाले आहे. झाकीर नाईक याचे वैशिष्ट्य म्हणजे हा तथाकथित विद्वान अनेकदा अन्यधर्मीयांच्या विरोधात ताळतंत्र सोडून बोलत असतो. आताही त्याने हेच केले आहे. फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटवर भावना दुखावणारा मजकूर टाकून त्याने आगीत तेल ओतले आहे. ‘हा गणपती कोण आहे ? त्याच्या जन्माचे रहस्य काय ? असे सवाल त्याने फेसबूकवरून उपस्थित केले आहेत. गणपती देव असल्याचे कुणी सिद्ध केल्यास मी प्रसाद भक्षण करेन, असेही त्याने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर इस्लामचा हा प्रचारक असेही म्हणतो की ‘जर तुमचा देव स्वत:च्या मुलाला ओळखू शकत नाही तर तो मी संकटात आहे हे कसे ओळखणार ? अशी खिल्लीही त्याने उडवली आहे. स्वत:च्या धर्माविषयी तसेच अल्ला व कुराणाविषयी सर्वाधिक संवेदनशील असलेले व त्यावर जराही टीका खपवून न घेणारे मुल्ला मौलवी हिंदू धर्मीयांच्या भावना बिनदिक्कतपणे पायदळी तुडवत आहेत. या त्यांच्या दुटप्पीपणामुळे हिंदूधर्मीय संतप्त झाले आहेत. झाकीर नाईक याच्या फेसबूक अकाऊंटवर बंदी घाला, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.
११ ऑगस्टला आझाद मैदानावर रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या हैदौसाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सवादरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सारी यंत्रणा डोळ्यात तेल घालून कार्यरत आहे. अशात गणपतीबाबत झाकीर नाईकने केलेले वादग्रस्त विधान म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा खोडसाळ प्रयत्न असल्याची तक्रार गणेश मंडळांकडून होत आहे. विनाकारण हिंदू-मुस्लिमांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या झाकीर नाईकवर ताबडतोब गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे. तशी रीतसर तक्रार मुंबई, पुणे आणि पनवेलसह राज्यभरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आली आहे.
जगातल्या कोणत्यातरी कोपर्‍यात थोडंसं खुट्टं झालं की रस्त्यावर उतरणारे मुस्लिम नेते आणि त्यांच्या झुंडी अन्य धर्मीयांच्या श्रध्दास्थानांवर आघात कसे करू शकतात असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुस्लिमांच्या शिष्टमंडळाला तातडीने भेट देऊन इस्लामची विटंबना रोखण्याचे आश्‍वासन देतात. श्रीगणेशाची विटंबना करणार्‍या डॉ. झाकीर नाईकवर मुख्यमंत्री कठोर कारवाई करणार की नेहमीप्रमाणे खोट्या धर्मनिरपेक्षतेचे डोज हिंदू समाजाला पाजणार, असा सवाल या शिष्टमंडळांनी आपल्या निवेदनात केला आहे.
tarunbharat.net

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी