Thursday, October 25, 2012

मुस्लिमांच्या दबावापुढे आयुक्त झुकले

अभिजीत साठे मुंबई ( मुंबई मिरर )

मुंबई पोलिसांचे नीतीधैर्य वाढविण्याच्या ' गोष्टी ' करणारे आणि पोलिसांवर हात उचलणा - यांच्या नाकाबंदीच्या घोषणा करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ . सत्यपाल सिंह मुस्लिम समाजातील नेत्यांच्या दबावापुढे झुकले आहेत . सीएसटी हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समाजकंटकांच्या अटकेचा फेरविचार करण्याचे आदेश सत्यपाल सिंह यांनी क्राइम ब्रँचला दिले आहेत . http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16950096.cms


गेल्या आठवड्यात मुंबईतील इस्लाम जिमखान्यात मुस्लिम समाजातर्फे सत्यपाल सिंह यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी मुस्लिम समाजातील काही नेत्यांची भाषणे झाली . या भाषणांचा रोख सीएसटी दंगलीनंतर झालेल्या अटकांवरच होता . या प्रकरणाला हवा देण्यासाठी पोलिसांनी अनेक निष्पाप तरुणांना अटक केल्याचा आरोप मुस्लिम नेत्यांनी यावेळी केला . आझाद मैदानाजवळ पार्क केलेल्या बाइक आणण्यासाठी गेलेल्या तरुणांना पोलिसांनी आकसाने अटक केली आहे , असे सुनावतनाच , या तरुणांना ताबडतोब सोडून देण्याची मागणी या नेत्यांनी आयुक्तांकडे केली . पोलीस आयुक्तांवर मुस्लिम नेत्यांची ही दादागिरी पाहून उपस्थित पोलीस अधिकारीही अवाक् झाले . सिंग यांनी मुस्लिम नेत्यांपुढे तत्काळ शरणागती पत्करत अटकेचा फेरविचार करण्याची मागणी मान्य केली . इतकेच नव्हे तर पोलिसांनी चुका केल्याची कबुली दिली .
प्रत्यक्षात हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेल्या तीन तरुणांना पुराव्याअभावी कोर्टाने आधीच सोडून दिले आहे . तर इतरांवर शस्त्रास्त्र बाळगणे , दंगल घडवणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही कलमे लावण्यात आली आहेत . मात्र , आयुक्तांच्या आदेशानंतर या सगळ्यांच्या अटकेचा फेरविचार करण्याचा दबाव आता पोलिसांवर वाढला आहे .
सीएसटी हिंसाचारादरम्यान मुस्लिम समाजकंटकांनी पोलिसांवर हल्ले केले होते. महिला पोलिसांवरही हात टाकले होते. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांवर हात टाकणा-या या लोकांना दयामाया दाखवू नका अशी मागणी सर्वच स्तरांतून झाली होती. या घटनेनंतर मुंबईत पोलीस आयुक्त म्हणून आलेल्या सत्यपाल सिंह यांनीही कठोर कारवाईच्या घोषणा केल्या होत्या. मात्र, मुस्लिम समाजाच्या दबावानंतर लगेचच त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी